RRR : ‘RRR’अगोदर क्रांतिकारकांवर आधारित ‘या’ सिनेमांनी बॉलिवूडमध्ये केले राज्य

RRR : एस.एस. राजामौलींचा ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा 25 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम यांच्या जीवनावर आधारित आहे. अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या क्रांतिकारकांवर आधारित अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. हे सिनेमे प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील पाहता येतील. 

मंगल पांडे : द रायझिंग (2005)
इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या मंगल पांडे यांच्या जीवनावर 2005 साली ‘मंगल पांडे : द रायझिंग’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. केतन मेहताने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. 

नेताजी सुभाषचंद्र बोस – द फॉरगॉटन हिरो (2005)
नेताजी  सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2005 मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित ‘नेताजी सुभाषचंद्र बोस – द फॉरगॉटन हिरो’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. श्याम बेनेगल यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. हा सिनेमा प्रेक्षकांना एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. 

हेही वाचा :  Sanjay Dutt : KGF 2 मध्ये संजय दत्तचा दिसणार किलर अवतार, 25 किलोच्या चिलखतसह शूटिंग केले पूर्ण

द लिजेंड ऑफ भगतसिंह (2002)
‘द लिजेंड ऑफ भगतसिंह’ या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले होते. बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने ‘द लिजेंड ऑफ भगत सिंह’ सिनेमात भगत सिंहची भूमिका साकारली होती. हा सिनेमा प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. 

मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (2019)
कंगना रनौतने 2019 साली ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ सिनेमात लक्ष्मीबाईची भूमिका साकारली होती. या सिनेमाची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये केली जाते. हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. 

संबंधित बातम्या

ABP Ideas of India : फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय, एबीपीच्या मंचावर आमिर खान म्हणाला…

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Heropanti 2 : टायगर श्रॉफच्या ‘हीरोपंती 2’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, ‘दफा कर’ची चाहत्यांमध्ये क्रेझ!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …