‘ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारा’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्या महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने ट्रान्सजेंडर विद्यार्थी शिक्षण घेतात, अशा ठिकाणी त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही ‘ट्रान्सजेंडर’ विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना सूचित केले आहे.

शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये ट्रान्सजेंडर विद्यार्थी विविध विद्याशाखांमध्ये शिकतात. या विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह वापरताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सामान्य विद्यार्थ्यांकडून अनेकदा या विद्यार्थ्यांची अवहेलना केली जाते. स्वच्छतागृहाच्या मुद्द्यावर अनेकदा ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना अपमानाला सामोरे जावे लागते. गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना निदर्शनास आल्याने ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या सामाजिक अडचणी सोडवण्याकरता त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करावी, अशा सूचना उच्च शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

ज्या महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहे नसतील, त्यांनी तातडीने स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. इतर सामान्य विद्यार्थ्यांमध्ये या संवेदनशील मुद्द्याबद्दल जनजागृती करावी, असे आवाहनही शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना एकटेपणा वाटू नये, यासाठी सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा, असेही उच्च शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत या विद्यार्थ्यांना वर्गात बसू न देणे, दिल्यास वेगळे बसवणे अशी कृत्ये महाविद्यालयांनी करू नयेत, असेही शिक्षण विभागाने नमूद केले आहे.

हेही वाचा :  दिवाळीतील सुट्टीनंतर महाविद्यालये गजबजली

दहावी, बारावी परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक नाहीच; बोर्डाने केले स्पष्ट

दहावी-बारावी परीक्षांसाठी मोठ्या खोल्यांमध्ये झिग-झॅग बैठक
उच्च शिक्षणाला ऑफलाइन मुभा; यूजीसीच्या सूचना

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …