KGF 2 Vs Jersey : एप्रिल महिन्यात ‘जर्सी’ (Jersey) आणि ‘केजीएफ 2’ (KGF 2) या सिनेमांत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. हे दोन्ही सिनेमे 14 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत. ‘जर्सी’ सिनेमा आधी 31 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.
‘जर्सी’ आणि ‘केजीएफ 2’ हे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण 14 एप्रिलला आंबेडकर जयंती, महावीर जयंती आणि बैसाखी आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमांच्या प्रमोशनला सुरुवात होणार आहे.
क्रिकेटप्रेमी आणि सिनेरसिक गेले अनेक दिवस शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे. ‘जर्सी’ हा टॉलिवूड सुपरहिट सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. KGF 2 तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. फरहान अख्तर, KGF Chapter 2च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे.
संबंधित बातम्या
ABP Ideas of India: माझं कोणतंही बॉलीवूड ड्रीम नव्हतं, एबीपीच्या मंचावर ‘पपॉन’ने केलं मनमोकळं
World Theatre Day 2022 : ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ ते ‘सारखं काहीतरी होतंय’, जागतिक रंगभूमी दिनी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी!
Bollywood Movies : ‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘बच्चन पांडे’, नवीन वर्षात ‘या’ सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या