सत्ताधारी की विरोधक? अखेर नवाब मलिकांची भूमिका आली समोर

Nawab Malik: नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणाने जामिन मंजूर करण्यात आला. यानंतर नवाब मलिक हे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिसले. अधिवेशनावेळी नवाब मलिक हे अजित पवार यांच्या गटासोबत बसलेले दिसले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित यावर नाराजी व्यक्त केली होती. या पत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील पाठींबा दर्शविला होता. यावर अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली होती. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी नवाब मलिक काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान आता नवाब मलिक यांच्या कार्यालयातून यावर प्रतिक्रिया आली आहे.

विधानभवन परिसरात आल्यावर नवाब मलिक एनसीपी कार्यालयात बसले. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. दरम्यान एनसीपी पक्ष कार्यालय एकच आहे, कोणत्या गटाचे नाही यामुळे एनसीपी पार्टी कार्यालयात मलिक बसले, अशी माहिती मलिक यांच्या कार्यालयातून देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. नवाब मलिक हे अद्याप तटस्थ भूमिकेत आहेत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. आहे. 

दरम्यान नवाब मलिक यांची भूमिका हे स्वत: मांडतील अशी सावध भूमिका अजित पवार यांनी दिली. आज अधिवेशन संपेपर्यंत आपण पूर्णवेळ थांबणार असल्याचे नवाब मलिक यांच्याकडून सांगण्यात आले आहेत. मलिक यांना न्यायालयाकडून माध्यमांशी संवाद साधण्यावर बंदी असल्याचे सांगण्यात येतंय. दरम्यान ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडू शकतात, असेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :  बिर्ला ग्रुपच्या मालकाची मुलगी अनन्या बिर्लाचा ग्लॅमरस थाट पाहिला का? अदा अन् रूप बघून विसरून जाल अंबानींच्या सुना-लेकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नबाव मलिकांनी काल हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली.. मात्र कामकाज सुरु झाल्यानंतर मलिक थेट सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले.. आणि त्याचमुळे महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आलंय. मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचीच चर्चा आहे.. जामिनावर सुटल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर चर्चा सुरु होती. मात्र आज अधिवेशनासाठी दाखल झाल्यावर मलिकांनी आधी अजित पवार गटाच्या कार्यालयात भेट दिली.. त्यानंतर मग शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांची गळाभेट घेतली.. तेव्हा मलिकांची अधिकृत भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून महायुतीत महाभारत सुरू होण्याची शक्यता आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून मलिकांचा सत्तेत समावेशाला उघड विरोध केलाय. महायुतीत नवाब मलिकांना घेणं योग्य होणार नाही अशी भूमिका फडणवीसांनी पत्रातून मांडलीय. मलिकांवर देशद्रोहाचे आरोप आहेत. सत्ता येत आणि जाते. मात्र देश महत्त्वाचा आहे असं फडणवीसांनी नमूद केलंय… 

तर दुसरीकडे गिरीश महाजनांनीही नवाब मलिकांचा महायुतीला पाठिंबा नकोय अशी भूमिका मांडलीय. तर शिंदे गटानंही फडणवीसांच्या पत्राचं समर्थन केलंय. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गट विरूद्ध अजित पवार गट असा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.

हेही वाचा :  Coronavirus Guideline: पुन्हा लागणार लॉकडाऊन? केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …