इरफानच्या निधनानंतर ‘अशी’ झालेली मुलाची अवस्था

Babil Khan Talks About Irrfan Khan : इरफान खान (Irrfan Khan) बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच बाबिलने (Babil Khan) मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत बाबिलने वडिलांच्या निधनानंतरचा एक किस्सा शेअर केला आहे. 

बाबिल म्हणाला,”वडिलांच्या निधनाने मला खूप मोठा धक्का बसला होता. आपले वडील आता या जगात नाहीत या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. दरम्यान मी तब्बल 45 दिवस स्वत:ला एका खोलीत बंद करुन घेतलं होतं. माझं आणि बाबाचं नातं एका मित्रासारखं होतं. त्यामुळे मी एक चांगला मित्र गमावला आहे”. 


live reels News Reels

बाबिल खान पुढे म्हणाला,”बाबा शूटिंगमध्ये खूप व्यस्त असायचा. अनेक दिवस तो शूटिंगसाठी घराबाहेर असायचा. त्यामुळे त्याच्या निधनानंतर तो कधीही न संपणाऱ्या शूटसाठी गेला आहे अशी मी मनाची समजूत घातली. त्याच्या निधनाने मी माझा खूप जवळचा मित्र गमावला आहे”. 

चतुरस्र अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब चर्चेत आलं. त्यातही इरफान यांचा मुलगा बाबिलकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या. इरफान गेल्यानंतर बाबिल काय पोस्ट करतो.. तो घरी कसा राहतो याकडे अनेकांचं लक्ष होतं. बाबिलनेही त्यानंतर काही काळ आपल्या वडिलांबद्दलच्या आठवणींना उजळा दिला होता. त्यांच्यासोबतचे किस्से, त्यांच्यासोबतचे फोटो तो पोस्ट करत असे. आता बाबिल पुन्हा चर्चेत आला कारण, त्याच्याकडे काही चित्रपट आले आहेत. नेटफ्लिक्सचा ‘काला’ हा त्यापैकी एक चित्रपट आहे. तर दुसरा चित्रपट नुकताच शुजित सिरकार यांनी जाहीर केला आहे.

हेही वाचा :  'लग्नात डान्स करणं,रात्री हिरोच्या रुममध्ये जाणं....'; कंगनाचं ट्वीट ठरतंय चर्चेचा विषय

इरफान खान यांचा ‘अपनों से बेवफाई’ सिनेमा लवकरच होणार प्रदर्शित

इरफानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इरफान यांचा ‘अपनों से बेवफाई’ (Apno Se Bewafai) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इरफान खान यांनी अचानक जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे अनेक सिनेमे अद्याप प्रदर्शित झालेले नाहीत. अशातच त्यांनी शूटिंग पूर्ण केलेल्या एका सिनेमासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. इरफान खान यांचा ‘अपनों से बेवफाई’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Qala: ‘काला’ मध्ये अनुष्का शर्माला पाहून नेटकरी झाले खुश; पोस्ट शेअर करत म्हणाले…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …