महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर

Manohar Joshi : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या मनोहर जोशी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी डॉक्टरांच्या निगरानीखाली असून, त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळत असल्याचं प्रसिद्धीपत्रक हिंदूजाने जारी केले आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मुळचे बीड जिल्ह्यातील आहेत. 2  डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला.  शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. मनोरृहर जोशी हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी M.A. L.L.B  असे पदवी शिक्षण पूर्ण केले.  M.A. झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली. पण, नोकरीपेक्षा त्यांचा कल व्यवसाय करण्याकडे जास्त होता. त्यांनी कोहीनूर इंस्टीट्यूटही सुरू केली. जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यवयायिक प्रशिक्षण देणे सोपे होईल. 

मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 1976 ते 1977 या काळात त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर त्यांना लोकसभेत बढती मिळाली.

हेही वाचा :  "सिद्धूने तर काम चोख केलं, आता नाना...", भाजपाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना खोचक टोला! | bjp keshav upadhye tweet on punjab results navjyotsingh sidhu nana patole congress

शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते

मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते आहेत.  तीन टर्म विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिलेवहिले मुख्यमंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवली.  भ्रष्टाचाराचे आरोप आणि बाळासाहेबांची नाराजी यामुळे मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द पूर्ण करण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला होता. पुढच्या निवडणुकीत त्यांना लोकसभेवर पाठवण्यात आलं, केंद्रीय मंत्री, लोकसभा सभापती अशी अनेक पदे त्यांनी सांभाळली. उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत देखील त्यांचे नाव चर्चेत होते.

बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी 

2004 मध्ये मनोहर जोशी मुंबईतून लोकसभेची निवडणुक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. शिवसेनेनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं. 2009 मध्ये पुन्हा एकदा मनोहर जोशी लोकसभेसाठी उत्सुक होते, मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले. राजकीय वर्तुळात त्यांना प्रेमाने ‘जोशी सर’ म्हटले जाते.  मनोहर जोशी हे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. ते बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जात होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …