एका गाण्यासाठी उर्मिलानं घटवलं होतं पाच किलो वजन, पण एका गोष्टीमुळं थांबलं करिअर 

Urmila Matondkar Birthday : बॉलिवूडला एका पेक्षा अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज वाढदिवस आहे. बाल कलाकार म्हणून करिअरला सुरूवात करणाऱ्या उर्मिलाने खूप कमी काळात इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण उर्मिलाला खरी प्रसिद्धी मिळाली ती चायना गेट या चित्रपटातील छम्मा छम्मा गाण्यामुळं. या गाण्यासाठी उर्मिलाने तब्बल पाच किलो वजन कमी केलं होतं. शिवाय 15 किलो वजनाचे दागिणे घालून या गाण्यात डान्स केला होता. या गाण्यामुळे उर्मिलाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.   
 
छम्मा छम्मा या गाण्याचे शूटिंग परदेशात झाले होते. 15 किलो दागिणे घालून सलगपणे उर्मिलाने या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं होतं. तिच्या या गोष्टीवर दिग्दर्शक राजकुमार संतोषी खूप खूश झाले. कारण एकसारखे शूटिंग होणार असल्याने  उर्मिलाला त्यांनी जास्त दागिणे घालू नकोस असा सल्ला दिला होता. तरी देखील उर्मिलाने 15 किलो दागिने घालून गाण्याचे शूटिंग पूर्ण केले.  

उर्मिलाचं छम्मा छम्मा हे गाणं 1998 च्या चायना गेट या चित्रपटासाठी चित्रीत केले होते. त्यानंतर उर्मिलाने रंगीन, खूबसूरत, जानम समझा करो, जुदाई, सत्या यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. परंतु, असं म्हटलं जात  की, त्यावेळी यशाच्या शिखरावर असताना उर्मिलाने फक्त दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याच चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ती वेगवेगळ्या दिग्दर्शकांचे चित्रपट नाकारु लागली. यामुळे राम गोपाल वर्मा आणि उर्मिलाचे अफेअर असल्याच्या चर्चा देखील त्यावेळी रंगल्या होत्या. या गोष्टीमुळे उर्मिलाला चित्रपटासाठी कोणी विचारत नव्हते आणि याच एका या कारणामुळे उर्मिलाचे करियर थांबले असे म्हटले जाते. 
  
उर्मिला मातोंडकरने बीआर चोपडा दिग्दर्शित ‘कर्म’ व श्रीराम लागू  यांनी  दिग्दर्शीत केलेला  ‘जाकोल’ या  मराठी चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरवात केली. त्या नंतर उर्मिलाने शेखर कपूर  दिग्दर्शित ‘मासूम’ या चित्रपटात काम केले. ‘मासूम’ चित्रपटातून उर्मिलाची बालकलाकार म्हणून ओळख निमाण झाली. उर्मिलाने शाम बेनेगल दिग्दर्शीत ‘कलयुग’ या चित्रपटात रेखा आणि राज बब्बर यांच्यासोबत बाल कलाकार म्हणून काम केले आहे.

हेही वाचा :  'भारत जोडो यात्रेत उर्मिला मातोंडकरचा सहभागी

उर्मिला आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. ती 2018 ला ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर उर्मिलाने मॉडेल मोहसीन अख्खर मीर यांच्याशी लग्न केले. उर्मिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्मिलाने नुकताच झालेल्या बाल दिनावेळी तिचा एक फोटो शेयर केला होता. त्यांत तिने पिंक रंगाचा टॉप घातला होता आणि शूटिंगसाठी एक खास पोझ  दिली आहे.  

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …