Maharashtra Rain : आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट

Maharashtra Weather Heavy Rainfall Alert Today : राज्यात अगदी सर्वत्र जिल्ह्यात तुफान पाऊस (Maharashtra rain updates) सुरु आहे. मुंबईसह उपनगर ठाणे पालघर परिसरात जोरदार पावसाने सखल भागात पाणी साचलंय. राज्यातील कोकणसह विर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. हवामान विभागानं आजही अलर्ट जारी केले आहेत. शाळा, कॉलेजला सुट्टी दिली आहे. (Maharashtra Heavy Rain IMD Alert Today 28 july in maharashtra imd weather updates mumbai rains schools closed news in marathi )

जाणून घ्या कोणत्या विभागात कोणता अलर्ट

आज कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून रायगड आणि रत्नागिरी तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील पालघर आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा लक्षात देण्यात आला असून आज सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच गोंदिया जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.  

हेही वाचा :  मुंबईतील कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचं नाव द्या, मंगेशकर कुटुंबीयांची सरकारकडे मागणी

पालघरमध्ये पावसाची स्थिती

पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरूये. या पावसामुळे धामणी धरणाचे दरवाजे 2 मीटर ने उघडले आहेत. त्यामुळे सूर्या नदीत 97 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. या पावसामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. सूर्या नदीच्या पात्रातील पाणी गावाखालील शेतांमध्ये घुसलं आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून आज शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी….

मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलावही भरून वाहू लागला… मोडक सागर धरणाचे 2 दरवाजे उघडले असल्याची माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाने दिलीय. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या 7 तलावांपैकी आता 4 तलाव पूर्ण भरलेत. सर्वात आधी तुलसी तलाव भरला. त्यानंतर विहार आणि तानसा तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. मुंबईतल्या तलावांमध्ये सध्या 60 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …