UPSC उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंगची गरज नसते, IAS सलोनी वर्माचा सक्सेस मंत्रा जाणून घ्या

Success Story: यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. लाखो उमेदवार ही परीक्षा देतात पण त्यातील काही जणच ही परीक्षा उत्तीर्ण होतात.. केंद्रीय लोकसेवा परीक्षेत यश मिळवणारे उमेदवार कठोर परिश्रमाने इथपर्यंत पोहोचतात. झारखंडच्‍या जमशेदपूरच्‍या रहिवासी असलेल्या सलोनी वर्माबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जिने ग्रॅज्युएशननंतर यूपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली आणि तिला दुस-या प्रयत्नात यश मिळाले.

विशेष म्हणजे सलोनी वर्माने कोणत्याही कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आपली क्षमता आणि आवड समजून घेतली तर उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंगची गरज नसते हे तुमच्या लक्षात येईल. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास तुम्ही कोचिंगमध्ये सहभागी होऊ शकता पण मेहनत आणि सेल्फ स्टडीतूनच यश मिळणार आहे. पहिल्याच प्रयत्नात सलोनी अपयशी ठरली होती पण तिने हार मानली नाही आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिली.

Government Job: बारावीनंतर सरकारी नोकरी करायचीय? या विभागांमध्ये करा अर्ज
सर्वप्रथम आपण आपली क्षमता आणि आवड समजून घेतली पाहिजे. मग आपण यूपीएससी टॉपर्सच्या मुलाखती पाहायला हव्यात, त्यांचे ब्लॉग वाचायला हवेत असा सल्ला ती देते. सर्वप्रथम मी अभ्यासक्रम समजून घेतला आणि त्याचे वेळापत्रक तयार केले. कमी वेळात यश मिळवण्यासाठी चांगली रणनीती खूप महत्त्वाची असते असेही सांगते.

हेही वाचा :  दहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

तुम्ही दररोज प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकणार नाही.यशासाठी कठोर परिश्रम, योग्य रणनीती, जास्तीत जास्त उजळणी, उत्तर लेखनाचा सराव आणि सकारात्मक दृष्टीकोन हे खूप महत्त्वाचे असल्याचे ती सांगते.

Success Story: पाचवेळा अपयशी पण खचला नाही; सहाव्या प्रयत्नात IES क्रॅक करुन गौरव आला देशात ४४ वा
Tips For Exam: कोणतीही परीक्षा असो ‘या’ टिप्स फॉलो केलात तर सहज व्हाल उत्तीर्ण

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …