Tag Archives: entertainment

Fighter : हृतिक-दीपिका पहिल्यांदाच एकत्र,’फायटर’च्या शूटिंगला सुरुवात

Fighter : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फायटर’ (Fighter) असे या सिनेमाचे नाव आहे. हृतिकच्या वाढदिवशी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सोशल मीडियावरदेखील या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.  हृतिक-दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘फायटर’ सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. …

Read More »

आई कुठे काय करते : मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील कलाकारबद्दल जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक होतात. पण आता एक कलाकार मालिकेतून एक्झिट घेणार आहे. मालिका सोडण्याचा निर्णय घेणारी ही दुसरी अभिनेत्री आहे. या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागरने आता एक्झिट घेतली होती. यानंतर आता अरूंधतीच्या अगदी …

Read More »

“२ नाही ४ पेन किलर घ्याव्या लागल्या…”, आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची केआरकेने उडवली खिल्ली

‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट आज २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. तर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच चर्चेत राहिला होता. तर अभिनेता कमाल आर खानने या चित्रपटाचे समिक्षण करत रिव्ह्यू दिला आहे. केआरकेने त्याच्या …

Read More »

‘विक्रम वेधा’तला सैफचा लूक पाहून करीना म्हणाली, “माझा पती आधीपेक्षा…”

‘विक्रम वेधा’ या चित्रपटात हृतिक रोशन आणि सैफ अली खान पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सैफचे लाखो चाहते आहेत. सैफ लवकरच अभिनेता हृतिक रोशनसोबत विक्रम वेधा या चित्रपटात दिसणार आहे. तर सैफ आणि हृतिक मोठया पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, विक्रम म्हणजेच सैफचा फस्ट लूक हृतिकने सोशल मीडियावर शेअर केला …

Read More »

Udayanraje : ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात उदयनराजेंची फिल्मी स्टाईल एन्ट्री

Udayanraje :  भाजपचे खासदार उदयनराजे (Udayanraje) त्यांच्या हटके स्टाईलमुळे प्रसिद्ध आहेत. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने निलेश साबळेच्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे साताऱ्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उदयनराजेंनी फिल्मी स्टाईल एन्ट्री केली आहे.  उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात नागराज मंजुळेच्या आगामी झुंड सिनेमाच्या टीमने हजेरी लावली होती. कार्यक्रमात उदयनराजेंनी ‘पुष्पा’ सिनेमातील डायलॉगदेखील मारले. दरम्यान ते …

Read More »

Riteish Deshmukh : रितेश देशमुख एमएक्स टकाटकवर करणार बॉलिवूड-स्टाईल एन्ट्री

Riteish Deshmukh : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) एमएक्स टकाटकवर बॉलिवूड-स्टाईल एन्ट्री करणार आहे.  एमएक्स टकाटक हा भारतातील एक व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आता अभिनेता रितेश देशमुखची एन्ट्री होणार आहे.  रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियावर तो छोटे-छोटे व्हिडीओ बनवून चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता तो  एमएक्स टकाटक वरदेखील हे व्हिडीओ शेअर करणार आहे. रितेश देशमुख म्हणाला,”अभिनय …

Read More »

“हिरोला नग्न दाखवू शकत नाही…, स्त्रीला नग्न दाखवले तर…”; स्मिता पाटील यांचं न्यूड पोस्टरवर वक्तव्य

स्मिता पाटील यांनी ‘चक्रा’ या चित्रपटातील त्यांच्या सेमी न्यूड पोस्टरवर हे वक्तव्य केले होते. आपल्या सशक्त अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. सशक्त व उत्तम अभिनयाच्या जोरावर स्मिता पाटील यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. स्मिता यांनी ८० हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी फक्त हिंदी नाही तर बंगाली, …

Read More »

Taarak Mehta On Netflix : ‘तारक मेहता का छोटा चष्मा’ येणार नेटफ्लिक्सवर

Taarak Mehta On Netflix : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका 24 फेब्रुवारी 2022 पासून ‘तारक मेहता का छोटा चष्मा’ (Taarak Mehta Ka Chota Chashmah) या नावाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाणार आहे. ही मालिका ‘अॅनिमेटेड’ स्वरूपात असणार आहे.  अॅनिमेटेड मालिकेत गोकुळधाम सोसायटीतीत सर्व पात्रे अनोख्या कॉमिक अवतारात दाखवली आहेत. त्यामुळे …

Read More »

सोनू निगमने बीएमसी प्रमुख इक्बाल सिंघ चहल यांच्या चुलत भावावर केला गैरवर्तनाचा आरोप

Sonu Nigam : पद्मश्री सोनू निगम (Sonu Nigam) हा देशातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक आहे. जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच एक घटना घडली आहे. आता सोनू निगम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोनू निगमने बीएमसी प्रमुख इक्बाल सिंघ चहल यांच्या चुलत भावावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे.  सोनूच्या एका सूत्राने स्पष्ट केले आहे की, सोनूला इक्बाल सिंघ चहल यांच्याकडून एक पत्र …

Read More »

Jhund Trailer : बिग बींचा स्वॅग, आकाशचा लफडा.. ‘झुंड’चा ट्रेलर लॉंच

Jhund Trailer : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बहुप्रतिक्षित ‘झुंड’ (Jhund) सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. ट्रेलरमध्ये बिग बी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी (Nagraj Manjule) केले आहे.  फुटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा  ‘झुंड’ सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक क्रिडा विषयक सिनेमा आहे. सिनेमात अमिताभ बच्चन …

Read More »

“…झुकेगा नहीं”, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चे चाहते झाले उदयनराजे भोसले; पाहा व्हिडीओ

उदयनराजे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचा उद्या २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या उपस्थितीत ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उदयनराजे यांची हटके स्टाईल ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तर त्यांना या कार्यक्रमात पाहत असताना त्यांच्या चाहत्यांनी पुष्पाचा डायलॉग म्हणण्याची विनंती केली. गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य …

Read More »

Aditya Narayan : आदित्य नारायण लवकरच होणार बाबा, भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाला…

Aditya Narayan : आदित्य नारायण (Aditya Narayan) – श्वेता अग्रवालच्या (Shweta Agarwal) घरी लवकरच  बाळाचं आगमन होणार आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. त्या फोटोत दोघेही आनंदी दिसत होते. आता आदित्यने त्याच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.  आदित्य नारायणने वडिलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले आहे,”माझे बाबा, माझे पहिले आणि कायमस्वरूपीचे हिरो…आणि आता कोणत्याही …

Read More »

अमृता फडणवीसांचा नवा अवतार, शिव तांडव स्त्रोतम ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Amruta Fadnavis Song :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ला त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी त्यांच्या आगामी ‘शिव तांडव स्त्रोतम’ या गाण्याचे पोस्टर रिलीज केले आहे. हे गाणे 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार …

Read More »

Kacha Badam : शेंगदाणे विकता विकता रातोरात सेलिब्रिटी झाला कच्चा बदामचा गायक

Kacha Badam : सोशल मीडियावर सध्या ‘कच्चा बदाम’ (kacha badam) गाण्याने धुमाकूळ घातला आहे. सर्वसामान्यांपासून बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण ‘कच्चा बदाम’वर थिरकताना दिसत आहेत. या गाण्यावर भन्नाट रिल्स आणि व्हिडीओदेखील बनत आहेत. हे गाणे भुवन बडायकरने (Bhuban Badyakar) गायले आहे. भुवन हा एक शेंगदाणे विक्रेता आहे. पण ‘कच्चा बदाम’ या गाण्यामुळे तो रातोरात सेलिब्रिटी झाला आहे. त्याला अनेक ऑफर्स मिळू …

Read More »

The Family Man 3 : ‘द फॅमिली मॅन 3’ ची प्रतीक्षा संपली

The Family Man 3 : मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिनेमांसोबत त्यांनी अनेक वेबसीरिजमध्येदेखील काम केले आहे. त्यांची ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. ‘द फॅमिली मॅन’ चे दोन सीझन यशस्वी झाल्यानंतर प्रेक्षक ‘द फॅमिली मॅन 3’ (The Family Man 3) वेबसीरिजची प्रतीक्षा करत होते. आता या वेबसीरिज संदर्भात एक मोठी अपडेट आली …

Read More »

The Good Maharaja : ‘द गुड महाराजा’ लवकरच होणार प्रदर्शित, संजय दत्त दिसणार मुख्य भूमिकेत

The Good Maharaja : अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही बिग बजेट ऐतिहासिक सिनेमे बनवले जात आहेत. असाच एक बिग बजेट ऐतिहासिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द गुड महाराजा’ (The Good Maharaja) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt) मुख्य भूमिकेत आहे.  ‘द गुड महाराजा’ सिनेमाची कथा काय आहे?‘द गुड …

Read More »

अरुंधतीकडून घराचा हिस्सा परत घेण्यासाठी संजना आणि आई येणार एकत्र, मालिकेत येणार नवा ट्विस्ट

‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अरुंधती हे पात्र तर जसं सगळ्यांना आपलं आपलसं वाटायला लागलं आहे. अरुंधतीचा फक्त लूक बदलला नाही तर ती आता स्वत: च्या पायावर देखील उभी राहिली आहे. पण सध्या …

Read More »

Bheemla Nayak Trailer : ‘भीमला नायक’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Bheemla Nayak Trailer : दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) सध्या ‘भीमला नायक’ (Bheemla Nayak) सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘भीमला नायक’ हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याला चार दिवस बाकी असतानाच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.  ‘भीमला नायक’ सिनेमात पवन कल्याण पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. पवन …

Read More »

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण; डेब्यू करण्यासाठी सज्ज

Aryan Khan Debut : शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो लवकरच एका चित्रपटाचे किंवा वेब सीरिजचे लिखन करणार आहे. पिंकविला रिपोर्टनुसार, आर्यन वेब-सीरिजबद्दल एका ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत चर्चा करत आहे आणि तो एका फीचर फिल्मवरही काम करत आहे. ही फिल्म शाहरूखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसद्वारे तयार केली जाणार आहे. …

Read More »

धुमधडाक्यात लग्न केलं, मात्र नात्यात मिळाला मोठा धोका! आजही एकट्याच राहतात ‘या’ अभिनेत्री

Celebrity Divorce : प्रेम, लग्न आणि घटस्फोट हे तसं मनोरंजन विश्वासाठी काही नवं नाही. बॉलिवूड कॅरिडॉरमध्ये रोज वेगवेगळ्या चर्चा सुरूच असतात. अनेक कलाकारंची अफेअर्स, नाती, लग्न सगळंच यात चर्चिलं जातं. सेलिब्रिटींची लग्न देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. मोठमोठे सोहळे, डोळे दिपवणारी रोषणाई, लग्नाच्या विविध पद्धती यामुळे ही लग्न सर्वसामान्य चाहत्यांच्या देखील लक्षात राहतात. अशीच काही बॉलिवूड अभिनेत्रींची लग्न वारेमाप खर्चांमुळे सर्वांच्याच …

Read More »