Urfi Javed च्या अंगभर पुरळ, कशामुळे होते अशी अ‍ॅलर्जी? अशावेळी काय कराल?

Urfi Javed Bare Body Reason Revealed : उर्फी जावेद आतापर्यंत आपल्या अतरंगी फॅशनमुळे इंटरनेटवर चर्चेत असते. पण आता आपल्या अतरंगी आजारपणामुळे सगळ्यांना चकीत करत आहे. उर्फी जावेदने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करून याची माहिती दिली आहे.

उर्फी जावेद सोशल मीडियावर कायमच आपल्या स्टाईलचे फोटो शेअर करत असते. तिचे कपडे तिची फॅशन हा कायमच चर्चेचा विषय असतो. आता ती राजकीय वर्तुळातही चर्चेत आहे. (फोटो सौजन्य – Uorfi इंस्टाग्राम / iStock)

​उर्फीला कशामुळे झाली अशी अ‍ॅलर्जी

उर्फी एका सार्वजनिक कार्यक्रमात गेली होती. यावेळी तिने लोकरीचे कपडे परिधान केले होते. नेटकऱ्यांनी उर्फीला कपड्यांवरून विचारले असता तिने असा पोशाख का घातला याचे कारण सांगितले. उर्फी इंस्टाग्राम स्टोरीवर म्हणते की, “मला कपड्यांपासून ऍलर्जी झाली आहे.”

(वाचा – Ayurvedic Winter Tips: सर्दी खोकल्यावर आयुर्वेदिक रामबाण काढा, पाण्यात मिसळून प्या ६ आजारांतून मुक्त व्हा))

​उर्फीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काय म्हटलंय?

उर्फीने तिच्या पायांचा फोटो शेअर केला. ज्या पायावर असंख्य पुरळ आल्याचे दिसत आहे. उर्फी विचारतेय की, “हिवाळ्यात ही ऍलर्जी कोणाला होते?” होय आणि नाही या पर्यायांसह ही स्टोरी आहे. नंतर, तिने तिच्या पायांचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, “मला कपड्यांपासून अक्षरशः ऍलर्जी आहे.” उर्फीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. कपड्यांची मला गंभीर अ‍ॅलर्जी आहे.

हेही वाचा :  '...तर पोलिसांना कारवाई करावी लागेल', स्क्रिप्ट कोणाची? देवेंद्र फडणवीस म्हणतात 'सागर बंगल्यावर जर...'

(वाचा – Weight Loss : वडिलांच्या या एका विनंतीमुळे अदनान सामीने तब्बल १३० किलो वजन घटवलं, असा होता डाएट))

​थंडीत यामुळे होते अ‍ॅलर्जी

हिवाळ्यात उबदार कपडे घातल्यानंतर त्वचेवर खाज सुटणे, जळजळ होणे किंवा लालसरपणाचे चट्टे दिसणे तसेच पुरळ देखील येते. यासारख्या समस्या लोकरीच्या कपड्यांवरील ऍलर्जीची लक्षणे असू शकतात. हे केवळ लोकरीच्या कपड्यांमुळेच नाही तर मऊ खेळणी किंवा ब्लँकेट इत्यादींमुळे देखील होऊ शकते. या समस्येला कपड्यांमुळे होणारा त्वचारोग देखील म्हणतात. जेव्हा तुम्ही कपडे परिधान करता तेव्हा कपड्यांमधील फायबर, रंग किंवा इतर रसायनांवर प्रतिक्रिया शरीरावर होते असते.

(वाचा – Breast Asymmetry: स्तनांचा लहान-मोठा आकार सामान्य बाब की गंभीर आजार? तज्ज्ञ काय सांगतात…))

​ही घ्याल काळजी

लेनोलिन (lanolin clothes) हे लोकरीच्या कपड्यांमुळे होणाऱ्या अ‍ॅलर्जीचे कारण आहे. लेनोलिन हा एक प्रकारचा संरक्षक मेणाचा थर आहे जो मेंढी किंवा इतर सस्तन प्राण्यांच्या केसांवर आढळतो. आजकाल मेंढीच्या लोकरीऐवजी कृत्रिम आणि इतर कृत्रिम पदार्थांचा वापर उबदार कपडे तयार करण्यासाठी केला जात असल्याने, रंग आणि रसायने देखील अ‍ॅलर्जीचे कारण असू शकतात. म्हणून, उबदार कपडे खरेदी करताना ते बनवलेल्या सामग्रीची काळजी घेणे हा पहिला मार्ग आहे. आजकाल नैसर्गिक फायबरचे कपडे देखील बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, ते एक चांगला पर्याय असू शकतात.

हेही वाचा :  उर्फी जावेदचं सामान घेऊन ड्रायव्हरच पळाला, तासाभरानंतर परतला, पण...

(वाचा – Avala Benefits : मधुमेहापासून ते अगदी कँसरपर्यंतच्या ९ रोगांवर एक आवळा गुणकारी, आवळ्याचे जबरदस्त फायदे))

​संरक्षणासाठी काय करावे?

  • त्वचेवर खाज सुटली किंवा पुरळ उठत असेल तर फार खाचवू नका. अगदी सहन होत नसेल तर हलका हात फिरवा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणतेही लोशन लावता येते. खूप गरम पाण्याने आंघोळ करू नका, साबण वापरू नका.
  • तुम्हाला विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याची अ‍ॅलर्जी असेल तर नैसर्गिक रंगाचेच कपडे खरेदी करण्याचा प्रयत्न करा.
  • मुलांच्या कपड्यांवर किंवा अंथरूणावर मऊ खेळणी किंवा इतर मटेरियल उशा इत्यादी असतील तर ते काढून टाका.
  • दररोज आंघोळ करा आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या.)

(वाचा – Hrithik Roshan ला मरणयातनांचा अनुभव… या चुकांमुळे डिप्रेशनमध्ये गेला होता ,3-4 महिन्यांपर्यंत जाणवला हा त्रास))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …