Diabetes diet tips : खाणं तर दूरच, ‘हे’ 6 पदार्थ चाटूनही बघू नका, नाहीतर होऊ शकतो मृत्यूला निमंत्रण देणारा डायबिटीज!

मधुमेह किंवा डायबिटीज (diabetes) हा एक असा गंभीर आजार आहे ज्यामध्ये पीडित व्यक्तीच्या रक्तातील साखर किंवा रक्तातील ग्लुकोज सतत वाढत राहते. मधुमेहावर कोणताही निश्चित इलाज नाही आणि तो केवळ सकस आहारानेच नियंत्रित केला जाऊ शकतो. आता प्रश्न असा पडतो की मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काय खावे? वेगवेगळे पदार्थ शरीराला वेगवेगळे पोषक तत्व देतात. साहजिकच, मधुमेहाचा रुग्ण असो किंवा सामान्य व्यक्ती, त्याच्या शरीराच्या चांगल्या कार्यासाठी प्रथिने (protein), खनिजे (minerals), जीवनसत्त्वे (vitamins) आणि इतर सर्व पोषक घटक आवश्यक असतात. परंतु जेव्हा गोष्ट कर्बोदकांची येते तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांना ते कमी करण्याचा किंवा वगळण्याचा सल्ला दिला जातो.

तथापि, अन्नामधील कार्बोहायड्रेट्सचे तीन मुख्य प्रकार आहेत: स्टार्च, साखर आणि फायबर. मधुमेह असलेल्या लोकांसाठी स्टार्च आणि साखर ही सर्वात मोठी समस्या आहे कारण शरीर त्यांना ग्लुकोजमध्ये तोडते. त्याचप्रमाणे रिफाइंड कार्बोहायड्रेट किंवा रिफाइंड स्टार्च प्लेट्सपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्रक्रियेद्वारे तोडले जातात. यामुळे, शरीर त्यांना लवकर शोषून घेते आणि त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. यामुळे रक्तातील साखर वाढते. रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही पांढऱ्या रंगाच्या पदार्थांमध्ये स्टार्च आणि साखरेसारखे कार्बोहायड्रेट भरलेले असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.

हेही वाचा :  Foods Never Expire : किचनमधील हे 5 पदार्थ कधीच होत नाहीत एक्सपायर, अजिबात करू नका फेकून देण्याची चूक..!

पास्ता

पास्ता सॉस, क्रीम, चीज आणि भरपूर बटर घालून बनवला जातो. हे तुमच्या शरीराला 1,000 कॅलरीज, 75 ग्रॅम फॅट आणि सुमारे 100 ग्रॅम कार्बोहायड्रेट देते. पास्ता मैद्यापासून बनवलेला असतो जो रक्तातील साखर वाढवू शकतो. त्यामुळे लठ्ठपणाचा धोकाही वाढतो.

(वाचा :- Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!)

बटाटे

बटाटा हा पदार्थ जवळजवळ प्रत्येकालाच आवडतो आणि त्याच्या शिवाय कोणतीही भाजी मजेदार वाटत नाही. बटाटे 97 किलो कॅलरी, 22.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 0.1 ग्रॅम फॅट, 1.6 ग्रॅम प्रोटीन आणि 0.4 ग्रॅम फायबर प्रति 100 ग्रॅम प्रदान करतात. बटाट्यातील एकूण कॅलरीजपैकी ९८% कर्बोदकांमधे येतात. त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे आणि ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य नाही.

(वाचा :- Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!)

मैदा

मैद्यात जवळजवळ स्टार्च (73.9%) असते तर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचे प्रमाण कमी असते. मैद्यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. मैद्याचा जास्त वापर केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो. मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. मधुमेह आणि लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ते योग्य नाही.

हेही वाचा :  Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!

(वाचा :- Lassa fever : ओमिक्रॉनमध्येच आता लासा तापाने वाढवली चिंता, ‘या’ लोकांना आहे जास्त धोका, लक्षणं व उपाय जाणून घ्या!)

साखर

साखरेपासून बनणा-या जवळजवळ सर्वच गोड पदार्थांमध्ये मुख्यतः साखर आणि खराब कार्बोहायड्रेट्स घातलेले असतात. त्यात भरपूर कमी किंवा नाहीच्या बरोबर पौष्टिक मूल्य असतात, जे रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतात. साखरेमुळे वजन वाढणे, हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो.

(वाचा :- Weight loss inspiration : 122 किलो वजनामुळे लठ्ठ म्हणून उडवली जायची खिल्ली, सकाळी लिंबू पाणी व मध आणि लंचनंतर हे खास पाणी पिऊन घटवलं तब्बल 41 किलो वजन!)

भात

ब्रिटिश मेडिकल जर्नलमधील अभ्यासात असे आढळून आले आहे की जे लोक भात खातात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. याचा अर्थ असा की जर तुम्हाला प्री-डायबिटीज असेल तर तुम्ही भात खाण्याचा विचार करावा. तांदळात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो, याचा अर्थ ते रक्तातील साखर लगेच वाढवू शकते.

(वाचा :- Bathing Habit : आजच सोडा अंघोळीबाबतची ‘ही’ घाणेरडी सवय, दीर्घायुष्यासाठी हार्वर्ड एक्सपर्ट्सनी सांगितली अंघोळ करण्याची योग्य पद्धत..!)

हेही वाचा :  Roti For Weight Loss : पोट व कंबरेवरची चरबी कमी करते 'या' पिठापासून बनलेली चपाती, 1 आठवड्यातच दिसू लागेल कमालीचा फरक!

सफेद ब्रेड

पांढरा ब्रेड मैद्यापासून बनविला जातो, जे रिफाइंड स्टार्चने भरलेला असतो. या गोष्टी साखरेप्रमाणे काम करतात आणि लवकर पचतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्याच्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो, याचा अर्थ ते जेव्हा खाल्ले जाते तेव्हा त्यात फायबरची कमतरता असते.

(वाचा :- Bleeding Piles : मुळव्याध झालाय? मग औषधं व सर्जरी सोडा, घरच्या घरी करा या 5 उपायांनी मिळवा मुक्ती..!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मलायकाने ब्लॅक बॅकलेस गाऊनमध्ये तापवलं इंटरनेटचं वातावरण

मलायका अरोरा आणि तिचा फिटनेस हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मलायका आपल्या फॅशनने सर्वांचेच …

लंडनच्या आलिशान घरात सोनमची जंगी पार्टी, वाईन रेड कलर स्कर्टमध्ये केले थेट काळजावर वार

अभिनेत्री Sonam Kapoor यावेळी युकेमध्ये आपला पहिला Mother’s Day सेलिब्रेट केला होता. या प्रसंगी तिने …