रोज सकाळी प्याल धणे पाणी तर थायरॉईडसह अनेक आजारांवर करू शकाल मात

भारतीय स्वयंपाकघरात धणे, कोथिंबीर या पदार्थांचा सर्रास वापर होतो. स्वाद आणि सुगंध या दोन्ही बाबतीत हे पदार्थ पुढे आहेत. केवळ भाजीतच नाहीत तर धणे अनेक आजारांवरही गुणकारी ठरतात. औषधीय गुणांनी युक्त असणारे धणे हे थायरॉईडची समस्या कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतात. रोज सकाळी उपाशीपोटी धन्याचे पाणी प्यायल्याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो.

रिकाम्या पोटी धन्याच्या पाण्याचे नक्की काय फायदे होतात आणि थायरॉईडची समस्या कशी कमी होते यासाठी आम्ही डाएटिशियन ऐश्वर्या श्रीवास्तव यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून माहिती गोळा केली. ही माहिती तुम्हालाही उपयोगी ठरू शकते. त्याआधी जाणून घेऊन थायरॉईड नक्की का होतो? (फोटो सौजन्य – @dt.aishwarya Instagram)

डाएटिशियन ऐश्वर्या श्रीवास्तवने दिल्या टिप्स

​असंतुलित थायरॉईडचे प्रकार​

​असंतुलित थायरॉईडचे प्रकार​

डाएटिशियन ऐश्वर्या श्रीवास्तव यांनी संपूर्ण माहिती देताना सांगितले आहे की, दोन प्रकारचे असंतुलित थायरॉईड असतात. हायपोथारॉईडिजम आणि हायपरथायरॉईडिजम. याची कारणे जाणून घ्या –

  • विटामिन बी१२ ची शरीरात कमतरता
  • आयोडिन अधिक पोटामध्ये जाणे
  • ग्लँडमध्ये कॅन्सरची वाढ होणे
  • ग्रंथींमध्ये दाह, सूज अथवा जळजळ असणे
हेही वाचा :  वय वर्षे ५२ पण फिटनेस पंचविशीतला! ऐश्वर्या नारकरच्या हेल्दी आयुष्याचं रहस्य

या लक्षणांवरून थायरॉईड असल्याचे कळते. या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही धणे पाण्याचा नियमित वापर करू शकता. धणे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत जाणून घेऊया.

​प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत​

​प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत​

धन्याच्या पाण्याचे सेवन हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात आणि आजारांशी लढण्यास मदत करतात.

(वाचा – हनुवटीखाली लटकतेय चरबी? डबल चिन वर साचलेली चरबी काढण्यासाठी डीसीए, जाणून घ्या नेमके काय आहे)

​पचनशक्तीत सुधारणा​

​पचनशक्तीत सुधारणा​

धन्याचे पाणी पचनसंबंधित समस्या दूर करण्याचे काम करते. रोज धन्याचे पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यास, शरीरातील पचन अग्नी नियंत्रित करण्याचे काम करते. ज्यामुळे पोटातील अ‍ॅसिडिटीचा स्तर वाढत नाही. पोटातील जळजळ, गॅस, पोटदुखीसारख्या समस्यांमधून सुटका मिळते.

(वाचा -PCOS समस्येतून बाहेर यायचे असेल तर हे पदार्थ खावे, आयुर्वेदातील नियम ठरतील फायदेशीर)

​वजन कमी करण्यास उपयोगी​

​वजन कमी करण्यास उपयोगी​

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर धन्याचे पाणी आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करून घ्या. धन्याच्या पाण्यातील तत्व हे मेटाबॉलिजम प्रक्रिया अधिक वाढवून शरीरात जमा झालेली चरबी जाळण्यास सुरूवात करते आणि झपाट्याने वजन कमी होऊ लागते.

हेही वाचा :  बापरे! पुन्हा कोरोनाचा धोका, 90 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लागला लॉकडाऊन

(वाचा – सावधान! इअरफोनचा वापर देतोय बहिरेपणाला आमंत्रण, कानातील पेशी होतील मृत)

​थायरॉईडच्या समस्येवर फायदेशीर​

​थायरॉईडच्या समस्येवर फायदेशीर​

थायरॉईडची समस्या आजकाल अधिक सुरू झाली आहे. धन्याचे पाणी रोज सकाळी उपाशी पोटी प्यायल्यास, थायरॉईड कमी होण्यास मदत मिळते. धन्याच्या पाण्यात मिळणारे खनिज आणि विटामिन्स हे थायरॉईड हार्मोन जाळण्यास मदत करते.

​केसांच्या मजबूतीसाठी​

​केसांच्या मजबूतीसाठी​

धणे ही नेहमीच्या वापरातील गोष्ट आहे. धण्यांमध्ये विटामिन के, सी आणि ए अधिक प्रमाणात आढळते. धन्याच्या पाण्याच्या सेवनामुळे केसांची वाढ अधिक चांगली होऊन केसगळती, केस तुटणे समस्या सुटण्यास मदत मिळते.
या पाच प्रमुख फायद्यांव्यतिरिक्त शरीरातील साखरेची पातळी कमी करणे, विषारी पदार्थ बाहेर काढणे, सांधेदुखीपासून सुटका या आजारांवरही हे गुणकारी ठरते.

​थायरॉईडसाठी धन्याचे पाणी कसे बनवाल​

​थायरॉईडसाठी धन्याचे पाणी कसे बनवाल​
  • कोमट अथवा गरम पाण्यात तुम्ही दोन लहान चमचे धणे भिजवा. रात्रभर ठेवा
  • संपूर्ण रात्रभर धणे भिजल्यावर सकाळी हे पाणी उठल्यानंतर उपाशी पोटी प्या

या धण्याच्या पाण्याचा नक्कीच तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदा होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  Ayurveda and Smoking : सिगारेट ओढण्याची सवय अजिबात सुटत नाहीये? मग आयुर्वेद विशेषज्ञांनी सांगितलेले ‘हे’ उपाय एकदा ट्राय कराच..!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …