रोज या 5 चुका करणारे लोक खेळतायत स्वत:च्या जीवाशी जीवघेणा खेळ, दुसरी चूक अत्यंत घातक, आजच सोडा नाहीतर..!

निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैली असणे अत्यंत आवश्यक आहे. पण जीवनशैली म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? वास्तविक, तुम्ही दररोज काय करता आणि कसे करता ही तुमची जीवनशैली बनते. ज्यामध्ये खाणंपिणं, एक्सरसाईज, ताणतणाव या सर्वांचा समावेश होतो. तुम्हाला सुद्धा कधी ना कधी हा प्रश्न पडलाच असेल की शरीर आजारी का पडते? जेव्हा तुमची जीवनशैली बिघडू लागते, तेव्हा शारीरिक अवयवांवरही परिणाम होतो.

हळुहळू Heart, Lungs, Liver, Stomach इत्यादी कमकुवत होऊन आजारांनी घेरले जातात. यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि अशी स्थिती उद्भवूच नये म्हणून काही गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. या गोष्टींमध्ये तुम्ही दरोरोज करत असलेल्या काही चुका देखील समाविष्ट आहेत. या 5 चुका तुम्ही टाळाव्यात असा सल्ला योगा टीचर स्मृती यांनी दिला आहे. (फोटो सौजन्य :- iStock, freepik.com/)

कच्चे सॅलड खाणे

कच्चे सॅलड खाणे

सॅलडमध्ये कच्च्या भाज्या आणि फळे असतात, ज्यामुळे थंडपणा आणि कोरडेपणा निर्माण होतो. याचे रोज सेवन केल्याने पचनसंस्थेचा अग्नी थंड होऊ लागतो. दीर्घकाळाने पोट फुगणे आणि वायू दोष यांसारख्या समस्या सतावू लागतात. म्हणून सॅलड हे नेहमी हेल्दी फॅट आणि मसाल्यांमध्ये हलके शिजवूनच खावे. हेच कारण आहे की जाणकार आणि अनेक तज्ज्ञ सुद्धा सॅलड योग्य पद्धतीने खाण्याचाच सल्ला देतात.

हेही वाचा :  Women Minister On Playboy Cover: महिला मंत्री झळकली Playboy मासिकाच्या मुखपृष्ठावर! बोल्ड फोटोमुळे एकच खळबळ

(वाचा :- Cancer Survivor Story: वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 पद्धतींनी जिंकली लढाई)​

रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणे

रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणे

सर्वप्रथम, सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी रिकाम्या पोटी आत गेले पाहिजे, यामुळे दिवसभर पचनक्रिया योग्य राखण्यास मदत होते. या उलट जर तुम्ही रिकाम्या पोटी चहा कॉफी प्यायलात तर मात्र मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तुम्हाला सुरुवातीला काहीच जाणवणार नाही पण हळूहळू, रिकाम्या पोटी चहा-कॉफी प्यायल्यास शरीरात बरीच विषारी द्रव्ये जमू लागतात.

(वाचा :- World Cancer Day : संधोशनात दावा – 1 नाही तब्बल 34 प्रकारच्या कॅन्सरचं मुळ आहेत रोज खाल्ले जाणारे हे 15 पदार्थ)​

कधीही शौचास जाणे

कधीही शौचास जाणे

तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी शौचास जाता का? जर तुम्ही असे करत असाल तर वेळीच ही सवय सोडा. कारण असे केल्याने शरीरातील घाण पूर्णपणे साफ होत नाही. सकाळी उठल्यापासून दोन तासांच्या आत पोट साफ करायला हवे. जर असे केले तर बद्धकोष्ठतेचा त्रास भोगावा लागत नाही व पोट सुद्धा साफ राहते. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शौचास जाण्यापूर्वी केवळ पाणीच प्यावे. अन्य कोणताही पदार्थ खाऊ वा पिऊ नये.

हेही वाचा :  Diabetes Study: कोरोनानंतर मधुमेही रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

(वाचा :- डायबिटीज, ब्लड प्रेशर, खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर फेकण्यासाठी खा हे 5 पदार्थ, चहा-कॉफीला चुकूनही लावू नका हात)​

अन्न चावून न खाणे

अन्न चावून न खाणे

आपल्या पोटात दात नसतात, म्हणूनच 32 वेळा अन्न चांगले चावून चावून खाण्याचा सल्ला दिला जातो. हे थोडे कठीण असले तरी एकंदरीत तुम्ही अन्न नीट चघळले पाहिजे. योग टीचर स्मृती यांच्या, जर तुम्ही दरोरोज 30 दिवस असे केले तर तुम्हाला त्याचे चांगले लाभ मिळण्यास सुरुवात होईल. तसेच अन्न खाताना केवळ अन्नच खावे. इतर कोणतेही काम जसे की फोन वापरणे, टीव्ही पाहणे यांसारख्या गोष्टी करू करू नये. यामुळे अन्न खाताना लक्ष विचलित होते.

(वाचा :- मुळव्याध, पोट साफ न होणं, डायबिटीज यासारखे शरीर आतून पोखरणारे तब्बल 20 भयंकर आजार मुळापासून उपटतात या 6 गोष्टी)​

काही खाल्ल्यावर लगेच अंघोळ करणे

काही खाल्ल्यावर लगेच अंघोळ करणे

जेव्हा आपण काही खातो तेव्हा शरीरात उष्णता निर्माण होते. ही उष्णता विशेषत: पचनसंस्थेत निर्माण होते, त्यानंतर लगेच आंघोळ केल्याने त्यात व्यत्यय येऊ शकतो आणि शरीरात त्रास होऊ शकतो. म्हणून जर तुम्ही जेवल्यानंतर किंवा खूप काही खाल्ल्यानंतर लगेच अंघोळ करत असला तर ही सवय बदला.
(वाचा :- 2023 Budget – खनिज व व्हिटॅमिनचं भांडार आहेत हे पदार्थ, रोज खाल्ले तर वयाच्या 60 नंतरही होणार नाहीत गंभीर आजार)​
टीप: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  Maharashtra Budget 2023 : सामान्यांना मोठा दिलासा, ज्योतिराव फुले योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार

कधीच करू नका या 5 चुका



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …