तुळजाभवानीचे मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब; मोजणीत धक्कादायक बाब उघड

Tuljabhavani Temple Jewelry Missing : तुळजाभवानी मातेचे मौल्यवान आणि शिवकालीन दागिने गायब झाले आहेत. दागिन्यांच्या मोजणीत ही धक्कादायक बाब उघडकीस आली  आहे. देवीच्या खडावा, माणिक, मोती, पाचूचे 8 ते 10 मौल्यवान अलंकार गायब झाले आहेत. भाविकांनी तुळजाभवानीला वाहिलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंची मोजणी पूर्ण झाली. त्या दागिने मोजणीचा अहवाल जिल्हाधिका-यांना सादर झाला. त्यात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 
देवीच्या दागिन्यांच्या दुस-या क्रमांकाच्या डब्यात हे दागिने होते. ते नेमके कधी गायब झाले, याचा अंदाज बांधता येत नाही, असं पंच समितीनं आपल्या अहवालात म्हटलंय. हा अहवाल अद्याप जिल्ह्याधिका-यांनी स्वीकारलेला नाही. पुन्हा पडताळणी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्याचं समजते आहे.

तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार तसेच भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजणी पूर्ण होऊन तीन आठवडे लोटले. ही मोजणी पुर्ण झाल्यानंतर अत्यंत धक्कादायक बाब समोर आली असून दररोज वापरात असलेल्या 1 ते 7 क्रमाकांच्या डब्यापैकी क्रमांक 6 डब्यातले 8 ते 10 अलंकार गायब असल्याचे उघड झाले आहे. तर काही ठिकाणी नवीन अलंकार ठेवण्यात आले आहेत. यात देवीच्या खडावा, माणिक, मोती, पाचू आहेत. हे अलंकार पुरातन असल्याने या दागिन्यांचे मुल्यांकन करता येणार नाही. हे अलंकार कधी गायब झाले याचा आज अंदाज बांधताही येत नसून . शिवकालीन अलंकाराच्या मोजणीचा अहवाल सादर करण्याची 12 जुलै डेडलाइन होती. पंचकमीटीने अहवाल 18 जुलै रोजी सादर केला असून या अहवालात अनेक गंभीरबाबी समोर आल्या आहेत.

हेही वाचा :  पत्नी चोरण्याचा सण! महिलांना इम्प्रेस करण्यासाठी नटतात पुरुष; जोडीदार निवडायची अनोखी परंपरा

तुळजाभवानी मातेला दान केलेल्या सर्व दागिन्यांची जून महिन्यात मोजणी करण्यात आली. यावेळी तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मौल्यवान अलंकारासह मातेला भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजदाद केली. मोजणीची संपूर्ण प्रक्रिया समिती सदस्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा पूर्ण केली.सर्व मौल्यवान अलंकारांची 1999 ची यादी, 1963 ची यादी तसेच 2010 च्या रजिस्टरप्रमाणे नोंदी घेण्यात आल्या. मोजणी पूर्ण झाल्यावर 1963 साली नोंदवलेल्या कांही शिवकालीन अलंकाराच्या नोंदी आढळून आलेल्या नाहीत. कांही पुरातन अलंकार काढून त्या ठिकाणी नवे कमी वजनाचे अलंकार ठेवले गेल्याचा पंच कमिटीला संशय आहे.

तुळजाभवानी मातेच्या ऐवजाची मोजणी प्रक्रिया सात जून रोजी प्रारंभ होऊन 23 जून रोजी प्रक्रिया पूर्ण झाली. या दरम्यान 3 ते 4 दिवस मोजणी बंद होती. प्रत्यक्ष मोजणी 10 ते 12 दिवस चालली. मोजणीनंतर तीन आठवडे लोटल्यानंतर समिती सदस्यांनी अहवाल सादर केला आहे. हा अहवाल अद्याप जिल्ह्याधिकार्यांनी स्विकारलेल्या नाही. पुन्हा पडताळणी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या . मंदिर संस्थांच्या पंचांनी ही सगळी मोजणी ऑन कॅमेरा केली असून आता याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे सुपूर्दकरण्यात आला आहे आता याच्यावर गायब असलेले दागिने व नव्याने जमा करण्यात आलेले दागिने याबाबत जिल्हाधिकारी काय कार्यवाही करतात हे पाहणं गरजेचे आहे.

हेही वाचा :  Maharastra News: धाराशिव नाही, आता 'हे' नाव वापरा, उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश!

तुळजाभवानी मंदिरातून 71 ऐतिहासिक नाणी आणि काही दागिने गायब 

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिरातून ऐतिहासिक वस्तू गायब होत असल्याची तक्रार याआधी देखील नोंदवण्यात आली होती. अतिप्राचीन दागिन्यांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मंदिरातून 71 ऐतिहासिक नाणी आणि काही दागिने गायब झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यास अधिकारी जबाबदार असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. 

मुंबईत संकटमोचन हनुमान मंदिरात चोरी

मुंबईत्या घाटकोपर पोलीस ठाणे हद्दीत असल्फा येथील संकटमोचन हनुमान मंदिरातून सोनं-चांदीचे दागिने चोरणाऱ्याला 4 महिन्यांच्या तपासानंतर अखेर अटक झाली. मंदिराचे महंत रामदासजी महाराज कुंभमेळ्यासाठी गेले होते. त्यावेळी विकास तिवारी याला काही दिवसांसाठी पुरारी नेमण्यात आलं होतं. मात्र तो दागिने चोरून फरार झाला होता. महंतांना आरोपीच्या नातलगांकडून धमकीही दिली जात होती. अखेर पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलं. 

सांगलीच्या गणपती मंदिरात चोरी

सांगलीच्या हरिपूर इथल्या बागेत असणा-या गणपती मंदिरात चोरी झाली. रात्री दोन वाजता हा प्रकार घडला. गाभा-यातील लोखंडी कपाट तोडून गणपतीचे एक लाख रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. घटनेनंतर सांगली ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. तसंच ठसे तज्ज्ञ, श्वान पथकही घटनास्थळी पोहचलेत. 

हेही वाचा :  डीप नेक टॉप घालून मलायका अरोराने तापवलं इंटरनेटचं वातावरण, अर्जुनसोबत ट्विनिंग करत केली ट्रोलर्सची बोलती बंद



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …