Udayanraje : ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात उदयनराजेंची फिल्मी स्टाईल एन्ट्री

Udayanraje :  भाजपचे खासदार उदयनराजे (Udayanraje) त्यांच्या हटके स्टाईलमुळे प्रसिद्ध आहेत. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने निलेश साबळेच्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे साताऱ्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उदयनराजेंनी फिल्मी स्टाईल एन्ट्री केली आहे. 

उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात नागराज मंजुळेच्या आगामी झुंड सिनेमाच्या टीमने हजेरी लावली होती. कार्यक्रमात उदयनराजेंनी ‘पुष्पा’ सिनेमातील डायलॉगदेखील मारले. दरम्यान ते म्हणाले, मी झुकतो ते फक्त लोकांसाठीच. लोकांना जोडण्याचे काम मी केले आहे. ‘पुष्पा’ सिनेमातून मी हाच बोध घेतला आहे. 

‘चला हवा येऊ द्या’चा आगामी भाग खूपच खास असणार आहे. याआधी अनेकदा उदयनराजे शर्टाची कॉलर उडवत ‘पुष्पा’ सिनेमातील डायलॉग मारताना दिसून आले आहेत. पण ‘चला हवा येऊ द्या’च्या कार्यक्रमात उदयनराजेंच्या फिल्मी स्टाईल एन्ट्रीमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली आहे. 

सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘झुंड’ची टीम ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर

‘झुंड’ सिनेमाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात मेगास्टार अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. ‘झुंड’ सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक क्रिडा विषयक सिनेमा आहे. हा सिनेमा फुटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. सध्या ‘झुंड’ सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘झुंड’ सिनेमाची टीम ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आली होती. 

हेही वाचा :  ‘केजीएफ चॅप्टर 2’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, ‘तुफान’ पाहून वाढली प्रेक्षकांची उत्सुकता

संबंधित बातम्या

Udayanraje On Pushpa : उदयनराजेंची हटके स्टाईल, ‘पुष्पा’चा डायलॉग मारत पुन्हा एकदा उडवली कॉलर

Gangubai Kathiawadi : गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Mahesh Manjrekar : ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ सिनेमामुळे महेश मांजरेकरांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …