Tag Archives: entertainment

Ranbir Alia Wedding : रणबीर कपूरनंतर आलिया भट्टनेही लग्नाच्या बातमीला दिला दुजोरा! म्हणाली ‘हे

Ranbir Kapoor-Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट कधी लग्न करणार, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. आलिया आणि रणबीरचे चाहते दोघांचे लग्न पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यामुळेच बॉलिवूडच्या या क्यूट कपलच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. अलीकडेच रणबीर कपूरने त्याच्या …

Read More »

Sanjay Dutt : KGF 2 मध्ये संजय दत्तचा दिसणार किलर अवतार, 25 किलोच्या चिलखतसह शूटिंग केले पूर्ण

Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या (Sanjay Dutt) अभिनयाचे लाखो चाहते आहेत. संजय दत्तने अग्निपथपासून मुन्ना भाईपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय दत्तने चित्रपटांमध्ये नायक आणि खलनायकाची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. यावेळी मात्र संजय दत्त त्याच्या खलनायकी भूमिकेमुळे चर्चेत आहे. नुकताच KGF 2 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये संजय दत्त अधीराच्या भूमिकेत दिसणार आहे. KGF 2 मध्ये …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ वादानंतर जॉन अब्राहमचं कपिल शर्मा शोवर मोठं वक्तव्य, म्हणाला ‘इथे आलो म्हणजे.

John Abraham : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या त्याच्या ‘अटॅक’ (Attack) चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. नुकताच तो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) प्रमोशनसाठी पोहोचला होता, मात्र आता त्याने कपिलच्या शोबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे, ज्याची सध्या खूप चर्चा आहे. बॉलिवूडचा हँडसम हंक स्टार जॉन अब्राहम सध्या त्याच्या नवीन चित्रपट ‘अटॅक’मुळे चर्चेत आहे. …

Read More »

ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ची अडचण आहे, त्यांनी स्वतःचा चित्रपट बनवून सत्य दाखवावे : अनुपम खेर

Anupam Kher : काश्मिरी पंडितांचे निर्गमन आणि हत्यांवरील, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या प्रसिद्ध चित्रपटात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) म्हणतात की, ज्यांना वाटते की, या चित्रपटात अपूर्ण सत्य दाखवण्यात आले आहे, ते स्वत:चे सत्य मांडू शकतात. अशा लोकांनी स्वत:चा चित्रपट बनवून लोकांना सत्य काय ते दाखवावे. त्यांनी चित्रपटाची निंदा करणाऱ्यांना …

Read More »

Lagan : ‘लगन’ सिनेमाचे धमाकेदार मोशन पोस्टर प्रदर्शित

Lagan : प्रेम म्हणजे नाजूक, अलवार अनुभूती. हळुवार, नाजूकतेने प्रत्येकाच्याच आयुष्यात येणारे हे प्रेम प्रत्येकालाच हवे असते. प्रेमाचा प्रतीक असलेला गुलाब मात्र या प्रेमाचा खरा अर्थ सांगून जातो. जेवढे नाजूक फुल तेवढेच बोचरे काटे. अर्थात प्रेम करणे सोपे पण निभावणे अतिशय कठीण. प्रेमाची वाट बिकट असली तरी धरलेली साथ शेवटपर्यंत निभावयाला लागणाऱ्या हिंमतीची गोष्ट घेऊन आलेल्या ‘लगन’ (Lagan) या मराठी …

Read More »

RRR Box Office : राजामौलींच्या ‘आरआरआर’ने पाच दिवसांत केला 100 कोटींचा टप्पा पार

RRR Box Office : एस.एस. राजामौली यांचा (SS Rajamouli) ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. हा सिनेमा 25 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.  ‘आरआरआर’ हा सिनेमा 25 मार्च रोजी तेलुगू, हिंदी,  तामिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. …

Read More »

‘गोपाळ नीलकंठ दांडेकर – किल्ले पाहिलेला माणूस’ हा माहितीपट देशभरात होणार प्रदर्शित

Documentary : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘गोपाळ नीलकंठ दांडेकर – किल्ले पाहिलेला माणूस’ (Gopal Nilkanth Dandekar – Kille Pahilela Manus) हा माहितीपट देशभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. गो. नी. दांडेकर यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा हा माहितीपट असणार आहे.  ‘गोपाळ नीलकंठ दांडेकर – किल्ले पाहिलेला माणूस’ या माहितीपटाची निर्मिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानं केली आहे. पुण्यातल्या एस. पी. कॉलेजमधील लेडी रमाबाई  हॉलमध्ये 2 …

Read More »

Kareena kapoor Khan : करीनाने चाहत्यांसोबत शेअर केले सैफ अली खानचे ‘हे’ गुपित

Kareena Kapoor Khan : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि तिची दोन्ही मुलं तैमूर आणि जेह (Taimur-Jeh) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. तिघांना अनेकदा स्पॉट केले जाते. त्यांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सैफ अली खानला पापाराझी किंवा मीडियासमोर पोज देणे आवडत नसल्याचे करीना कपूर खानने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.  करीना कपूर खान सोशल मीडियावर …

Read More »

Alia Bhatt : आलिया भट्ट ठरली महागडी अभिनेत्री, ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात चौथ्या स्थानावर

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. अशातच आलिया भट्ट 2021 वर्षातील महागडी अभिनेत्री ठरली आहे.  2021 चा ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवाल जाहीर झाला आहे. त्यानुसार आलिया भट्ट 2021 वर्षातील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. 2021 वर्षातील ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात आलिया चौथ्या स्थानावर आहे. तसेच …

Read More »

Bawaal : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ लवकरच होणार प्रदर्शित

Bawaal : साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) आणि सिने निर्माते नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘बवाल’ (Bawaal) असे या सिनेमाचे नाव आहे. हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.  ‘बवाल’ सिनेमात वरुण धवन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने वरुण आणि जान्हवी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ‘बवाल’सिनेमाचे दिग्दर्शन …

Read More »

विल स्मिथच्या कानशिलानं बदललं ख्रिसचं आयुष्य, आता अशी आहे परिस्थीती

मुंबई : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात झालेला प्रकार तर सर्वांनाच माहित आहे. जो सोशल मीडिवर चर्चेचा विषय ठरला होता. कदाचित ऑस्करच्या इतिहासात असं कधीच घडलं नसेल असा प्रकार त्या दिवशी घडला. खरंतर, ख्रिस रॉक डॉक्युमेंटरी फीचरसाठी ऑस्कर पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. याचदरम्यान ख्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीच्या केसांवर कमेंट केली. त्यामुळे स्मिथला राग आला. त्यानंतर तो स्टेजवर आला आणि …

Read More »

KGF Chapter 2 : यशने लिहिलेत ‘KGF 2’ सिनेमातील डायलॉग, दिग्दर्शकाने केला खुलासा

<p><strong>KGF Chapter 2:</strong> बहुप्रतिक्षित ‘केजीएफ 2′(KGF 2) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर सिनेमा 14 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी खुलासा केला आहे की, ‘केजीएफ 2’सिनेमातील संवाद यशने लिहिले आहेत.&nbsp;</p> <p>बॉक्स ऑफिसवर ‘केजीएफ 2’ हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी बंगळुरूमध्ये …

Read More »

RRR : राजामौलींचा ‘आरआरआर’ लवकरच होणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

RRR : एस. एस राजामौलींच्या (SS Rajamouli) ‘आरआरआर’ (RRR) सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचे जगभरातून कौतुक होत आहे. राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘आरआरआर’ सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.  ‘आरआरआर’ सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सिनेमागृहात प्रदर्शित झाल्याच्या आठ आठवड्यांनंतर हा सिनेमा …

Read More »

Rashmika Mandanna : एक्स्प्रेशन क्वीन रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत झळकणार रुपेरी पडद्यावर

Rashmika Mandanna : दाक्षिणात्य अभिनेत्री  रश्मिका मंदानाचे (Rashmika Mandanna) अनेक बॉलिवूड सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. अशातच रश्मिकाची रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल'(Animal) सिनेमात एन्ट्री झाली आहे. या सिनेमात रश्मिका रणबीर कपूरच्या विरोधात दिसणार आहे.  ‘अॅनिमल’ हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. रश्मिका मंदाना आधी परिणीती चोप्राला या सिनेमासाठी विचारण्यात आले होते.’अॅनिमल’या सिनेमाच्या शूटिंगला जून महिन्यात सुरुवात होणार आहे. …

Read More »

TOP 5 Bollywood Movies : कोरोनानंतर ‘या’ पाच सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई

TOP 5 Bollywood Movies : कोरोनानंतर पाच बॉलिवूड सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. यात ‘आरआरआर’, ‘द कश्मीर फाइल्स’, ‘सूर्यवंशी’, ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ’83’ सिनेमाचा समावेश आहे.  आरआरआर (RRR) : एसएस. राजामौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच हा …

Read More »

RRR ते KGF 2; ‘या’ चित्रपटांच्या ट्रेलरची चाहत्यांमध्ये क्रेझ

Bollywood Movies Trailer : भारतात सिनेमाप्रेमी खूप आहेत. त्यामुळेच प्रेक्षक सिनेमा प्रदर्शित होण्याआधी ट्रेलरसाठी उत्सुक असतात. सध्या सिनेप्रेमी प्रेक्षकांमध्ये ट्रेलरची चांगलीच क्रेझ आहे. चाहते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पाच सिनेमांच्या ट्रेलरसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.  ‘केजीएफ 2’ (KGF 2) : ‘केजीएफ 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक …

Read More »

‘आरआरआर’ने गाठला 500 कोटींचा टप्पा! हिंदी व्हर्जनचाही बॉक्स ऑफिसवर कल्ला!

RRR Box Office Collection : ‘आरआरआर’च्या (RRR) हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, चित्रपटाने सोमवारी 17 कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीची एकूण कमाई 4 दिवसांत 92 कोटींवर गेली आहे. याचाच अर्थ हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. याची शुक्रवारच्या ‘आरआरआर’च्या कलेक्शनशी तुलना केली, तर कमाईत 10-15 टक्क्यांची किंचित घट दिसून …

Read More »

बालकलाकार म्हणून पदार्पण, ‘शोले’ चित्रपटातील ‘सुरमा भोपाली’ने मिळवून दिली ओळख!

Happy Birthday Jagdeep : चाळीस-पन्नासच्या दशकात अभिनयाच्या वेडाने झपाटलेले अनेक कलाकार स्वप्ननगरी मुंबईत दाखल झाले. मात्र याच काळात अपघाताने, ओघाओघानेच या चंदेरी दुनियेत प्रवेश केलेल्या कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या कलाकारांपैकीच एक म्हणजे अभिनेते जगदीप (Jagdeep). आपल्या विनोदी अभिनय शैलीने त्यांनी सगळ्यांना हसवलेच, पण त्यांच्या नकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात राहिल्या. 29 मार्च 1939 रोजी मध्यप्रदेशातील दतियामध्ये जगदीप यांचा …

Read More »

मानसिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दीपिका पदुकोणला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) नैराश्याचा सामना केला आहे. नैराश्याचा सामना करत असताना तिने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातही चांगले काम केले आहे. तिच्या या धाडसासाठी तिला ‘टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.  28 मार्च रोजी दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दीपिकाने पोस्ट शेअर करत लिहिले आहे,’मला वाटतं सोमवारची सुरुवात …

Read More »

Amey Wagh : ‘माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत… त्यांना आरसा…’ अमेय वाघची पोस्ट चर्चेत

Amey Wagh : मराठी मनोरंजन सृष्टीतील फास्टर फेने अर्थात अमेय वाघ (Amey Wagh) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमेय वाघने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत हटके पोस्ट लिहिली आहे. त्याने पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना टोमणा मारला आहे.  अमेय वाघचा ‘झोंबिवली’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने …

Read More »