कधीच येत नाही हार्ट अटॅक, खा रक्ताच्या गाठी फोडून रक्त पातळ करणारी ही घरगुती चटणी

Chutney for Blood Thinning : शरीराला मिळणारी पोषक तत्वे सर्व अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे काम रक्त करते. रक्त जाड किंवा पातळ नसावे, जेणेकरून ते हेल्दी पद्धतीने शरीरात सर्वत्र वाहत राहू शकेल. परंतु जेव्हा रक्त घट्ट होऊ लागते किंवा रक्ताच्या गाठी होतात तेव्हा हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो आणि यामुळे Heart attack येण्याचा धोका वाढतो. हृदयविकारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांना रक्त पातळ करण्याचे औषध दिले जाते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या नसांमध्ये तयार होत नाहीत आणि हृदयाला पुरेसे रक्त मिळते.

पण काही घरगुती उपायांनी देखील तुम्ही रक्त घट्ट होण्यापासून वाचवू शकता, याविषयी आयुर्वेदिक डॉक्टर मिहिर खत्री यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊया कशाप्रकारे घरच्या घरी काही विशेष गोष्टी करून आणि त्यांचे पालन करून तुम्ही कशाप्रकारे शरीरातील रक्त पातळ बनवू शकता आणि हार्ट अटॅकच्या धोक्यापासून स्वत:ला बचावू शकता. (फोटो सौजन्य :- iStock)

एक्सपर्टकडून ऐका गुळ-लसणाच्या चटणीचे फायदे

हृदयविकाराची लक्षणे

हृदयविकाराची लक्षणे

शरीरातील रक्त पातळ कार्नायचे उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की तुम्हाला खरंच रक्त पातळ होण्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे काम्हणजेच जर तुम्हाला हृदय विकाराचा त्रास नसेल तर तुम्हाला रक्त पातळ करण्याची तितकी गरज नाही. पण हृदय विकाराचा त्रास आहे की नाही ते कसे ओळखावे? तर मंडळी काही लक्षणे यात तुम्हाला मदत करू शकतात.

  1. छातीत दुखणे
  2. छातीत सतत जडपणा जाणवणे
  3. धाप लागणे
  4. मान, जबडा, घसा, पाठ दुखणे
  5. हात पाय सुन्न होणे
हेही वाचा :  Shane Warne Died : शेन वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा ; सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, सेहवागसह अनेकांकडून शोक व्यक

ही सर्व लक्षणे हृदयविकार दर्शवतात.
(वाचा :- Sprouted Chana: मोड आलेल्या चण्यांत असतं भरपूर प्रोटिन, झटक्यात होतं पोट साफ व मुळव्याध पळतो 10 हात दूर,रोज खा)​

रक्त घट्ट होण्याची लक्षणे

रक्त घट्ट होण्याची लक्षणे

हेल्थ लाइनच्या मते, जोपर्यंत शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत तोपर्यंत रक्त घट्ट होण्याची लक्षणे दिसून येत नाहीत. रक्त गोठणे सुरू झाल्यानंतर पुढील लक्षणे दिसू शकतात. जसे की

  1. दृष्टी धुसर होणे
  2. चक्कर येणे
  3. जखम होणे
  4. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव
  5. संधिरोग
  6. डोकेदुखी
  7. हाय ब्लड प्रेशर
  8. त्वचेला खाज सुटणे
  9. थकवा
  10. धाप लागणे इत्यादी.

जर तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांना जाऊन दाखवावे.

(वाचा :- Holi Safety Tip: डोळ्यांतलं नाजुकसे बुभूळ फाडून टाकतो काचेचा रंग, डॉ. सांगितले 5 भयंकर नुकसान व बचावासाठी उपाय)​

रक्त पातळ कसे ठेवावे?

रक्त पातळ कसे ठेवावे?

आयुर्वेदिक तज्ज्ञ मिहिर खत्री यांच्या मते, गुळ आणि लसूण हे रक्त पातळ करण्यासाठी चांगले उपाय आहेत. गुळ हृदयासाठी आरोग्यदायी असतो आणि लसणात अँटी-एजिंग गुणधर्म असतात, जे शरीर निरोगी ठेवतात. तुम्ही हे दोन पदार्थ मिक्स करून एक चटणी बनवू शकता आणि ही चचटणी शरीरातील तुमचे रक्त पातळ करण्यास मदत करेल.
(वाचा :- सिंहासनामुळे बोबडं बोलणं होईल बंदच, मोत्यासारखे टपाटप येतील शब्द बाहेर, 5 मिनिटांत मिळेल सिंहासारखा करारा आवाज)​

हेही वाचा :  जेव्हा शेन वॉर्नने आपल्या एका चेंडूने जगाला केले होते थक्क; जाणून घ्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ बद्दल

अशी बनवा ही चटणी

अशी बनवा ही चटणी
  1. सर्वप्रथम अर्धा चमचा जुना गूळ घ्या.
  2. आता लसणाच्या 2 पाकळ्या सोलून स्वच्छ करा.
  3. ग्राइंडरमध्ये किंवा पाटा-वरवंटाच्या मदतीने दोन्ही गोष्टी बारीक करून चटणी बनवा.
  4. रिकाम्या पोटी किंवा जेवणासोबत या चटणीचे सेवन करा.

अनेकांना गुळ आणि लसणाचा कंटाळा येतो. हे दोन पदार्थ पाहून नाकं मुरडली जातात. तुम्ही सुद्धा अशाच व्यक्तींपैकी असाल तर आताच ही सवय बदला कारण हे दोन पदार्थ न खाणे तुम्हाला अनेक लाभांपासून वंचित ठेवू शकते.

(वाचा :- Mental Health Tips : स्ट्रेसमध्ये असाल तर चुकूनही खाऊ नका ‘हे’ 5 पदार्थ, नाहीतर मेंदूची होईल भयंकर अवस्था..!)​

या गोष्टींची घ्या काळजी

या गोष्टींची घ्या काळजी

आयुर्वेदिक डॉक्टर मिहिर खत्री म्हणतात की, हा आयुर्वेदिक उपाय अत्यंत प्रभावी आहे. पण याचा गुणधर्म उष्ण आहे. म्हणूनच उन्हाळ्यात ही चटणी खाऊ नये. शिवाय जर तुम्ही आधीच रक्त पातळ करणारे औषध घेत असाल तर हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(वाचा :- Sushmita Sen Attack: हार्ट अटॅकनंतर सुष्मिताच्या नसांमध्ये घातले स्टेंट,नसा ब्लॉक होण्यापासून वाचवतो हा पदार्थ)​

रक्त पातळ करतात हे पदार्थ

रक्त पातळ करतात हे पदार्थ

काही पदार्थ खाल्ल्याने रक्त घट्ट होण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवता येते. हळद, आले, लसूण, कोरफड आणि व्हिटॅमिन ई असलेल्या पदार्थांमध्ये अँटीकोआगुलंट गुणधर्म असतात, जे रक्त पातळ करण्यास मदत करतात. परंतु जर तुम्ही रक्त पातळ करणारे औषध घेत असाल तर ते सावधगिरीने वापरावे. NCBI च्या अहवालानुसार, रक्ताच्या गुठळ्या सामान्य होण्यासाठी व्हिटॅमिन के महत्वाचे आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक असतो. त्यामुळे उच्च रक्तदाब किंवा रक्त गोठण्याची समस्या असल्यास व्हिटॅमिन-के युक्त पदार्थांचे अतिसेवन करू नये.
डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  तुळजाभवानीचे मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब; मोजणीत धक्कादायक बाब उघड



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …