विवाहित असतानाही अमृता सिंहच्या प्रेमात पडलेला सनी देओल, ‘या’ अभिनेत्रींशीही जोडले नाव!

Sunny Deol : बॉलिवूड सुपरस्टार सनी देओलने (Sunny Deol) 1983 मध्ये ‘बेताब’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. पहिल्या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमृता सिंह मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात एकत्र काम करत असताना, सनी देओल आणि अमृता एकमेकांना पसंत करू लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्याही खूप गाजल्या होत्या.

अगदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही अमृता सिंह (Amrita Singh) आणि सनी देओलच्या भेटीगाठी सुरूच होत्या. पण, जेव्हा अमृताला सनी विवाहित असल्याचे समजले, तेव्हा तिने या नात्यातून माघार घेतली.

सनीने गुपचूप उरकलं लग्न!

खरं तर, पहिला चित्रपट ‘बेताब’ रिलीज होण्यापूर्वीच सनी देओलने पूजासोबत गुपचूप लग्न केले होते. अनेक वर्षे त्याने आपले लग्न गुप्त ठेवले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांना सनीच्या करिअरच्या सुरुवातीला त्याच्या लग्नाची माहिती सर्वांना मिळावी, असे वाटत नव्हते.  कारण, या गोष्टीचा त्याच्या फॅन फॉलोइंगवरही परिणाम होऊ शकला असता.

अमृतानंतर डिंपल कपाडियाची एण्ट्री!

त्याचवेळी अमृता सिंहशी नात तुटल्यानंतर अभिनेत्री डिंपल कपाडियाने (Dimple Kapadia) सनी देओलच्या आयुष्यात प्रवेश केला. हा तो काळ होता, जेव्हा डिंपल कपाडिया तिच्या वैवाहिक जीवनातील कलहामुळे पती राजेश खन्नापासून वेगळे राहत होती. त्याचवेळी सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांनी ‘मंजिल मंजिल’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते.

हेही वाचा :  Nysa Devgan : अजय देवगणच्या लेकीचा बॉयफ्रेंड? न्यासासोबत फोटोमध्ये दिसणारा तरुण कोण आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिंपल आणि सनीने गुपचूप लग्न करण्याचेही ठरवले होते. पण, जेव्हा डिंपलसोबतची सनीची असणारी जवळीक त्याची पत्नी पूजा देओलपर्यंत पोहोचली, तेव्हा तिने रागाने दोन्ही मुलांसह घर सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी सनीने त्याचे कुटुंब आणि डिंपलमधून कुटुंबाची निवड केली आणि डिंपलपासून अंतर ठेवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिंपल आणि सनी देओलचे अफेअर सुमारे 11 वर्षे चालले होते.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …