Tag Archives: entertainment

संगीताचा बादशाह असणाऱ्या ‘ए.आर.रहमान’ यांचं खरं नाव माहितीये?

A. R. Rahman: संगीत क्षेत्रामधील प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमानचा (A. R. Rahman)  आज 56 वा वाढदिवस आहे. ए.आर.रहमान यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ए.आर. रहमान यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.  ए.आर रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. ए.आर रहमान यांचे खरे नाव ए.एस दिलीप कुमार आहे. …

Read More »

‘माझ्याबरोबर कोणी नसताना तुम्ही उभे राहाल’; शिझानच्या आईबरोबर तुनिषाचे चॅट व्हायरल

Tunisha Sharma : टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर तिचा सहकलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान (Sheezan Khan) कोठडीत आहे. तुनिषाच्या आईने शिझानवर गंभीर आरोप केल्यानंतर पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं. सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नुकतंच शिझानची बहीण फलक नाज आणि शिझानच्या आईने पत्रकार परिषद घेत तुनिषाच्या आईने शिझानवर लावलेले आरोप खोटे असल्याचे …

Read More »

पठाण चित्रपटामधील काही दृश्यांना कात्री

Pathaan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट काही दिनवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. पठाण चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी फिल्ममेकर्सला दिली होती. आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने पठाण चित्रपटाला UA प्रमाणपत्र …

Read More »

शाहरुखनं खास पोस्ट शेअर करुन दीपिकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Deepika Padukone: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone)आज (5 जानेवारी) 37 वा वाढदिवस आहे. दीपिका तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. दीपिका ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. नुकतीच शाहरुखनं दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या …

Read More »

सोनू सूदच्या व्हिडीओला रेल्वे प्रशासनाचा रिप्लाय; अभिनेत्यानं मागितली माफी

Sonu Sood: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) कोरोना काळात अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सोनू हा वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो. काही दिवसांपूर्वी सोनू सूदनं एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला आता उत्तर रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रिप्लाय देण्यात आला आहे. उत्तर रेल्वे प्रशासनाच्या या रिप्लायनंतर सोनूला माफी मागावी लागली.  …

Read More »

विजय अन् रश्मिकाच्या ‘वरिसु’ चा ट्रेलर रिलीज

Varisu Trailer:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काल (4 जानेवारी) विजयच्या वरिसु (Varisu) या आगामी चित्रपटाचा ट्रेलर (Varisu Trailer) प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ट्रेलरमधील अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि विजयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत …

Read More »

तुनिषा शर्माच्या बर्थ-डेला शिझानच्या बहिणीनं शेअर केली पोस्ट

Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma)  वयाच्या 20 व्या आत्महत्या केली. तिच्या निधनानं अनेकांना धक्का बसला. तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी ‘अली बाबा-दास्तान ए काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेतला. काल (4 डिसेंबर) तुनिषाचा वाढदिवस होता. यानिमित्तानं शिझानची बहिण फलक नाजनं (Falaq Naaz) सोशल मीडियावर तुनिषासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.  फलक नाजचे फोटो फलक नाजनं तुनिषासोबतचे काही …

Read More »

चाहत्यांच्या प्रश्नाला शाहरुख खाननं दिली भन्नाट उत्तरं

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाममधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख हा अनेकवेळा ट्विटरवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतो. आता शाहरुखनं पठाण चित्रपट रिलीज होण्याआधी ट्विटरवरील काही युझर्सच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. त्याच्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.  महिन्याला किती कमावतो?ट्विटरवर शाहरुखच्या एका चाहत्यानं त्याला प्रश्न विचारला. की, ‘तू …

Read More »

फिफा वर्ल्ड कप अन् बेशरम रंगमधील बिकीनी, या कारणांमुळे चर्चेत होती दीपिका

Happy Birthday Deepika Padukone: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आज (5 जानेवारी) 37 वा वाढदिवस आहे. दीपिका तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. ये जवानी है दिवानीमधील नैना, ओम शांती ओममधील शांती प्रिया यांसारख्या दीपिकानं साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आज दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. …

Read More »

Gautami Patil : ‘लावणी क्वीन’ गौतमी पाटील रुपेरी पडद्यावर झलकणार

Gautami Patil : गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लील नृत्यामुळे चर्चेत असलेली गौतमी आता सिनेमात झळकणार आहे. ‘घुंगरु’ असे तिच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.  गौतमीच्या ‘घुंगरु’ या सिनेमाचं शूटिंग सोलापूर (Solapur), माढा (Madha), हंपीसह (Hampi) परदेशात झालं आहे. या सिनेमात गौतमी पाटील (Gautami Patil …

Read More »

C Ramchandra Death Anniversary: जाणून घ्या सी. रामचंद्र यांचा प्रवास…

C Ramchandra : संगीतकार रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र (C Ramchandra) यांनी अनेक गाणी गायली आहेत. संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द कायमच झळाळती राहिली. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी 120 हिंदी, सात मराठी, पाच तामिळ, तीन तेलुगु आणि एका भोजपुरी बोलपटात त्यांनी आठशेहून अधिक गाणी संगीतबद्ध केली. त्यात 35 हून अधिक गाणी त्यांनी स्वत: गायली आहेत.  संगीतदिग्दर्शक आणि पार्श्वगायक रामचंद्र नरहर चितळकर …

Read More »

सुशांत सिंह राजपूतच्या ‘त्या’ फ्लॅटमध्ये नवीन भाडेकरू येणार

Sushant Singh Rajput Suicide Case : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला अडीच वर्षे लोटली असली तरी आजही तो चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. त्यांचं निधन झालं तेव्हा तो वांद्रे परिसरातील एका आलिशान फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. गेली अनेक वर्ष या फ्लॅटमध्ये कोणीही राहायला तयार नव्हतं. अखेर अडीच वर्षानंतर या फ्लॅटमध्ये नवीन भाडेकरू येऊ शकतात, अशी माहिती समोर …

Read More »

‘वाळवी’चा ट्रेलर क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा

Vaalvi Trailer Out : ‘वाळवी’ हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ (Vaalvi) या सिनेमात  पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच या सिनेमाचा जबरदस्त टिझर अगदी अनोख्या पद्धतीनं प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यामुळे या सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार याविषयी प्रेक्षकांच्या …

Read More »

पाहा नेटफ्लिक्सवरील या पाच सीरिज

The Top 5 Action Web Series : ओटीटीवरील  (OTT) चित्रपट (Movie) आणि वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळते. काही लोकांना रोमँटिक कथानकावर आधारित चित्रपट आवडतात तर काहींना अॅक्शन असणारे चित्रपट आवडतात. जर तुम्हाला अॅक्शन आणि सस्पेन्सवर आधारित वेब आवडत असतील तर तुम्ही नेटफ्लिक्सवरील (Netflix) या पाच वेब सीरिज पाहु शकता.  माई (Mai)नेटफ्लिक्सच्या माई या वेब सीरिजमध्ये एका महिलेची कथा …

Read More »

Tunisha Sharma Birthday : जाणून घ्या तुनिषा शर्मा कसा साजरा करणार होती बर्थडे…

Tunisha Sharma : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) गेल्या दहा दिवसांपूर्वी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. वयाच्या 20 व्या वर्षी तुनिषाने आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. तुनिषाचा जन्म 4 जानेवारी 2002 साली चंदीगढमध्ये झाला. आज तुनिषा शर्मा जिवंत असती तर तिने तिचा 21 वा वाढदिवस साजरा केला असता. तुनिषा तिच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत होती. …

Read More »

एअरपोर्टवरील कार्मचाऱ्यांनी हिणवलं, अभिनेत्याच्या उत्तरानं जिंकली मनं

Satish Shah: प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह (Satish Shah) हे त्यांच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांच्या मनं जिंकतात. सतीश हे सध्या त्यांचा एका ट्वीटमुळे चर्चेत आहेत. युनायटेड किंगडमच्या (United Kingdom) हिथ्रो विमानतळावरील (Heathrow Airport) स्टाफनं अभिनेता सतीश शाह यांच्यावर एक कमेंट केली. “यांना फर्स्ट क्लास कसा परवडेल?” अशी कमेंट करत  हिथ्रो विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी सतीश यांना हिणवलं.विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या या कमेंटला सतीश यांनी प्रतिक्रिया दिली. …

Read More »

जिनिलियाची खास पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Genelia Deshmukh: अभिनेत्री  जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आणि तिचा पती अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. जिनिलिया आणि रितेश हे गेली 20 वर्षे सिनेसृष्टीत काम करत आहेत. त्यांचा वेड (Ved) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. चित्रपटातील गाणी, चित्रपटाचे कथानक आणि चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत …

Read More »

Pathaan Trailer : ‘पठाण’चा ट्रेलर 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

Shah Rukh Khan Pathaan Trailer : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून किंग खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. आतापर्यंत या सिनेमातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याआधीच ऑनलाइन लीक झाला आहे.  ‘पठाण’चा ट्रेलर ऑनलाइन लीक (Pathaan Trailer Leaked)  शाहरुखचा ‘पठाण’ हा सिनेमा …

Read More »

सोनम कपूरनं विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट

Sonam Kapoor: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सोनमच्या घरी काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगम झाले. आनंद आहुजा आणि सोनमनं त्यांच्या मुलाचं नाव वायु असं ठेवलं. सोनमनं नुकतच तिचं मुंबईमधील  (Mumbai) आलिशान घर विकलं आहे. या घराची डील झाल्यानं सोनमला फायदा झाल आहे.  सोनमनं सात वर्षांपूर्वी खरेदी केलेला मुंबईमधील तिचा फ्लॅट विकला …

Read More »

अभिनेत्रीनं मांडली व्यथा; सांगितली धक्कादायक घटना

Daisy Irani:  मोठ्या पडद्यावरील हसतमुख दिसणाऱ्या काही सेलिब्रिटींनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात अनेक संटकांचा सामान केला आहे. बऱ्याच वेळा विविध मुलाखतींच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी त्यांचे दु:ख चाहत्यांसोबत शेअर करतात. अभिनेत्री (Actress) डेझी इराणी (Daisy Irani) यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील संकटांबाबत तसेच त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत सांगितलं.  प्रसिद्ध फिल्ममेकर आणि कोरियोग्राफर फराह खानची मावशी डेझी इराणी यांनी …

Read More »