स्पार्कलिंग बॅकलेस पिंक ड्रेसमध्ये नववधू कियाराचा ग्लॅमरस अवतार, सिद्धार्थ म्हणतोय…

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने मागच्या महिन्यात लग्नगाठ बांधली. दोघांनाही आता कामाला सुरूवात केली असून कियाराने नुकतीच WPL ओपनिंग सेरिमनीला हजेरी लावत परफॉर्मन्स दिला. यावेळी केलेल्या कियाराच्या लुकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तर खास कमेंट केली होती नवरा सिद्धार्थने. गुलाबी रंगाच्या या शिमरी ड्रेसमध्ये कियारा अत्यंत सुंदर होती.

‘आजची गुलाबी रात्र’ असे कॅप्शन कियााराने फोटोला दिले होते. तर यावर नवरा सिद्धार्थने कमेंट करत ‘गुलाबी रंगात मलाही रंगवून टाक’ अशी कमेंट करत PDA Moment निर्माण केली आहे. चार वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले आहे. कियाराचा हा लुक अप्रतिम असून एक नजर टाकूया तिच्या या ग्लॅम लुककडे (फोटो सौजन्य – @kiaraaliaadvani Instagram)

​नववधू कियाराचा ग्लॅम लुक​

​नववधू कियाराचा ग्लॅम लुक​

नववधू कियाराने नुकताच WPL मध्ये परफॉर्मन्स दिला. तिच्या स्टाईलमुळे कोणाचीही नजर कियारावरून हटत नव्हती. मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला सिक्विन डिटेलिंग आणि बॅकलेस डिझाईन असणारा डॅझलिंग पिंक जंपसूट यावेळी परिधान करून कियाराने सौंदर्याची एक परिसिमाच सेट केल्याचे दिसून आले.

हेही वाचा :  Weather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; 'या' भागात सर्वात कमी तापमानाची नोंद

​कियाराच्या जंपसूटचीच चर्चा​

​कियाराच्या जंपसूटचीच चर्चा​

कियाराचा सिक्विन डिटेलिंग असणाऱ्या या जंपसूटचीच चर्चा आहे. ग्लॅमर आणि एलिगन्सचे समीकरण असणारा हा ड्रेस कियाराने उत्तमरित्या कॅरी केला असून. परफेक्ट फिगर फिटिंग आणि सिल्होट हग्ज तिच्या ड्रेसला देण्यात आल्या आहेत. तर या शिमरी डॅझलिंग ड्रेसमुळे तिच्यावरील नजर अजिबात हटत नाहीये.

(वाचा – पूजा हेगडेचा सुपर क्युट आणि ग्लॅमरस लुक, पुन्हा एकदा चाहत्यांचे हृदय केले घायाळ)

​शिमरी सिल्व्हर बूट्स​

​शिमरी सिल्व्हर बूट्स​

कियाराने या ड्रेससह Dainty Silver Earrings चा वापर केला असून शिमरी सिल्व्हर बूटने या ड्रेसला अधिक शोभा आणली आहे. रॉकस्टार वाईब्स देणारे हे बूट्स अत्यंत ट्रेंडी आणि स्टायलिश दिसत आहेत. तर कियाराचा हा लुक परफेक्ट रॉकस्टार लुक दिसून येत आहे.

(वाचा – विदुलाच्या निरागस सौंदर्यात ‘जीव झाला येडापिसा’, बिनधास्त लुकने करतेय घायाळ)

​क्रिस्टल आय मेकअप​

​क्रिस्टल आय मेकअप​

कियाराने या लुकसाठी न्यूड आयशॅडो, ब्लॅक आयलायनर, मस्कारा आयलॅशेस, पिंक प्लश आणि न्यूड पिंक लिपस्टिक शेडचा वापर केला आहे. तर परफॉर्मन्स लुक यावा म्हणून ग्लिट्ससाठी आय मेकअप करताना त्यावर क्रिस्टल्स लावून वेगळाच परफॉर्मन्स लुक केला आहे. या लुकमध्ये कियारा Drop Dead Gorgeous दिसून येत आहे.

हेही वाचा :  Shinde vs Thackeray: 'मी छोटी आव्हानं स्वीकारत नाही' म्हणणाऱ्या CM शिंदेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, "सभेतील मोकळ्या खुर्च्या..."

(वाचा – Exclusive: खणाची साडी ठरतेय सेलिब्रिटींची पसंती, सणासुदीलाही ठरतेय खास)

​सॉफ्ट वेव्ही हेअरस्टाईल​

​सॉफ्ट वेव्ही हेअरस्टाईल​

कियाराच्या ओव्हरऑल लुकला अधिक शोभा यावी यासाठी तिच्या ब्राऊन शेडेड केसांना सॉफ्ट वेव्ही कर्ल्स देण्यात आले आहेत. तर या संपूर्ण आकर्षक लुकसह आत्मविश्वासाने कियाराने दिलेल्या पोझ अत्यंत किल्लर असून चाहतेच नाही तर तिचा नवराही क्लिन बोल्ड झाल्याचे दिसून येत आहे.
कियाराचा हा लुक सध्या व्हायरल होत असून सर्वच तिच्या या लुकची चर्चा करत आहेत. तर शिमरी परफॉर्मन्स लुक अत्यंत लक्षवेधी ठरतोय.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …