Kacha Badam : शेंगदाणे विकता विकता रातोरात सेलिब्रिटी झाला कच्चा बदामचा गायक

Kacha Badam : सोशल मीडियावर सध्या ‘कच्चा बदाम’ (kacha badam) गाण्याने धुमाकूळ घातला आहे. सर्वसामान्यांपासून बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण ‘कच्चा बदाम’वर थिरकताना दिसत आहेत. या गाण्यावर भन्नाट रिल्स आणि व्हिडीओदेखील बनत आहेत. हे गाणे भुवन बडायकरने (Bhuban Badyakar) गायले आहे. भुवन हा एक शेंगदाणे विक्रेता आहे. पण ‘कच्चा बदाम’ या गाण्यामुळे तो रातोरात सेलिब्रिटी झाला आहे. त्याला अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत. 

‘कच्चा बदाम’ गाण्याचा इतिहास काय आहे?
भुवन बडायकर शेंगदाणे विकताना ‘बदाम… बदाम… कच्चा बदाम’ असे म्हणायचा. भुवन बडायकर असे या शेंगदाणा विक्रेत्याचे नाव आहे. भुवन बडायकर हे पश्चिम बंगालमधील कुरलजुरी या गावचे रहिवासी आहेत. पश्चिम बंगालमध्ये बदामाला ‘कच्चा बदाम’ म्हणतात. भुवन शेंगदाणे विकताना ‘बदाम… बदाम… कच्चा बदाम’ असं त्याच्या शैलीमध्ये गायचा. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी यावर रिल्स आणि व्हिडीओही बनवले. त्यानंतर या गाण्याचं आता रॅप वर्जनमध्ये गाणं आलं आहे. तेही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे.

भुवन एकेकाळी शेंगदाणे विकत गावोगावी फिरत असे. पण ‘कच्चा बदाम’ या गाण्याने भुवनला लोकप्रियता मिळाली. तसेच त्याला अनेक ऑफर्सदेखील मिळत आहेत. 50 वर्षांच्या भुवनची सध्या सर्वत्र चर्चा आहे. इन्स्टाग्रामवर अनेकांनी ‘कच्चा बदाम’ गाण्यावर रील्स बनवल्या आहेत. यात अनेक सेलिब्रिटींचादेखील समावेश आहे.

हेही वाचा :  बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतला आवडला शाहरुखचा 'पठाण'?

 

संबंधित बातम्या

डिजिटल पद्धतीने शेतीसाठी आमिर खान आग्रही; सोयाबिन डिजिटल शेती शाळा कार्यक्रमात म्हणाला…

The Family Man 3 : ‘द फॅमिली मॅन 3’ ची प्रतीक्षा संपली, या वर्षाच्या अखेरीस येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sher Shivraj : शिवरायांची कीर्ती पुन्हा दुमदुमणार! फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर ‘शेर शिवराज’ येणार रुपेरी पडद्यावर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Digambar Naik : दिगंबर नाईकचं ‘बाई वाड्यातून जा’ नवं नाटक रंगभूमीवर

Digambar Naik : आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता दिगंबर नाईक (Digambar Naik) …

‘या’ आठवड्यात तुम्ही कोणता सिनेमा पाहणार?

Movie Release This Week : सिनेरसिक चांगल्या सिनेमांची नेहमीच प्रतीक्षा करत असतात. येत्या शुक्रवारी अनेक …