‘Bigg Boss Marathi 4’चा विजेता अक्षय केळकर कोण आहे?

Akshay Kelkar On Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 4) विजेत्याचं नाव अखेर समोर आलं आहे. मास्टर माइंड अक्षय केळकर (Akshay kelkar) या पर्वाचा विजेता ठरला आहे. क्षय केळकरला जिंकल्याबद्दल ट्रॉफी आणि 15 लाख 55 हजार इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. तसेच तो या पर्वाचा ‘कॅप्टन ऑफ द सिझन’ ठरला आहे.

अक्षय केळकर कोण आहे? (Who Is Akshay Kelkar) 

अक्षयने 2013 साली ‘बे दुने दहा’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘कमला’ मालिकेत त्याने साकारलेली उदय देशपांडेची भूमिका प्रचंड गाजली. अक्षयने ‘प्रेमसाथी’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अवधूत गुप्तेच्या ‘कान्हा’ या सिनेमात त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. ‘कॉलेज कॅफे’ या सिनेमात तो मुख्य भूमिकेत होता. सब टीव्हीच्या ‘भाखरवडी’ या हिंदी मालिकेतदेखील त्याने काम केलं आहे. 

विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर अक्षयने एक खास पोस्ट लिहिली आहे. चाहत्यांचे आभार मानत त्याने लिहिलं आहे,”हे फक्त आणि फक्त तुम्हा प्रेक्षकांमुळे होऊ शकलय! खूप खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार! मी खऱ्या अर्थाने तुमचाच झालोय!”. अक्षयच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 


‘दोन कटिंग’ फेम अक्षय केळकर

अक्षयची ‘दोन कटिंग’ ही शॉर्ट फिल्म एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारी आहे. कमेकांशी लग्न करायला तयार नसलेलं एक जोडपं चहाच्या निमित्ताने एकत्र भेटतं आणि त्यांच्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण होते आणि त्यानंतर ते एकमेकांसाठी किती पूरक आहेत याची जाणीव त्यांना होते म्हणून त्या दोघांच्या नात्यातला तो कटींग चहा त्यांना जवळ आणण्यासाठी पूल ठरतो अशी या शॉर्टफिल्मची कथा आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादामुळे या शॉर्ट फिल्मचा दुसरा भाग लवकरच रिलीज होणार आहे. तसेच अक्षयचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. 

हेही वाचा :  Prajakt Deshmukh : एकाच दिवशी, एकाच ठिकाणी तिहेरी भूमिकेत दिसणार प्राजक्त देशमुख!

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता मास्टर माइंड Akshay Kelkar; दिमाखात पार पडला महाअंतिम सोहळाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …