अवघ्या २२व्या वर्षी चंद्रज्योती सिंह झाली पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण!

UPSC Success Story : चंद्रज्योती सिंह हिला देशातील सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. सध्या ती पंजाब केडरची आयएएस अधिकारी आहे आणि मोहालीच्या एसडीएम म्हणून नियुक्त आहे. दरवर्षी हजारो युपीएससी उमेदवार भारतातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी संपूर्ण लक्ष आणि समर्पणाने तयारी करतात. मात्र, आयएएस, आयपीएस, आयआरएस आणि आयएफएस होण्याचे काही मोजक्याच लोकांचे स्वप्न पूर्ण होते. त्यापैकी एक आयएएस चंद्रज्योती सिंग IAS Chandrajyoti Singh या लष्करी अधिकाऱ्याची ही मुलगी. वाचा तिचा हा प्रेरणादायी प्रवास…

चंद्रज्योती ही आर्मी ऑफिसरची मुलगी असल्याने वडिलांच्या वारंवार बदल्या होत असल्याने चंद्रज्योतीला शाळा बदलावी लागली. तिचे वडील कर्नल दलबारा सिंग हे सैन्यात रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत होते, तर तिची आई लेफ्टनंट कर्नल मीन सिंग होती. लष्करातील कर्मचारी असल्याने तिच्या आई-वडिलांनी चंद्रज्योतीला तिच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन दिले.

तिचे पंजाब जालंधरच्या एपीजे स्कूलमधून दहावीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर, तिने चंदिगडच्या भवन विद्यालयात इंटरमिजिएटचे शिक्षण घेतले. नंतर तिने सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठात इतिहास (ऑनर्स) चे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने युपीएससी परीक्षेकडे लक्ष केंद्रित केले.

हेही वाचा :  महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदांच्या 715 जागांसाठी भरती जाहीर

तिने इतका अभ्यास केला की चंद्रज्योतीला मागे वळून पाहिले नाही. तिने जून २०१८ मध्ये तिचा युपीएससी तयारीचा प्रवास सुरू केला आणि इतिहास हा तिचा पर्यायी विषय म्हणून ठेवला.ती रोज एक – दोन तास वर्तमानपत्र वाचायची आणि स्वतःच्या नोट्स तयार करायची. तिने कधीही साप्ताहिक वाचन चुकवले नाही आणि मुख्यतः मॉक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले. तिने स्वत:साठी कमी वेळेत आणि दीर्घकालीन अभ्यासाची उद्दिष्टेही तयार केली. ज्याचे पालन तिने तिच्या संपूर्ण तयारीच्या प्रवासात केले.तिची पद्धत आणि रणनीती पूर्णपणे नियोजित होती. त्यामुळेच ती पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. तिचा २८वा रॅंक आला.

तिने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केले तेव्हा ती २२ वर्षांची होती. त्यामुळे तिला देशातील सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. सध्या ती पंजाब केडरची आयएएस अधिकारी आहे आणि मोहालीच्या एसडीएम म्हणून नियुक्त आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गावची लेक फौजदार बनते तेव्हा साऱ्या गावाला अभिमान वाटतो; वाचा अश्विनीच्या यशाची कहाणी !

MPSC Success Story : आश्विनी शिवाजी वनवे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, …

NCERT मार्फत विविध पदांसाठी भरती ; पगार 60000 पर्यंत मिळेल..

NCERT Recruitment 2024 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …