भुवन बाम 14 वर्षे करतोय एकाच मुलीला डेट, या 3 गोष्टी नसत्या पाळल्या तर कधीच तुटलं असतं नातं

एका सामान्य घरातून आलेला आणि आज कोट्यवाधींच्या संपत्तीसह भारतातील सर्वात लाडका युट्यूबर ठरलेला डिजीटल क्रिएटर म्हणजे Bhuvan Bam होय. ‘Bibi ki vines’ या आपल्या युट्यूब चॅनेलमधून त्याने प्रवासाची सुरूवात केली आणि आज बीबी प्रोडक्शन हाऊस या नावाने त्याने स्वत:ची कंपनी उभी केली आहे. नुकतीच याच कंपनीद्वारे त्याने निर्मिती केलेली ‘Taza Khabar’ ही वेब सिरीज OTT वर प्रदर्शित झाली आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद देखील मिळाला. पण तुम्हाला माहित आहे का आज सर्वोच्च यश एन्जॉय करणारा हा कलाकार गेल्या 14 वर्षांपासून केवळ एकाच मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

पूर्वी परिस्थिती साधी होती आणि आता अगदीच भारी आहे. पण परिस्थितीनुसार त्याची गर्लफ्रेंड बदलली नाही. आजही तो त्याच मुलीवर मनापासून प्रेम करतो जिच्यावर काहीच हातात नसताना केलं होतं. भुवनने आजवर कधीच त्या मुलीची ओळख सांगितली नाही. पण अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार तिचे नाव Arpita Bhattacharya आहे. भुवनने अनेकदा आपल्या अनुभवातून काही रिलेशनशिप टिप्स (Tips To Balance Relationship) दिल्या, ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत! (फोटो सौजन्य :- भुवन बाम इंस्टाग्राम, Freepik, iStock)

हेही वाचा :  गुड न्यूज! 2 नवीन कोस्टल रोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार, नागरिकांचा प्रवास सोपा होणार

14 वर्षे रिलेशनशिप कसे टिकले?

14-

भुवन बामने आपल्या मुलाखतीत सांगितले की, रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर ते दोघे कधीही एकत्र राहिले नाहीत. त्यामुळे नात्यात नेहमीच स्पेस मेंटेन राहिला. दोघांना सुद्धा एकमेकांची कदर आहे आणि म्हणून ते एकमेकांना त्यांचा पर्सनल स्पेस नक्की देतात. तसेच, दोघेही एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे, ज्यामुळे ते एकमेकांना सतत सांभाळून घेत असतात आणि समजून घेत असतात.
(वाचा :- सासूही एक वात्सल्याने भरलेली आईच, पण तिने जे विचित्र कृत्य माझ्या बाळासोबत केलं ते बघून डोक्यात तिडीकच गेलीये)​

नात्यात कधी इगो आणू नये

नात्यात कधी इगो आणू नये

भुवन बाम सांगतो की, ओगो अर्थात अहंकार कधीच नात्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. एकदा का त्याचा प्रवेश झाला की तुमचं नातं बिघडलं समजा. अहंकार तुम्हाला स्वतःपेक्षा इतर कोणावरही प्रेम करू देत नाही किंवा समजून घेऊ देत नाही. त्यामुळे बहुतेक नाती बिघडतात. त्यामुळे केवळ आपल्या जोडीदाराच्या बाबतीतच नव्हे तर तुम्ही ज्यांना गमावू इच्छित नाही अशा लोकांसोबतच्या नात्यातही कधी अहंकार आणू नका. भुवन सांगतो की नाते जास्त काळ टिकवायचे असेल तर इगो कंट्रोल करा.

हेही वाचा :  भारत चांद्रयान-3 च्या तयारीत असतानाच चीनचा झटका; अवकाशात पाठवलं जगातील पहिलं मिथेनवर उडणारं रॉकेट

(वाचा :- Aamir Khanचं दोन्ही Ex-Wives सोबत आजही घट्ट नातं, Mr. Perfectionist चे लग्नाबाबत विचार ऐकून अक्षरश: थक्क व्हाल)​

एकमेकांच्या गोष्टी नीट ऐका

एकमेकांच्या गोष्टी नीट ऐका

जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर पहिली गोष्ट म्हणजे एकमेकांचे ऐकायला शिकणे होय. जेव्हा ती तुमच्याशी बोलत असेल तेव्हा तुम्ही शांतपणे तिचे म्हणणे ऐकले पाहिजे असे भुवन सांगतो आणि होच गोष्ट मुलीला देखील लागू होते. अशा प्रकारे, दोघे मिळून नात्यातील कोणत्याही कठीण टप्प्यावर सहज मात करू शकतात. भुवन बामच्या मते, जे प्रकरण ऐकून सोडवता येते, ते बोलून सोडवता येत नाही.
(वाचा :- लग्नानंतरही पुरूष का होतात दुस-या महिलांकडे आकर्षित? अखेर समोर आली 5 धक्कादायक खरी कारणं, पायाखालची जमिन सरकेल)​

सेल्फ रिस्पेक्टला महत्त्व द्या

सेल्फ रिस्पेक्टला महत्त्व द्या

भुवन बाम सांगतो की, नात्यात अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वाभिमानाशी तडजोड करावी लागते. नातं वाचवण्यासाठी आणि जोडीदाराला सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी लोक स्वाभिमान सोडायलाही मागेपुढे पाहत नाहीत. पण नेहमी लक्षात ठेवा खरा प्रेमळ जोडीदार तुम्हाला कधीच अशा टप्प्यावर येऊ देत नाही. जर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीसोबत असाल ज्याच्यामुळे तुम्हाला स्वाभिमानाशी तडजोड करायला लागत असेल तर तुम्ही असे नाते संपवलेले चांगले!

हेही वाचा :  वयाच्या 50 व्या वर्षीही विशीतील वाटाल, नितळ त्वचेसाठी थंडीत या ५ क्रिमचा वापर करा

(वाचा :- धडधाकट पुरूष असूनही मी बायकोला आवरू शकत नाही याची लाज वाटू लागलीये,पुरूषाचा जन्म घेतला यात चूक आहे का हो माझी?)​

संवाद सोडू नका

संवाद सोडू नका

भुवन शेवटी एक टीप देताना म्हणतो की, “आमचे नाते एवढी वर्षे टिकले आहे कारण आम्ही कधीच आमच्या संवादात खंड पडू दिला नाही. आम्ही नेहमी एकमेकांशी बोलत असतो. मग भले वाद झाले तरी आम्ही एकमेकांशी बोलतो, भांडतो. तुम्ही जेव्हा एकमेकांशी बोलणे थांबवता तेव्हा ती तुमच्या नात्याच्या शेवटाची सुरुवात असते.
(वाचा :- काय आहे रिलेशनशिपचा 3 Month Rule? ब्रेकअपनंतर फॉलो केल्यास नवीन पार्टनर मिळाल्यावर सोन्याहून पिवळं होईल नातं.!)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Political News : ना भोंगा फिरवणारी रिक्षा, ना पथनाट्य कलावंतांचा टेम्पो.. ना रॅली ना …

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले ‘जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला…’

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी …