Cooking Hacks: पुऱ्या फुगतच नाहीत? मग पुरी करताना मिसळा ही गोष्ट…टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार!

Smart Kitchen Tips: जेवण बनवणं ही एक कला आहे (Cooking is an art) . सर्वानाच स्वादिष्ठ पक्वान्न बनवणं शक्य होत नाही. जेवण बनवताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं असत.

बऱ्याचदा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे जेवण आणखी स्वादिष्ट होऊ शकत किंवा काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करता येतात. म्हणून काही कुकिंग टिप्स (cooking tips) आपल्या जेवणात मदत करतात.

पुरी बनवणं तास वर वर पाहता खूप सोपं वाटतं पण हे सुद्धा एक अवघड काम आहे कारण पुऱ्या कधी खूपच वाटत होऊन जातात तर कधी खूपच कडक होतात. आणि मग  पण काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही परफेक्ट टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवू शकता . (how to make perfect puri)

परफेक्ट पुऱ्या बनण्यासाठी कणिक मळण्यापासून ते तळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करणं खूप महत्वाचं आहे.अश्याने पुऱ्या छान फुगत आणि खायला खूप सुंदर लागतील… 

आणखी वाचा : cooking tips : पुऱ्या तळताना खूप तेल सोकतात का? ‘या’ टिप्स वापरा…पुऱ्या होतील ऑइल फ्री

हेही वाचा :  Naked People In Village : या गावात बायका मुलांसह सगळेच निर्वस्त्र फिरतात...अंगावर एकही कपडा ठेवत नाहीत...

पुऱ्या करणं आता खूप अवघड काम नाही आहे , प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी काही अश्या टिप्स सांगितल्या आहेत ज्या वापरून तुम्ही उत्तम पुऱ्या बनवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अश्याच काही हटके किचन टिप्स आणि कूकिंग हॅक्स विषयी.

सर्वात महत्वाची टीप म्हणजे पुऱ्या बनवताना जी कणिक मळता ती चपातीच्या कणकेप्रमाणे सैर किंवा मऊ नसावी थोडी घट्ट कणिक पुऱ्यांसाठी मळायची आहे.  

पुऱ्याची कणीक घट्टसर भिजवायचेय म्हणून पाणी घालताना थोडं जपून कमी कमी घाला एकदम खूप पाणी घातलात तर पीठ खूप मऊ होऊन जाईल. आणि पुऱ्या करणं खूप अवघड होऊन जाईल. 

पुऱ्या चांगल्या फुगण्यासाठी कणिक मळल्यावरत्यावर एक ओला कापड घालून काही वेळ ठेवावा. (dough making for puri)

आता कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि त्यावर तेल ओतून ठेवा अश्याने कणकेचे गोळे कडक होणार नाहीत आणि फुटणार नाहीत. 

पुऱ्या लाटण्याचे लाटणे एकदम स्वच्छ असेल याची खातरजमा करून घ्या. यासाठी लाटण्यावर सुद्धा तेल लावून घ्या. 

पुरी सर्व बाजूने एकसारखी लाटली जाईल याची खात्री करा  मुख्यतः पुरीचे काठ सर्व एकसारखे लाटा. अश्याने पुरी छान फुगते. 

हेही वाचा :  Bank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?

पुरी तळताना मोठ्या गॅसवरच टाळल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे पुरी ला सर्व बाजूने हीट लागून ती व्यवस्थित फुगते. 

पुरी तळत असताना दाबून गोल गोल फिरवावी त्यामुळेदेखील पुरी टम्म फुगू लागते. 

चला तर मग, या टिप्स वापरून गोलमटोल मस्त फुगलेल्या पुऱ्या बनवून घ्या आणि सर्वांची वाहव्वा मिळवा… 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …