‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

Masuta: वेगवेगळ्या विषयांवर आधारित मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. असाच एक वेगळ्या विषयावर आधारित ‘मसुटा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामाजिक मनोरंजक सिनेमाच्या व्याख्येत अचूक बसणारा ‘मसुटा'(Masuta) हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठी रसिकांसमोर एक आगळी वेगळी कथा येणार आहे. 

काशिबाई फिल्म्स प्रोडक्शन आणि साईसागर प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘मसुटा’ या चित्रपटाची निर्मिती भरत मोरे आणि मनेश लोढा यांनी केली आहे. अजित देवळे आणि सुनील शिंदे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर्स आहेत. अजित देवळे यांनीच ‘मसुटा’चं दिग्दर्शन आणि संकलनही केलं आहे. ‘मसुटा’ हा चित्रपट म्हणजे जगण्यासाठी धडपड करणारी जगावेगळी कहाणी आहे. यात समाजातील एका विशिष्ट वर्गातील मनाला भिडणारी कथा पहायला मिळेल. या चित्रपटाच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेशही देण्यात आले आहेत. दिग्दर्शक अजित देवळे यांनी हे सर्व आपल्या अनोख्या दिग्दर्शनशैलीद्वारे मनोरंजक करण्याचं काम केलं आहे. या चित्रपटानं आजवर देश-विदेशांतील बऱ्याच सिने महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. 

हेही वाचा :  महायुतीने घेतला विधानसभेचा धसका, कोल्हापुरच्या 'या' मोठ्या प्रकल्पाला सत्ताधाऱ्यांचाच विरोध

‘मसुटा’ चित्रपटाबद्दल दिग्दर्शक देवळे म्हणाले की, वास्तववादी लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेला हा चित्रपट प्रेक्षकांना वास्तवदर्शी अनुभव देईल याची निश्चितच खात्री असल्याकुटुंबाची कथा सांगणारा असला तरी परिपूर्ण मनोरंजक चित्रपट आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये, प्रासंगिक गीतरचना आणि सुमधूर संगीताची किनार याला जोडण्यात आली आहे. मराठीसह हिंदीतही वावरणाऱ्या आघाडीच्या कलाकारांसह इतर कलावंतांनी हृदयस्पर्शी अभिनय केला आहे. अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी पटकथा हेचे दिग्दर्शक देवळे यांनी सांगितले. पटकथा लेखन करणार्‍या भरत मोरे यांनी माहिती देताना सांगितले, मी वास्तविक लेखन करत असताना अनेक स्मशानात गेलो, म्हसणजोगी कुटूंबाची कर्मकहानी त्यांच्याच मुखातून समजावून घेतली. या आधुनिक जगापुढे आपल्या पारंपरिक व्यवसायामुळे आजही या म्हसणजोगी समाजाला किती यातना सहन कराव्या लागतात या इतर शिक्षीत समाजाला सांगण्याचा काहीसा धाडसी प्रयत्न लिखाणातून केला आहे. समस्त जगभरातील मानवजातीला देहदानाचा संदेश या चित्रपटाच्या अति मनोरंजक कथानकातून करून देणार असल्याने मायबाप रसिक प्रेक्षकांना मनोरंजनाची अनोखी मेजवानी नक्कीच मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

‘मसुटा’चं पटकथा लेखन भरत मोरे यांनी केलं असून, अनिल राऊत यांनी संवाद लिहिले आहेत. अनंत जोग, नागेश भोसले, रियाझ मुलाणी, अर्चना महादेव, वैशाली केंडाळे, कांचन पगारे, यश मोरे आदी कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. गीतरचना आणि संगीत अविनाश पाटील व सुनील म्हात्रे यांचं आहे. आदर्श शिंदे, अबोली गिऱ्हे, अविनाश पाटील यांनी या चित्रपटासाठी गायन केलं असून कॅास्च्युम डिझाईन चैत्राली डोंगरे यांनी केलं आहे. डिओपी दिलशाद व्ही. ए. यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, पार्श्वसंगीत पिनाकी रॅाय यांनी केलं आहे. बॉक्स हिट मूव्हीज या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळणार आहे.

हेही वाचा :  थिएटर आणि ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Pathaan box office Day 18: भारतातीलच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर पठाणचा डंका; 18 व्या दिवशी केली एवढी कमाई

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …