Tag Archives: entertainment

Maharashtra Shahir : यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेत दिसणार अतुल काळे

Kedar Shinde On Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या (Kedar Shinde) ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या सिनेमात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chauhan) यांच्या भूमिकेत अतुल काळे (Atul kale) दिसणार आहेत.  आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे …

Read More »

विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा, व्हेंटिलेटरही हटवण्याची शक्यता

vikram gokhale: पुण्याच्या (Pune) दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे, ते डोळे उघडत आहेत तसेच त्यांच्या हात आणि पायांची देखील हलचाल होत आहे. पुढील 48 तासांत  व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया ही स्थिर आहे.’ असं शिरीष …

Read More »

अभिनेता प्रियांशू क्षत्रियला अटक; दागिने आणि रोकड चोरल्याचा आरोप

Priyanshu Kshatriya: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेल्या “झुंड” (Jhund) या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रियांशू क्षत्रिय (Priyanshu Kshatriya) याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर शहर पोलिसांनी गुरुवारी (24 नोव्हेंबर) दिली. प्रियांशू हा 18 वर्षाचा आहे.  मानकापूर भागातील रहिवासी प्रदीप मोंडवे यांनी त्यांच्या घरातून 5 लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची तक्रार …

Read More »

Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हेंचं ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Amol Kolhe On Shivputra Sambhaji : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हेंनी आजवर अनेक ऐतिहासिक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता अमोल कोल्हेंनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ‘शिवपुत्र संभाजी’ (Shivputra Sambhaji) या महानाट्याच्या माध्यमातून ते आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  डॉ. …

Read More »

रतन टाटांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार; प्रमुख भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता?

Ratan Tata: ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हे भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर रतन टाटा यांचे आयुष्य मांडण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा (Sudha Kongara) या रतन टाटा यांच्या बायोपिकचे (Ratan …

Read More »

‘माझा भाऊ…’; रितेश आणि जिनिलियाच्या ‘वेड’ चित्रपटासाठी अक्षय कुमारची खास पोस्ट

Ved Teaser: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)  आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रितेश आणि जिनिलिया यांचा वेड (Ved) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काल रिलीज झाला. या टीझरला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रितेश आणि जिनिलिया यांच्या वेड या चित्रपटाला आता अभिनेता अक्षय कुमारनं (Riteish …

Read More »

Drishyam 2 Box Office Collection : अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील

Drishyam 2 Box Office Collection : ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) मुख्य भूमिकेत आहे. आता या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या दोन वर्षात अजयचा सुपरहिट होणारा हा तिसरा सिनेमा आहे.  ‘दृश्यम 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका ‘दृश्यम 2’ हा सिनेमा 18 नोव्हेंबरला …

Read More »

Happy Birthday Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत!

Rakhi Sawant : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) आज 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या बेधडक वक्तव्याबद्दल राखी कायम चर्चेत असते. राखीचे खरे नाव नीरू भेडा असं आहे. पण इंडस्ट्रीत आल्यानंतर तिने तिचं नाव बदललं आणि राखी सावंत असं ठेवलं.  राखीला ‘कॉन्ट्रोवर्सी क्वीन’ असेही म्हटले जाते. कारण जगातील कोणत्याही गोष्टीवर तिला तिचं मत मांडायचं असतं. पण तिची …

Read More »

केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी पुरुषांना हटके सल्ला, म्हणाले आनंदी राहयचं असेल तर ‘बायको जे बोलेल…’

छोट्या पडदयावरील बहूचर्चित रिअ‍ॅलिटी शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. सध्या या कार्यक्रमाचा 14 वा सिजन सुरु आहे. या सेटवरती खूप गंमती जमती होत असतात. अशात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात त्यांनी एका स्पर्धकाला खास सल्ला दिला. बिरेन नावाच्या स्पर्धकाला बिग बी यांनी हा सल्ला दिला आहे. यावेळी बिरेनने सांगितले त्यांनी त्यांच्या पत्नीसमोर एक अट ठेवली होती. की जर मला अमिताभ यांच्यासमोर …

Read More »

रिचा चड्ढानं मागितली माफी; गलवान ट्वीट प्रकरणावर सोडलं मौन

Richa Chadha: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha)  ही तिच्या ट्वीटमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या रिचा तिच्या एका ट्वीटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पीओके संदर्भात एक ट्वीट केलं. या ट्वीटला रिप्लाय करत रिचानं लिहिलं,‘गलवानने HI म्हटलंय’. रिचानं केलेल्या या  रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. गलवानचा उल्लेख ट्वीटमध्ये करुन भारतीय सैन्याचा अपमान रिचानं …

Read More »

कमल हसन रुग्णालयात दाखल; चेन्नईमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

Kamal Haasan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांना  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  23 नोव्हेंबर रोजी त्यांना श्री रामचंद्र मेडिकल सेंटर (SRMC) मध्ये दाखल करण्यात आले. एका कार्यक्रमासाठी कमल हसन हे हैदराबाद (Hyderabad) येथे गेले होते. तेथून चेन्नईला परतल्यानंतर कमल हसन यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना चेक-अपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या  कमल हसन यांच्या प्रकृतीत …

Read More »

अजय देवगणच्या ‘दृश्यम-2’ ची बॉक्स ऑफिसवर जादू; सहा दिवसात केली एवढी कमाई

Drishyam 2 Collection Day 6:  दृश्यम (Drishyam) या चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागाला (Drishyam 2) देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.   बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या (Ajay Devgn) दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले आहेत, तरी या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. अभिषेक पाठक …

Read More »

शोले ते डॉन हिट चित्रपटांचे लेखक; सलीम खान यांची लव्ह स्टोरी देखील फिल्मी, जाणून घ्या

Birthday Special Salim Khan: बॉलिवूडमधील ज्येष्ठ पटकथा लेखक, अभिनेते आणि चित्रपट निर्माते सलीम खान (Salim Khan) यांचा आज 87 वा वाढदविस आहे. 24 नोव्हेंबर 1935 रोजी इंदूर येथे सलीम खान यांचा जन्म झाला. अनेक हिट चित्रपटांचे लेखन केले. त्यांनी जंजीर (zanjeer) या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या हिट चित्रपटाचे पटकथा लेखन केले. सलीम हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. …

Read More »

विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाकडून मिळत आहे. काल रात्री विक्रम गोखले यांच्या मुलीनं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत.  त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा.’ विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी एबीपी न्यूजला विक्रम …

Read More »

‘फतवा’ मधून प्रतिक आणि श्रद्धा यांची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Fatwa Marathi Movie: प्रेम…आयुष्यातला हळूवार क्षण… त्याला आणि तिला जोडणारा रेशमी बंध… हा बंध त्यांच्याही नकळत कधी जुळून येतो हे त्यांनाही कळत नाही. प्रत्येक प्रेमकथेतला प्रेम हा समान धागा सोडला तर प्रत्येकाच्याच प्रेमाची एक वेगळी गोष्ट आहे. प्रेम कोणी आणि कोणावर केल यावर ते चूक की बरोबर? हे नाही ठरवता येत. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या प्रेमवीरांची गोष्ट घेऊन ‘फतवा’ (Fatwa) …

Read More »

विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

Vikram Gokhale:  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरु आहेत. पण सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे, अशी माहिती मिळत आहे.  विक्रम गोखले यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एबीपी माझाच्या सिंहासन या …

Read More »

नितेश राणेंच्या आरोपावर पूजा भटने मौन सोडले..

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी नुकताच भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. तसेच अभिनेत्री पूजा भट (Pooja Bhatt), रश्मी देसाई (Rashami Desai) यांनी देखील या यात्रेमध्ये सहभाग घेतला. आता नितेश राणे यांनी एक ट्वीट करुन भारत जोडो यात्रेत सहभागी …

Read More »

‘रौंदळ’ मधील ‘मन बहरलं…’ गाणं प्रदर्शित

Raundal: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारून नावारूपाला आल्यानंतर ‘बबन’ चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेला भाऊसाहेब शिंदे मागील बऱ्याच दिवसांपासून आपल्या महत्त्वपूर्ण आगामी चित्रपटाच्या कामात बिझी आहे. ‘रौंदळ’ (Raundal) असं महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगडं शीर्षक असणारा हा चित्रपट पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. यातील भाऊसाहेबचा रांगडा लुक रसिकांपासून चित्रपटसृष्टीपर्यंत सर्वांच्याच मनात कुतूहल जागवणारा ठरला आहे. त्या …

Read More »

IFFI 2022 : ‘द कश्मीर फाइल्सच्या स्क्रीनिंगला अनुपम खेर यांची हजेरी

Anupam Kher In IFFI 2022 : 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival 2022) गोव्यात सुरू आहे. या महोत्सवात अनेक सिनेमे दाखवले जात आहेत. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बहुचर्चित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या उपस्थितीत या सिनेमाचं स्क्रीनिंग पार पडलं.  भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनुपम खेर म्हणाले,”इफ्फी’ …

Read More »

Annu Kapoor : अन्नू कपूर यांची फसवणूक करणाऱ्याला अटक

Annu Kapoor : भारतीय सिनेृसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. आरोपींनी कपूर यांची 4.46 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दुसरीकडे 3.08 लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नू कपूर फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आशिष पासवान (28)  असून तो बिहारमधील दरभंगा …

Read More »