Mika Singh : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरींच्या (Bappi Lahari) जाण्याने मनोरंजन विश्वाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये वयाच्या 69व्या वर्षी बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. Obstructive Sleep Apnea (OSA) आणि चेस्ट कंजेशन या आजारामुळे बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेले 29 दिवस बप्पी लाहिरी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. पण घरी आल्यानंतर त्यांनी प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करावं लागलं आणि इथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
बप्पीदांच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. या प्रसंगी गायक मिका सिंहने (Mika Singh) बप्पी दा यांना खास संगीतमय श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी मिकाने एबीपीला मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान, गिटार वाजवत त्यांनी बप्पीदांची सर्व हिट गाणी गायली आणि त्यांच्या सर्व आठवणी शेअर केल्या.
वयाच्या 10व्या वर्षी बप्पी दाच्या डिस्को गाण्यावर त्याने आयुष्यात पहिल्यांदा कसा डान्स केला ते मिकाने सांगितले. 4 वर्षांपूर्वी कॅलिफोर्निया, यूएसए येथे बप्पीदा यांच्यासोबत झालेल्या एका भव्य स्टेज शोच्या आठवणीही त्यांनी शेअर केल्या. मिका सिंहने बप्पी लाहिरीच्या स्टाईल आणि आउटफिटबद्दलही सांगितले. बप्पीदांसारख्या दिग्गज व्यक्तीसोबत बसून गाणं गाणे हे एक सौभाग्य असल्याचे मिकाने सांगितले. मिकाने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे.
पाहा पोस्ट :
‘तम्मा तम्मा लोगे’, ‘डिस्को डान्सर’, ‘याद आ रहा है तेरा प्यार’ ही सुपर हिट गाणी बप्पी लाहिरी यांनी गायली आहेत. तरुणाईला डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे बप्पी लाहिरी हे आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. आपल्या हटक्या शैलीनं त्यांनी बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या संगीताची जादू बॉलिवूडचं नाही, तर हॉलिवूडमध्येही दिसली होती.
हेही वाचा :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha