Tag Archives: entertainment

Radhe Shyam : प्रभासचा ‘राधे श्याम’ आता ओटीटीवर येणार, ‘या’ भाषेत होणार प्रदर्शित

Radhe Shyam On Ott : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडेचा (Pooja Hegde) ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) सिनेमा प्रेक्षकांना 1 एप्रिलपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे.  राधा कृष्ण कुमारने ‘राधे श्याम’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या रोमॅंटिक सिनेमात पूजा हेगडे, सचिन खेडेकर, प्रियदर्शी पुलीकोंडा, भाग्यश्री, जगपती बाबू, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर, रिद्धी कुमार, साशा छेत्री, सत्यान …

Read More »

Oscar 2022 : ‘कोडा’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, ऑक्सर पुरस्कार सोहळ्यात मिळाले स्टँडिंग ओव्हेशन

Oscar 2022 : ऑस्कर (Oscars 2022 ) पुरस्कार सोहळ्याची जगभरातील सेलिब्रिटी आतुरतेने वाट पाहत असतात. कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर जेसिका ब्रेस्टनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पण ‘ऑस्कर 2022’ मध्ये ‘कोडा’ (Coda) सिनेमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘कोडा’ सिनेमाला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष …

Read More »

रिलीजच्या तिसऱ्या दिवशी ‘RRR’चा दबदबा, चित्रपटाने केली ‘इतक्या’ कोटींची कमाई!

RRR Box Office Collection : एसएस राजामौलींचा (SS Rajamouli) ‘RRR’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे आणि त्यामुळेच या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 223 कोटींची कमाई केली होती. चित्रपट केवळ भारतातच नाही, तर परदेशातही कमाईच्या बाबतीत पुढे आहे. हिंदी व्हर्जनच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले, …

Read More »

बॉक्स ऑफिसवर ‘द कश्मीर फाइल्स’ची जादू कायम, तिसऱ्या आठवड्यात जमवला ‘इतका’ गल्ला!

The Kashmir Files : अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) स्टारर ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे. चित्रपट रिलीज होऊन 17 दिवस उलटलेट, तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटामुळे लोक थिएटर्सकडे वळत आहेत. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवत चित्रपटाच्या जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शनने 250 कोटींचा टप्पा ओलांडला …

Read More »

Roadies 18 : ‘रोडीज 18’मध्ये मुस्कान जटाना स्पर्धक म्हणून दिसणार

Roadies 18 : मुस्कान जट्टानाला (Muskan Jattana) ‘बिग बॉस ओटीटी’मुळे लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. मुस्कान मूस या नावानेही प्रसिद्ध आहे. मुस्कान आता ‘रोडीज’ च्या 18 व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे.  मुस्कानला ‘बिग बॉस ओटीटी’ या रिअॅलिटी शोद्वारे चांगलीच लोकप्रियता मिळाली. ‘रोडीज’मध्ये सहभागी होण्याबद्दल मुस्कान म्हणाली,”रोडीज’मध्ये सहभागी होणं हा खरोखरच कठीण …

Read More »

RRR Box Office Collection : राजामौलींच्या ‘आरआरआर’ सिनेमाचा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

RRR Box Office Collection Day 2 : एस. एस राजामौली (SS Rajamouli) यांचा ‘आरआरआर’ (RRR) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशीदेखील चांगली कमाई केली आहे. या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 240 कोटींची कमाई केली आहे.  बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, ‘आरआरआर’ सिनेमाने दुसऱ्या दिवशी 23.75 कोटींची कमाई केली आहे. ‘आरआरआर’ सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. …

Read More »

KGF 2 Trailer Launch : सुपरस्टार यशच्या ‘KGF 2’ सिनेमाचा ट्रेलर आऊट

KGF 2 Trailer Launch : साऊथ सुपरस्टार यशच्या (Yash) बहुप्रतिक्षित ‘KGF 2’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. ‘बाहुबली’ सारखीच ‘KGF 2’ सिनेमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे.  ‘केजीएफ’ सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस आला होता. आता बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर, KGF Chapter 2′ च्या हिंदी आवृत्तीचा …

Read More »

Oscars Awards 2022 : अँड द ऑस्कर गोज टू… लॉस एंजेलिसमध्ये रंगणार ऑस्कर सोहळा!

Oscars Awards 2022 :  सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आज (रविवारी) रात्री आठ वाजल्यापासून लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतही ऑस्करच्या शर्यतीत94 व्या अकादमी पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील ‘रायटिंग विथ फायर’ या …

Read More »

Salman Khan : भाईजानने सोशल मीडियावर शेअर केले फोटो, चाहत्यांना पडली भुरळ

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. सलमान अनेकदा त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर जात असतो. तिथले फोटो तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच सलमानने पाण्यात डुबकी घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.  सलमानच्या पाण्यात डुबकी घेतानाच्या फोटोवर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत. …

Read More »

Suhana Khan : शाहरुखचा ‘पठाण’ लूक पाहून लेक सुहानाही स्तब्ध! फोटो रीपोस्ट करत म्हणाली…

Suhana Khan : बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) आपल्या जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्याची मस्क्युलर बॉडी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. नुकताच त्याने त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या किलर लूक दाखवताना दिसला आहे. शाहरुखचा हा लूक पाहून त्याची लेक सुहाना खानही (Suhana Khan) थक्क …

Read More »

रणबीर कपूर नव्हे विराट कोहलीला ‘ब्रह्मास्त्र’मध्ये घ्यायचं होतं!

Brahmastra : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022ची सुरुवात शनिवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्याने झाली. या खास प्रसंगी ‘ब्रह्मास्त्र’ची टीमही मैदानावर उपस्थित होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji), अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी आयपीएल 2022 लाँचचा आनंद लुटला. यावेळी अयान मुखर्जीला, तो ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात कोणत्या क्रिकेटरला …

Read More »

‘किंग’ खानने दाखवला ‘पठाण’चा किलर लूक, म्हणाला ‘शाहरुख अगर थोडा रुक भी गया…’

Pathaan : बॉलिवूडचा किंग खानच्या ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी ‘पठाण’ चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला होता. मात्र, त्यात फक्त अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) दिसले होते. त्यानंतर शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लूक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. पण, त्यांना बॅकग्राउंडमध्ये फक्त त्याचा आवाज ऐकू आला. आता शाहरुखनेच …

Read More »

विवाहित असतानाही अमृता सिंहच्या प्रेमात पडलेला सनी देओल, ‘या’ अभिनेत्रींशीही जोडले नाव!

Sunny Deol : बॉलिवूड सुपरस्टार सनी देओलने (Sunny Deol) 1983 मध्ये ‘बेताब’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. पहिल्या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमृता सिंह मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात एकत्र काम करत असताना, सनी देओल आणि अमृता एकमेकांना पसंत करू लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्याही खूप गाजल्या होत्या. अगदी …

Read More »

अरबोंची संपत्ती, एअर लाईन्सचा मालक अभिनेता रामचरण! जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी…

Ram Charan Birthday : ‘मगधीरा’, ‘येवडू’, ‘रंगस्थलम’, ‘आरआरआर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला दाक्षिणात्य अभिनेता रामचरण (Ram Charan) आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहेत. रामचरण हा साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी याचा मुलगा आहे. राम चरण याचा जन्म 27 मार्च 1985 रोजी चेन्नई येथे झाला. ‘चिरुथा’ या चित्रपटातून त्यानी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. रामचरण याला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी 2007मध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळाला …

Read More »

RRR : ‘RRR’अगोदर क्रांतिकारकांवर आधारित ‘या’ सिनेमांनी बॉलिवूडमध्ये केले राज्य

RRR : एस.एस. राजामौलींचा ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा 25 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम यांच्या जीवनावर आधारित आहे. अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या क्रांतिकारकांवर आधारित अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. हे सिनेमे प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील पाहता येतील.  …

Read More »

फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय, एबीपीच्या मंचावर आमिर खान म्हणाला…

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता, निर्माता, मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान (Aamir Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. पण गेले अनेक दिवस आमिर खान सोशल मीडियापासून दूर आहे. आमिर खानने आज एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या मंचावर आमिर म्हणाला,”कोरोनाकाळात आयुष्याबद्दल विचार करताना फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता”.  आमिर खानला फिल्म इंडस्ट्री का सोडायची होती? आमिर खान …

Read More »

क्या यही प्यार है! हृतिक अन् सबाची एकमेकांच्या पोस्टवर ‘प्रेमळ जुगलबंदी’

Hrithik-Saba Wedding : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) सध्या चर्चेत आहेत. दोघे एकमेकांना प्रेमाची कबुली कधी देणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आता सोशल मीडियावर हृतिक आणि सबा एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत.  हृतिक-सबा नेहमीच एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. अशातच हृतिकने सबासाठी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. सबाने पुण्यातील एका इव्हेंटचा व्हिडीओ …

Read More »

KGF2 Vs Jersey : ‘जर्सी’ आणि ‘केजीएफ 2’ 14 एप्रिलला बॉक्स ऑफिसवर आमने-सामने

KGF 2 Vs Jersey : एप्रिल महिन्यात ‘जर्सी’ (Jersey) आणि ‘केजीएफ 2’ (KGF 2) या सिनेमांत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. हे दोन्ही सिनेमे 14 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत. ‘जर्सी’ सिनेमा आधी 31 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.  ‘जर्सी’ आणि ‘केजीएफ 2’ हे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतील, अशी शक्यता …

Read More »

Heropanti 2 : टायगर श्रॉफच्या ‘हीरोपंती 2’मधील पहिलं गाणं रिलीज, ‘दफा कर’ची चाहत्यांमध्ये क्रेझ

Heropanti 2 : टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) ‘हीरोपंती 2’ (Heropanti 2) सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सिनेमातील पहिले गाणं ‘दफा कर’ (DaFa Kar) रिलीज झाले आहे. सोशल मीडियावर हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे.  ‘दफा कर’ गाण्यात टायगर श्रॉफ सिंहासनावर बसलेला दिसत आहे. तारा सुतारियानेदेखील तिच्या हटके अभिनयाने प्रेक्षकांना …

Read More »

‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘बच्चन पांडे’, नवीन वर्षात ‘या’ सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!

Bollywood Movies : नवीन वर्षात बॉलिवूडचे अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात ‘गंगूबाई काठियावाडी’पासून ‘बच्चन पांडे’पर्यंत अनेक सिनेमांचा सहभाग आहे. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.  बधाई दो : राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरचा ‘बधाई दो’ हा सिनेमा 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केवळ …

Read More »