Breaking News

पदवीच्या तिसर्‍या वर्षीपासून केली यूपीएससीची तयारी आणि झाली आयएएस अधिकारी !

UPSC IAS Success Story : डॉ. अक्षिता गुप्ता ही मूळची चंदिगडची असून तिचे वडील पवन गुप्ता पंचकुलातील वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात प्राचार्य आहेत. तर तिची आई मीना गुप्ता या सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात गणिताच्या लेक्चरर आहेत.

उल्लेखनीय बाब अशी की, आयएएस अधिकारी अक्षिता ही यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होती. डॉ.अक्षिताने २०२० मध्ये तिच्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ६९वी रँक मिळविली.

IAS अधिकारी अक्षिताने तिसऱ्या वर्षी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली होती. महाविद्यालयीन आयुष्यातील सर्वात रिकामा वेळ युपीएससी परीक्षेची तयारी करण्यात घालवायची. अक्षिता गुप्ता ही वैद्यकीय विद्यार्थिनी असल्याने तिने मुख्य परीक्षेत वैद्यकशास्त्र हा पर्यायी विषय निवडण्याचा निर्णय घेतला होता.

या परिक्षेच्या तयारीचा भाग म्हणून तिने सर्व वैद्यकीय विषयाची सर्व पुस्तके वाचली. तिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. अक्षिता गुप्ता हॉस्पिटलमध्ये १४ तास काम करत होत्या आणि १५ मिनिटांच्या ब्रेकमध्येही परीक्षेचा अभ्यास करत होत्या. सतत वाचन केले पाहिजे, सातत्याने कामात राहिले पाहिजे या उद्देशाने कष्टाने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. सध्या, त्या पंजाबमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा :  राजेश अंधारे यांचे MPSC च्या परीक्षेत दुहेरी यश !

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कठीण परिस्थितीचा सामना करत रंगकाम करणाऱ्याची लेक बनली उद्योग निरीक्षक!

MPSC Success Story : कोणत्याही सुख सोयीचे वातावरण नसतानाही रूपाली तुकाराम कापसे हिने बारावी पासूनच …

चांगल्या पगाराची नोकरी सोडून घेतला UPSC परीक्षेचा ध्यास आणि परमिता झाली यशस्वी !

UPSC Success Story : खरंतर आयुष्याच्या वळणावर प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असतो. तसेच परमिताने एक धाडसी …