शाहिद कपूरच्या ताफ्यात मर्सिडीजची अल्ट्रा लक्झरी कार, धमाकेदार फीचर्स माहितीयेत का?

Shahid Kapoor’s Luxury Car : मर्सिडीज-बेंझच्या गाड्यांना लोकांची विशेष पसंती आहे. या लक्झरी ब्रँडचा मर्सिडीज-मेबॅक नावाचा अल्ट्रा लक्झरी ब्रँड देखील आहे. बॉलिवूड कलाकार आणि मोठ्या उद्योगपतींकडून मेबॅकला खूप मागणी असते. आता अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Meera Rajput) यांनी देखील मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास (Mercedes-Maybach S Class 580 ) खरेदी केली आहे. शाहिदने या कारचे ‘S580’ हे मॉडेल विकत घेतले आहे, ज्याची किंमत सुमारे 2.8 कोटी रुपये आहे.

अभिनेता शाहिद कपूर सुरुवातीपासूनच मर्सिडीज कारचा चाहता आहे आणि त्याने त्याचे वडील पंकज कपूर यांना देखील मर्सिडीज-बेंझ एमएल एसयूव्ही भेट दिली होती. गाड्यांची आवड असणाऱ्या शाहिद कपूरच्या ताफ्यामध्ये जीएल एसयूव्ही आणि एस-क्लास लक्झरी सेडान कार्सचा समावेश आहे. केवळ कारच नाही, तर शाहिदला बाईक चालवण्याचीही खूप आवड आहे आणि त्याच्याकडे मोटरसायकलचे कलेक्शनही आहे. शाहिद कपूरच्या गॅरेजमध्ये Harley-Davidson Fat Boy, BMW G310R आणि Yamaha MT-01 सारख्या अनेक महागड्या बाईक्स आहेत.

गाडीची किंमत ऐकलीत?

लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने नुकतीच भारतात आपली अल्ट्रा लक्झरी कार Maybach S-Class लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2.5 कोटी रुपये आहे. जगभरातील प्रसिद्ध लोक आणि नेते ही कार वापरतात.  Mercedes Maybach S-Class S580 ही कार तिच्या मजबूत इंजिनसाठीही जगभरात ओळखली जाते. Mercedes-Maybach S-Class 580च्या आयात केलेल्या मॉडेलची किंमत रु. 3.2 कोटी आहे, तर S-Class 580 मॉडेलची किंमत रु. 2.5 कोटी आहे, जी देशांतर्गत उत्पादित केली जात आहे.

हेही वाचा :  Daljeet Kaur Passes Away : पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर काळाच्या पडद्याआड

इशारे करा अन् गाडी चालवा!

मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास जेश्चर कंट्रोल फीचरसह येते, ज्यामुळे ड्रायव्हरला सनरूफ उघडणे, लाईट बंद करणे, सीटबेल्ट किंवा दरवाजे बंद करणे, असे विविध जेश्चर करता येतात. भारतात ही कार लेव्हल-2 ऑटोनॉमस ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरसह लॉन्च करण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने यात 13 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. कारला 19-इंचाचे रेट्रो मोनोब्लॉक डिझाईन व्हील्स देण्यात आले आहेत. एस-क्लास लिमोझिन ही 5.7 मीटर लांबीची कार आहे.

या गाडीमध्ये दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. पहिले 4.0-लिटर V8 इंजिन, जे 496 Bhp पॉवर आणि 700 Nm पीक टॉर्क बनवते. कंपनीने या इंजिनला 48-व्होल्ट माईल्ड-हायब्रिड सिस्टम दिले आहे, जे स्वतंत्रपणे कारला 19.7 bhp पॉवर आणि 200 Nm पीक टॉर्क प्रदान करते. तर, दुसरे 6.0-लिटर V12 इंजिन 603 Bhp पॉवर आणि 900 Nm पीक टॉर्क बनवते. कंपनीने दोन्ही इंजिन पर्यायांना 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …