अमृता फडणवीसांचा नवा अवतार, शिव तांडव स्त्रोतम ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Amruta Fadnavis Song :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ला त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी त्यांच्या आगामी ‘शिव तांडव स्त्रोतम’ या गाण्याचे पोस्टर रिलीज केले आहे. हे गाणे 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी शंकराच्या अवतारातील स्वत:चा फोटो शेअर करत नव्या गाण्याची घोषणा केली होती. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले होते,”मी तुझी निवड आता कायमस्वरुपी केली आहे. तू माझ्या हृदयात, मनात आणि श्वासातही आहेस. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा आपल्या जवळच्या व्यक्तींच्या प्रेमासाठी ओळखला जातो. त्यादिवशी मी माझ्या रुद्राला एक संगीतमय प्रार्थना अर्पण करते.”

मंगळवारी त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये अमृता फडणवीस शंकराच्या अवतारात दिसत आहेत. अमृता फडणवीसांचे हे नवे गाणे भोलेनाथवर आधारित आहे. हे गाणे अमृता फडणवीसांनी गायले असून शैलेश दाणीने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. ‘शिव तांडव स्त्रोतम’ असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता फडणवीसांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या 

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Kacha Badam : शेंगदाणे विक्रेता ते सेलिब्रिटी, शेंगदाणे विकता विकता रातोरात सेलिब्रिटी झाला कच्चा बदामचा गायक

The Good Maharaja : ‘द गुड महाराजा’ लवकरच होणार प्रदर्शित, संजय दत्त दिसणार मुख्य भूमिकेत

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उदयपुर प्रकरणावर ट्वीट केल्याने स्वरा भास्कर झाली ट्रोल, अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

Swara Bhasker : उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. या …

100 Days Of RRR : राजामौलींच्या ‘आरआरआर’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर शंभरी

100 Days Of RRR : एसएस राजामौलींच्या (SS Rajamaouli) ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाने रिलीजनंतर अनेक …