Health Tips: तुम्हीही नाश्त्यात चहासोबत पराठा घेताय? आज थांबवा ‘ही’ सवय., अन्यथा या मोठ्या आजाराचं…

Health Tips :  सकाळी उठल्यावर  पोट भरण्यासाठी आपण करतो आधी ब्रेकफास्ट. साधारणतः आपण ब्रेकफास्टसाठी काय खातो तर पोहे, शिरा , उपमा किंवा इडली, डोसा; पण सकाळी कामावर जायची गडबडअसते त्यात एवढं सगळं बनवणं बऱ्याचदा शक्य नसतं. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, त्यानंतर जेवण आणि त्याहून हलके रात्रीचे जेवण असा ठेवल्यास तुमचे आरोग्य स्वास्थ्यकारक राहण्यास मदत होते. (eating paratha with tea is bad for health)

आजकाल सारेच जण घाईत असतात.अशावेळी सकाळी उठून नाश्ता करणं अनेकांना जमत नाही. तर काही जण घाई घाईत बाहेर पडताना रेडी टू इटचे ( Ready to eat ) काही पदार्थ खाणं पसंत करतात. परंतू अनेक घरात आजही सकाळी बनणारी गरम गरम पराठा आणि चहा हा नाश्त्याचा हमखास पदार्थ आहे. पण चहा पराठा सकाळी नाश्त्याला खाणं किती योग्य आहे?  आज जाणून घेऊया. 

आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार, नाश्त्याला चहा आणि पराठा हा पर्याय फारसा आरोग्यदायी नाही. चहा चपाती एकत्र खाल्ल्याने त्यामधून मिळणारी पोषकद्रव्य फारच कमी असतात. 

सकाळी उठल्यानंतर शरीराला दिवसभर लागणारी उर्जा सकाळच्या नाश्त्यामधून मुबलक मिळणे गरजेचे आहे. सकाळच्या नाश्त्यामधून कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन घटक मुबलक मिळणे गरजेचे आहे. चहा आणि पराठामधून ही गरज पूर्ण होत नाही. चहा पराठा हा पर्याय आवश्यक असणारी कार्बोहायड्रेट, आयर्न आणि कॅल्शियमची गरज पूर्ण करत नाही. 

हेही वाचा :  Health Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड

चूकीचं कॉम्बिनेशन 

चहा हे कॅफिनयुक्त पेय असल्याने दिवसाची सुरूवात त्याने करणं आरोग्यदायी नाही. कोणताही अन्नपदार्थ चहासोबत घेणं हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. तसेच चहा पराठा या कॉम्बिनेशनमधून आयर्न आणि कॅल्शियम शरीरात मुबलक प्रमाणात शोषले जात नाही. परिणामी हा नाश्त्याचा पर्यायामधून शरीराला उर्जा आणि पोषणद्रव्य यापैकी काहीच मिळत नाही.  (eating paratha with tea is bad for health)

नाश्त्याला हेल्दी पर्याय कोणते ?

मग जर चहा पराठा हे कोम्बोदिनेशन योग्य नसेल तर योग्य काय आहे हे जाणून घेऊया.  चहा आणि पराठा  हा झटपट पर्याय वाटत असला तरीही फारसा उपयोगी नाही म्हणून त्याऐवजी भाजी चपाती किंवा दही चपाती , अंड, दूध,पनीर यांचा समावेश करा. 

यासोबतच कार्बोहायड्रेट्स मिळवण्यासाठी दलिया किंवा रव्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजेच उपमा, अप्पम यांचा समावेश अधिक करा. इडली सांबार हा सकाळच्या नाश्त्याला एक उत्तम आणि परिपूर्ण पर्याय आहे.(eating paratha with tea is bad for health)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …