Aditya Narayan : आदित्य नारायण लवकरच होणार बाबा, भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाला…

Aditya Narayan : आदित्य नारायण (Aditya Narayan) – श्वेता अग्रवालच्या (Shweta Agarwal) घरी लवकरच  बाळाचं आगमन होणार आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. त्या फोटोत दोघेही आनंदी दिसत होते. आता आदित्यने त्याच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. 

आदित्य नारायणने वडिलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले आहे,”माझे बाबा, माझे पहिले आणि कायमस्वरूपीचे हिरो…आणि आता कोणत्याही क्षणी मीदेखील बाबा होऊ शकतो”. आदित्यने शेअर केलेल्या फोटोत तो खूपच गोंडस दिसत आहे. याआधी आदित्यने सोशल मीडियावर श्वेतासोबतचे फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘श्वेता आणि मी लवकरच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहोत.
2020 मध्ये आदित्य आणि श्वेता अडकले होते लग्नबंधनात 

आदित्य आणि श्वेता यांनी ‘शपित’ (2010) या सिनेमात एकत्र काम केले होते. इथूनच दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. आदित्य आणि श्वेता यांनी जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर त्यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले होते.

हेही वाचा :  Kacha Badam : शेंगदाणे विकता विकता रातोरात सेलिब्रिटी झाला कच्चा बदामचा गायक

संबंधित बातम्या

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचा नवा अवतार, शिव तांडव स्त्रोतम ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Kacha Badam : शेंगदाणे विक्रेता ते सेलिब्रिटी, शेंगदाणे विकता विकता रातोरात सेलिब्रिटी झाला कच्चा बदामचा गायक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लता मंगेशकरांच्या आठवणींना उजाळा देत उषा मंगेशकर म्हणाल्या…

Lata Mangeshkar First Income Story : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी 6 फेब्रुवारी …

सिद्धार्थ -कियारा अडकणार विवाहबंधनात, बालमैत्रिण ईशा आंबानी पतीसह पोहोचली लगीनघरी 

kiara advani sidharth malhotra wedding   : बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी …