Tag Archives: entertainment

Shilpa Shetty : खटल्यातून आरोपमुक्तीसाठी शिल्पा शेट्टीची हायकोर्टात याचिका

Shilpa Shetty : तब्बस 16 वर्षांपूर्वी हॉलिवूड सूपरस्टार रिचर्ड गिअरसोबत (Richard gere) एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या ‘किस’मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिल्पा शेट्टीनं (Shilpa Shetty) याप्रकरणातून आरोपातूनमुक्त करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शिल्पानं याबाबतील कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळून लावल्यानंतर शिल्पानं त्या निर्णयाला आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्यासमोर नुकतीच यावर सुनावणी झाली. …

Read More »

रितेश-जिनिलियाच्या ‘Ved’ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट…

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved) या सिनेमाची दुसऱ्या आठवड्यातही यशस्वी घौडदौड सुरू आहे. या सिनेमाने आता नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) बहुचर्चित ‘सैराट’ (Sairat) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे.  सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत नागराज मंजुळेंचा ‘सैराट’ हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर होता. या सिनेमाने 12.10 …

Read More »

मूड बना लिया… Amruta Fadnavis थिकरल्या; चाहत्यांना आवाहन करत म्हणाल्या…

Amruta Fadnavis On Aaj Main Mood Bana Liya Ay Song : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सध्या ‘आज मैंने मूड बना लिया है’ (Aaj Main Mood Bana Liya Ay) या गाण्यामुळे चर्चेत आहे. अशातच आता त्यांनी सोशल मीडियावर या गाण्यावर हुकअप स्टेप करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांनी ‘आज मैंने …

Read More »

Farhan Akhtar : अभिनेता, दिग्दर्शक, गायक, गीतकार फरहान अख्तर!

Farhan Akhtar : अभिनेता, दिग्दर्शक, गायक आणि गीतकार असणाऱ्या फरहान अख्तरचा (Farhan Akhtar) आज वाढदिवस आहे. विविधांगी ओळख असेलेल्या फरहान अख्तरचा जन्म 9 जानेवारी 1974 साली मुबंईतील एका इराणी-मुस्लिम कुटुंबात झाला. फरहान अख्तरने आपल्या अष्टपैलू कामगिरीतून आपल्या कार्यक्षेत्राची सुरुवात ‘दिल चाहता है’ या 2001 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात दिग्दर्शक म्हणून केली. त्यानंतर लक्ष्य (2004), डॉन (2006), पॉझिटिव्ह (2007), डॉन 2 …

Read More »

‘Bigg Boss Marathi 4’चा विजेता अक्षय केळकर कोण आहे?

Akshay Kelkar On Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 4) विजेत्याचं नाव अखेर समोर आलं आहे. मास्टर माइंड अक्षय केळकर (Akshay kelkar) या पर्वाचा विजेता ठरला आहे. क्षय केळकरला जिंकल्याबद्दल ट्रॉफी आणि 15 लाख 55 हजार इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. तसेच तो या पर्वाचा ‘कॅप्टन ऑफ द सिझन’ ठरला आहे. अक्षय केळकर कोण …

Read More »

अखेर माझ्या आजोबांना भेटले : उर्फी जावेद

Urfi Javed On Javed Akhtar : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत आहे. तिची स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस उतरत असली तरी काही मंडळींनी मात्र तिच्या बोल्डनेसवर निशाणा साधला आहे. अशातच आता तिने जावेद अख्तरांची (Javed Akhtar) भेट घेतली आहे.  सोशल मीडियावर सध्या उर्फी जावेद (Urfi Javed) आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचा एक फोटो प्रचंड …

Read More »

Piccolo : ‘पिकोलो’ 26 जानेवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Piccolo : मराठी  चित्रपटांमधून नावीन्यपूर्ण  विषयांची निवड जाणीवपूर्वक होऊ लागली आहे. प्रेक्षकही त्याकडे मोठया प्रमाणात आकर्षित होताना  दिसत आहेत.  हीच बाब लक्षात घेत अभिजीत मोहन वारंग  दिग्दर्शित ‘पिकोलो’ (Piccolo) या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या 26 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजच्या पिढीसमोर असणारे प्रश्न, त्यांना पेलावी लागणारी आव्हानं …

Read More »

Riteish Deshmukh Genelia Deshmukh : लाडक्या दादा-वहिणीचं चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून कौतुक

Abhishek Bachchan On Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) सध्या ‘वेड’ (Ved) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अशातच अभिनेता अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) खास पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनिलियाचं जाहीर कौतुक केलं आहे.  अभिषेकने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर ‘वेड’ (Ved Movie) सिनेमाच्या …

Read More »

Bigg Boss Marathi 4 : आज रंगणार ‘बिग बॉस मराठी 4’चा महाअंतिम सोहळा

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा आज महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या दिवसाची प्रतीक्षा करत आहेत. या पर्वात अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), अक्षय केळकर (Akshay Kelkar), अमृता धोंगडे (Amruta Dhongade), किरण माने (Kiran Mane) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) या पाच स्पर्धकांचा ‘टॉप 5’मध्ये (Top 5) समावेश …

Read More »

‘नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती’ पुरस्काराने अभिनेते अशोक शिंदे सन्मानित

Ashok Shinde : मराठी  सिनेनाटयसृष्टीत चिरतरुण अभिनेता म्हणून अशोक शिंदे (Ashok Shinde) यांची ओळख आहे. नाटक, चित्रपट, मालिकांमधून नायक, सहनायक तसेच खलनायक अशा विविधांगी भूमिका त्यांनी आजवर साकारल्या. आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात  स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याच्या कारकिर्दीचा सन्मान करत यंदाचा  ‘नटश्रेष्ठ निळू फुलेस्मृति’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.    सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या …

Read More »

अबोला..भांडण ते लग्न; प्रसाद-मंजिरीचा 25 वर्षांचा सुखी संसार

Prasad Oak Manjiri Oak : प्रसाद ओक (Prasad Oak) आणि मंजिरी ओकच्या (Manjiri Oak) सुखी संसाराला आज 25 वर्ष  पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त मंजिरीने खास पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  मंजिरीने प्रसादच्या आतापर्यंतच्या सर्व नाटकांची नावं गुंफून त्यांच्या सहजीवनाबद्दल खास पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं आहे,”93 साली खऱ्या अर्थाने ‘प्रेमाची …

Read More »

Rohit Shetty : सिने-दिग्दर्शक रोहित शेट्टी रुग्णालयात दाखल

Rohit Shetty : सिने-दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित शेट्टी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये त्याच्या आगामी ‘इंडियन पुलिस फोर्स’ (Indian Police Force) या वेबसीरिजचं शूटिंग करत होता. एका सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली आहे.  रोहित शेट्टीला कामिनेनी (Kamineni) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हातावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात …

Read More »

शिझान खानला दिलासा नाही

Tunisha Suicide Case : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी तिचा खास मित्र आणि सहकलाकार शिझान खानच्या (Sheezan Khan) अडचणीत वाढ झाली आहे. शिझानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी सोमवारी 9 जानेवारीला होणार आहे.  शिझानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शिझान पूर्णपणे निर्दोष आहे. कुटुंबीय आणि पोलिसांच्या चौकशीचा त्याला त्रास होत आहे. तुनिषाने 24 …

Read More »

उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस म्हणाल्या…

Amruta Fadnavis On Urfi Javed : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतच त्यांचं ‘आज मैंने मूड बना लिया है’ (Aaj Maine Mood Bana Liya Hai) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या लॉंच दरम्यान अमृता फडणवीस यांनी उर्फी जावेद (Urfi Javed Controversy) प्रकरणावर भाष्य केलं आहे. …

Read More »

इरफानच्या निधनानंतर ‘अशी’ झालेली मुलाची अवस्था

Babil Khan Talks About Irrfan Khan : इरफान खान (Irrfan Khan) बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच बाबिलने (Babil Khan) मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत बाबिलने वडिलांच्या निधनानंतरचा एक किस्सा शेअर केला आहे.  बाबिल म्हणाला,”वडिलांच्या निधनाने मला खूप मोठा धक्का बसला होता. आपले वडील आता या जगात नाहीत या गोष्टीवर विश्वास बसत …

Read More »

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा सिझलिंग लुक, फोटो पाहून चाहते म्हणतात ‘जंगली बिल्ली’

मराठी चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे सई ताम्हणकर. सईने तिच्या अभिनयाने जोरावर चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तीचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी सईने ब्लॅक ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे. …

Read More »

रितेश-जिनिलियाच्या ‘Ved’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरुच

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) बहुचर्चित ‘वेड’ (Ved) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आठवड्याभरात या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला वर्षाच्या सुरुवातीलाच सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत.  ‘वेड’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 2.25 कोटी, दुसऱ्या दिवशी 3.25 कोटी, तिसऱ्या दिवशी …

Read More »

कार्तिक आर्यनचा धमाकेदार चित्रपट ‘शेहजादा’चा ट्रेलर 12 जानेवारीला रिलीज होणार

Shehzada Trailer released : हिंदी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘शेहजादा’ (Shehzada)  या चित्रपटाबद्दल प्रत्येकजण खूप उत्सुक आहे. कार्तिकच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर ‘शेहजादा’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली. दरम्यान, आता ‘शहजादा’च्या ट्रेलर रिलीजची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे. एवढेच नाही तर ‘शहजादा’च्या ट्रेलर लॉन्चसाठी निर्मात्यांनी विशेष तयारी केली आहे.  ‘शेहजादा’चा ट्रेलर कधी रिलीज होणार? कार्तिक आर्यन …

Read More »

विराट-अनुष्काची मुलगी वामिकासह वृंदावनाच्या आश्रमाला भेट; हात जोडतानाचा फोटो व्हायरल

Virat Anushka In Vrindavan : दुबईमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केल्यानंतर क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बुधवारी वृंदावनला पोहोचले. या दरम्यान या जोडप्याने बाबा नीम करोली यांच्या आश्रमाला भेट दिली. यानंतर विराट आणि अनुष्का प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज यांच्या आश्रमात पोहोचले. या दरम्यान त्यांची मुलगी वामिका कोहलीही दिसली. आपलं वैयक्तिक आयुष्य खाजगी …

Read More »

बॉलिवुड आणि हॉलिवुड हे नाव कसं पडलं? यामधील ‘वुड’चा अर्थ काय?

History of Hollywood : हिंदी चित्रपटसृष्टी ‘बॉलिवुड’ (Bollywood) या नावाने, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ‘टॉलिवुड’ (Tollywood) या नावाने आणि अमेरिकन फिल्म इंडस्ट्री ‘हॉलिवूड’ (Hollywood) नावाने ओळखली जाते. बॉलिवुड (Bollywood), हॉलिवुड (Hollywood) आणि टॉलिवुड (Tollywood) या शब्दांमध्ये ‘वुड’ हा शब्द समान आहे. फक्त अमेरिकाच नाही तर, भारतातही वेगवेगळ्या भाषांच्या चित्रपटसृष्टीतही ‘वुड’ हा शब्द असणे सर्वसामान्य आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, …

Read More »