Jersey Release Date : शाहिद कपूरचा ‘जर्सी’ सिनेमा 14 एप्रिलला होणार प्रदर्शित

Jersey Release Date : क्रिकेटप्रेमी आणि सिनेरसिक गेले अनेक दिवस शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ (Jersey) सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 31 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.  

मागील काही दिवसांपासून ‘जर्सी’ सिनेमातील गाणी आणि पोस्टर रिलीज होत असल्याने या सिनेमाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होईल अशीदेखील शक्यता वर्तवली जात होती. पण आता हा सिनेमा 14 एप्रिलला सिनेमागृहातच प्रदर्शित होणार आहे. 

‘जर्सी’ हा टॉलिवूड सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘जर्सी’ सिनेमात शाहिद कपूर एका क्रिकेटरचे पात्र साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे. सिनेमात पंकज कपूरसोबत मृणाल ठाकूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहिद आणि मृणाल पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सिनेमात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.




‘जर्सी’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक बेरोजगार, माजी क्रिकेटपटू त्याच्या मुलाचे ‘जर्सी’ खरेदी करण्याचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. घरोघरी जाऊन पैशाची व्यवस्था करण्याचादेखील तो प्रयत्न करतो आहे. शेवटी पत्नीच्या पाकिटातून तो पैसे चोरण्याचा प्रयत्न करतो.

हेही वाचा :  हनुमानचा टीझर रिलीज होताच नेटकऱ्यांनी साधला 'आदिपुरुष' वर निशाणा

संबंधित बातम्या

Laal Singh Chaddha : आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाची रिलीज बदलली, ‘या’ दिवशी होणार सिनेमा प्रदर्शित

Oscar Awards 2022 : यंदाचा ऑस्कर खास, चाहते ट्विटरद्वारे करू शकतात मतदान

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमातील ‘Jab Saiyaan’ गाणे रिलीज, बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …