आनंद महिंद्रांनी एक व्हायरल व्हिडीओ ट्वीट केला असून त्यासोबत “हाऊज द जोश” अशी कॅप्शन दिली आहे.
महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा आणि त्यांचे ट्वीट हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नुकतंच आनंद महिंद्रांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ‘सुखी वैवाहिक आयुष्यासाठी एकमेकांसोबत बोलण्याची गरज नसते’, असा संदेश देणारा व्हायरल व्हिडीओ शेअर केला होता. सोमवारी त्यांनी अजून एक व्हायरल व्हिडीओ शेअर करून त्यावर कॅप्शन टाकली आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एका बदकानं किमान ७ ते ८ बैलांशी पंगा घेतल्याचं दिसतंय. हेच आपलं मंडे मोटिव्हेशन आहे, असं आनंद महिंद्रा या ट्वीटमध्ये म्हणत आहेत.
हाऊज द जोश?
आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हायरल व्हिडीओसोबत त्यांनी एक कॅची कॅप्शन दिली आहे. “हाऊज द जोश बर्ड? हाय सर, अल्ट्रा हाय. त्या पक्ष्याची हिंमत माझ्यासाठी प्रोत्साहन आहे”, असं आनंद महिंद्रा या कॅप्शनमध्ये म्हणाले आहेत. हे ट्वीट लागलीच व्हायरल होऊ लागलं.
“यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी…”, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ! म्हणाले, “शब्दांविना…”
काय आहे या व्हिडीओमध्ये?
हा एक फक्त ८ सेकंदंचा व्हिडीओ असून तो तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटंसं बदक किमान ७ ते ८ बैलांशी झुंज देताना दिसत आहे. एवढंच नाही, तर हे बदक त्या बैलांना ढुश्या मारत असून ते बैल देखील बदकाला घाबरून मागे सरत आहेत.
काही दिवसांपूर्वीच आनंद महिंद्रा यांनी वैवाहिक आयुष्यासंदर्भात ‘संदेश’ देणारा एक विनोदी व्हिडीओ शेअर केला होता. “शब्दांविना केलेला संवाद हा ५जी तंत्रज्ञानापेक्षाही जास्त पॉवरफुल असतो”, असं आनंद महिंद्रांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. या व्हिडीओमध्ये एक महिला किचनमध्ये भाजी कापताना दिसत आहे. तिच्या मागे एक पुरूष मोबाईलवर काहीतरी करताना दिसतोय. हे दोघे पती-पत्नी असल्याचं व्हिडीओमध्ये दिलेल्या कॅप्शनवरून समजतंय. पतीनं किचनमधलं काम थांबवल्याचं लक्षात येताच पत्नी जोरजोरात भाजी कापू लागते. ही बाब पतीला लक्षात येताच तो मोबाईल ठेऊन पुन्हा किचनमधील काम करू लागतो असं या व्हिडीओत दिसतंय. या व्हिडीओसोबत असलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, “एका यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी तुम्हाला एकमेकांसोबत बोलण्याची गरज नसते”!
हे ट्वीट देखील लागलीच व्हायरल झालं होतं.