शिझान खानला दिलासा नाही

Tunisha Suicide Case : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी तिचा खास मित्र आणि सहकलाकार शिझान खानच्या (Sheezan Khan) अडचणीत वाढ झाली आहे. शिझानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी सोमवारी 9 जानेवारीला होणार आहे. 

शिझानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शिझान पूर्णपणे निर्दोष आहे. कुटुंबीय आणि पोलिसांच्या चौकशीचा त्याला त्रास होत आहे. तुनिषाने 24 डिसेंबर 2022 रोजी मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. याप्रकरणी तुनिषाच्या आईने शिझान विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे 25 डिसेंबरला शिझानला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नेहमी सत्याचाच विजय होतो. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे”. 

live reels News Reels

नेमकं प्रकरण काय? 

हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईनं वालीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं आहे. 

हेही वाचा :  'मसुटा' चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मानं शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. तुनिशा आणि शिजान हे दोघं सध्या सब टीव्हीच्या अलिबाबा… दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ तुनिशानं आत्महत्येच्या काही वेळ आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यामुळं सेटवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसह तुनिषाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. तुनिषानं गळफास घेतल्याचं लक्षात येताच, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर शिझान खानवर अनेक आरोप लावण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आलं. वसई न्यायालयाने 31 डिसेंबर रोजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर शिझानच्या जामीनासाठी वसई न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला.

संबंधित बातम्या

Sheezan Khan : तुनिषा शर्माच्या आत्महत्येचं कारण ठरणारा शिझान खान कोण आहे? जाणून घ्या…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …