नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांना ‘हे’ काम करणे अनिवार्य

MBBS student:एमबीबीएस अभ्यासक्रमात (MBBS syllabus) आता डॉक्टर हिप्पोक्रॅटिक ओथ (Doctor Hippocratic Oath) ओथऐवजी महर्षी चरक (Maharshi Charak Oath) यांच्या नावाने शपथ घेतली जाणार आहे. प्रदीर्घ प्रक्रियेनंतर अखेर देशात नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणाली (New Medical Education Policy) लागू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आता जवळचे गाव दत्तक घ्यावे लागणार आहे. एमबीबीएस विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर काम करावे लागणार आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission, NMC) नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणालीचा आदेश जाहीर केला. सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांना तातडीने त्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. हे आदेश यावर्षी १४ फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या शैक्षणिक सत्रासाठीही लागू असणार आहेत. चरक शपथेमागील तर्क म्हणजे वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीशी जोडले जाणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दहावी पास असणाऱ्यांना संधी, ६३ हजारपर्यंत मिळेल पगार

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर संस्थेत भरती, ६० हजारपर्यंत मिळेल पगार
एमबीबीएसचे पहिले वर्ष १२ महिन्यात पूर्ण
सध्या देशात एमबीबीएसचे पहिले वर्ष पूर्ण होण्यासाठी साधारण १४ महिने लागतात पण या वर्षापासून त्यांच्यासाठी १२ महिन्यात म्हणजे एक वर्ष पूर्ण होईल. त्याची संपूर्ण माहिती वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांना आदेशासह पाठवण्यात आली आहे.

हेही वाचा :  Talathi Job: राज्यात तलाठींची 4625 पदे भरणार, परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट

आयोगाने एमबीबीएससाठी नवीन गुणवत्ता आधारित वैद्यकीय शिक्षण (CBME 2021) प्रणाली लागू केली आहे.२०१९ मध्येही त्याची अंमलबजावणी झाली. मात्र नवीन सीबीएमई लागू झाल्याने आता अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल, असा आयोगाचा दावा आहे.

VNIT येथे विविध पदांची भरती, ४० हजारपर्यंत मिळेल पगार
बॅंक ऑफ बडोदा कॅपिटल मार्केटमध्ये भरती, येथे करा अर्ज
दोन पूरक परीक्षांची संधी
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीत केवळ दोनदाच पूरक परीक्षा देण्याची संधी मिळेल. निकाल जाहीर झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांच्या दरम्यान ही पुरवणी परीक्षा घेतली जाईल. पुरवणी परीक्षेचा निकाल १० दिवसांच्या आत जाहीर करावा लागेल. विद्यापीठाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास पुरवणी परीक्षा होणार नाही.पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना विशेष वर्ग आणि प्रभागात स्वतंत्र ड्युटी देऊन दुसऱ्या वर्षी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

KDMC Recruitment: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, जाणून घ्या तपशील
इंडियन लॉ सोसायटीमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, ‘येथे’ करा अर्ज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …