वय वर्षे ५२ पण फिटनेस पंचविशीतला! ऐश्वर्या नारकरच्या हेल्दी आयुष्याचं रहस्य

ऐश्वर्या नारकर कायमच आपल्या अभिनयाने चाहतांना स्तब्ध करत असते. पण आता तिने आपल्या फिटनेसने चाहत्यांना अवाक् केलंय. वयाच्या ५२ व्या वर्षी ऐश्वर्या नारकर यांनी दाखवलेला फिटनेस हा कमालीचा आहे. ऐश्वर्या नारकरचा अभिनय जसा बहरत केलाय अगदी त्याच पद्धतीने तिचा फिटनेस ही परफेक्ट झाला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ऐश्वर्या खूप ऍक्टिव आहे. सतत फिटनेस संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.

वयाच्या चाळीशीनंतर स्वतःचा फिटनेस सांभाळणे कठीण असते. याकाळात अनेक व्याधी देखील जडतात. अशावेळी तुमचा आहारच सुदृढ आरोग्याचं गुपित असतं. ऐश्वर्या नारकर अनेकदा तिच्या फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असते. तुमच्या डेली रूटीनमध्ये हे महत्वाचे ५ बदल करून तुम्ही देशील ऐश्वर्या सारखा फिटनेस ठेवू शकता. (फोटो सौजन्य – Aishwarya Narkar इंस्टाग्राम)

फिटनेसमध्ये पंचमहादेव महत्वाचे

आतापर्यंत आपण पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू यांना पंचमहाभूत म्हणत आलोत. पण हे पंचमहादेव आहेत. कारण हे सतत आपल्यासोबत सकारात्मकपणे असतात. ते आपल्याला काही ना काही देत असतात. या पंचमहादेवांप्रमाणेच आपल जीवन असलं पाहिजे. जेणे करून तुम्हाला असा ऐश्वर्या सारखा फिटनेस मिळू शकते.

हेही वाचा :  मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोर मारल्या उड्या; आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक

(वाचा – Homemade Chest Rub : छातीत जमा झालेला कफ सहज निघेल, खोकलाही होईल कमी, असा तयार करा घरगुती बाम)

ऐश्वर्या नारकरचा असा आहे फिटनेस

​संतुलित आहार

वयाच्या चाळीशीनंतर फिटनेस राखायचा असेल तर तुमचा आहार संतुलित असणे गरजेचे असते. अशावेळी तेलकट आणि बाहेरचे पदार्थ न खाता. आहार अतिशय संतुलित ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात फळभाज्या, पालेभाज्या, धान्य, कडधान्य आणि फळे यांचा न चुकता आहारात समावेश करावा. अशा संतुलित आहारामुळे तुमचा फिटनेस कायम राहतो. तसेच मांसाहार वयाच्या चाळीशीनंतर पचणे कठीण होतो. अशावेळी तो टाळावा.

(वाचा – रिकाम्या पोटी प्या कुळथाचं पाणी, मुतखडा-ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलपासून मिळेल सुटका))

​पाणी

जीवनात पाण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे पाण्याचे सेवन अधिक करावे. तुमच्या आरोग्यासोबतच तजेल त्वचा आणि केसांच्या आरोग्याकरता भरपूर प्रमाणात पाणी पिणे महत्वाचे आहे. पाणी किती प्यावे यासोबतच ते कसे प्यावे हे देखील महत्वाचे आहे. पाणी हळू हळू आणि बसून प्यावे. पटापट कधीच पाणी पिऊ नये. चांगल्या वर्कआऊटमुळे तुम्हाला तहान छान लागते. गरजेवेळी पाणी प्यावे.

हेही वाचा :  Health Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड

(वाचा – Natural Herbs For Thyroid : थंडीमुळे थायरॉइड बळावतो, घरच्या घरी या ५ उपयांनी मिळवा hyperthyroidism नियंत्रण)

​फळांचा समावेश

अनेकदा दुपारचे जेवण झाल्यावरही भूक लागते. पोटातील अग्नी सतत पेटता असावा याकरता शरीराला खाद्य पदार्थ लागते. अशावेळी काहीही न खाता फळांचा आहार घेतलात तर त्याचा शरीरावर सकारात्मक परिणामच होतो. लक्षपूर्वक जर तुम्ही सिझनची फळे खाल्लीत तर त्याचा फायदा होतो.

(वाचा – Diabetes च्या रुग्णांकरता अमृतासमान आहेत हे ५ हर्ब्स, डायबिटिजसह हृदयाची समस्याही राहील नियंत्रणात)

​पोटाची पोकळी

आकाशात ज्याप्रमाणे पोकळी निर्माण होते तशी पोकळी पोटात निर्माण होणे गरजेचे आहे. अशावेळी तुम्ही रात्रीचे जेवण ७ पर्यंत केले आणि सकाळपर्यंत काहीच खाल्ले नाही तर जवळपास १६ तासांची पोकळी निर्माण होते. याचा फिटनेस राखण्यास तुम्हाला मदत होईल.

(वाचा – Stroke Sign: स्ट्रोक येण्याच्या ७ दिवस आधीच दिसतात ही ८ लक्षणं, वेळेत जाणून घ्या नाहीतर जीवावर बेतेल))

​वायू रुपाप्रमाणे योगा महत्वाचा

योगाद्वारे तुम्ही शरीराला शुद्ध हवा आणि वायू देऊ शकता. अनेकदा ऐश्वर्या नारकर योगा करताना दिसतात. तिच्या फिटनेसचं हे गुपित आहे. योगा तुमचं शरीर फ्लेक्झिबल बनवतं आणि सुदृढ आरोग्यास योगाचा खूप फायदा होतो.

हेही वाचा :  वजन घटविण्यासाठी करा जेवणात असा बदल

(फोटो सौजन्य – Pleurisy (Pleuritis): खोकताना जाणवणाऱ्या Chest Pain ला हलक्यात घेऊ नका, जीवघेण्या आजाराच असू शकतं लक्षण)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …