Tag Archives: entertainment

बहुचर्चित ‘वेडात वीर दौडले सात’ मध्ये अभिनेत्री माधुरी पवारची लागली वर्णी

Madhuri Pawar On Vedat Marathe Veer Daudle Saat : ‘महाराष्ट्राची महाअप्सरा’ अशी ओळख असलेली अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवारने (Madhuri Pawar) आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. नृत्या बरोबरच छोट्या पडद्यावरील ‘वाहिनीसाहेब’ ही व्यक्तिरेखा असो की ‘रानबाजार’ वेबसिरीज मधील  राजकारणातील एक महत्वकांशी, करारी प्रेरणा सायाजीराव पाटील सानेची भूमिका असो माधुरी पवारने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळविली आहे.  …

Read More »

साहिर लुधियानवी यांच्या अधुऱ्या प्रेम कहाण्या जाणून घ्या…

Sahir Ludhianvi : प्रेमात पडलेला प्रियकर आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी कवी, गीतकार, शायर साहिर लुधियानवी (Sahir Ludhianvi) यांच्या शायरी किंवा कवितांचा वापर करतो. साहिर यांच्याकडे अफाट शब्दसंपत्ती असूनही त्यांना त्यांचं प्रेम शब्दांमध्ये व्यक्त करता आलं नाही. कधी एकतर्फी प्रेमामुळे, तर कधी प्रेम व्यक्त न केल्याने किंवा नात्यात आलेल्या अडचणींमुळे साहिर यांच्या अनेक प्रेम कहाण्या अधुऱ्या राहिल्या आहेत. आज ‘व्हॅलेंटाईन …

Read More »

‘ड्रीम गर्ल-2’ चा टीझर पाहिलात?

Dream Girl 2 teaser:  यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 2023 ची सुरुवात ‘पठाण’ (Pathaan) या सुपरहिट चित्रपटानं झाली. आता लवकरच ‘ड्रीम गर्ल 2’ हा (Dream Girl 2) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आयुष्मान खुराणाच्या (Ayushmann Khurrana) ड्रीम गर्ल या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये पठाण म्हणजेच शाहरुख …

Read More »

Sahir Ludhianvi Amrita Pritam Lovestory : अव्यक्त न झालेली असफल प्रेमकहाणी…

Valentines day 2023 Special Sahir Ludhianvi Amrita Pritam Love Story : प्रेम अमर आहे. त्याला जात, धर्मासह कोणत्याही बंधनात बांधता येत नाही. लैला-मजनू, रोमियो-ज्युलिएट ही पात्रं आज नसली तरी त्यांच्या प्रेमकथा आजही जिवंत आहेत. त्याचप्रकारे कवी साहिर लुधियानवी (Sahir Ludhianvi) आणि लेखिका अमृता प्रितम (Amrita Pritam) यांची अनोखी प्रेमकहाणी ऐकून डोळे पाणावतात. त्यांच्या प्रेमकथेला बॉलिवूडची सर्वात मोठी प्रेमकथा (Sahir Ludhianvi …

Read More »

सिड-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Reception : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर त्यांनी मुंबईत रिसेप्शनचे आयोजन केलं होतं. या रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींसह परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra) यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती.  ‘शेरशाह’मध्ये विक्रम बत्रा यांच्या …

Read More »

‘मुघल-ए-आझम’ ते ‘चलती का नाम गाडी’; मधुबालाचे ‘हे’ सिनेमे आज घबरल्या नक्की पाहा…

Madhubala Movies On OTT Platform : बॉलिवूड सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्रींच्या यादीत ‘मधुबाला’ (Madhubala) यांची गणना होते. मधुबाला यांचे खरे नाव ‘मुमताज जहान बेगम नहलवी’ होते. पण त्या ‘बेबी मुमताज’ या नावाने देखील लोकप्रिय होत्या. तसेच ‘मुघल-ए-आझम’ (Mughal-E-Azam) या सिनेमामुळे त्या ‘अनारकली’ या नावाने घराघरांत लोकप्रिय झाल्या. 14 फेब्रुवारी 1933 रोजी जन्मलेल्या मधुबाला यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच घायाळ केलं. आजही त्यांचे …

Read More »

‘डेस्टिनेशन वेडिंग’ साठी सेलिब्रेटींकडून राजस्थानला पसंती

Destination Wedding: ‘डेस्टिनेशन वेडिंग’ (Destination Wedding) करण्याचं स्वप्न अनेकांचे असते. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा वाड्यामध्ये ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करण्याचा ट्रेंड सध्या अनेक जण फॉलो करत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड फॉलो केला होता. विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी देखील परदेशात जाऊन लग्न केले होते. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी इटलीला …

Read More »

श्रेयसला मागावी लागली माफी; शेअर केली पोस्ट, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Shreyas Talpade: प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा त्याच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकतो. सध्या श्रेयसनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. श्रेयस हा त्याच्या एका चित्रपटामधील सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. श्रेयसचा कमाल धमाल मालामाल (Kamaal Dhamaal Malamaal) हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता. आता 11 वर्षांनंतर या चित्रपटामधील एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर …

Read More »

झीनत अमान यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिला जुन्या आठवणींना उजाळा

Zeenat Aman: 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी आपल्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. झीनत अमान यांनी सोशल मीडियावर (Social Media) एन्ट्री केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर अकाऊंट क्रिएट केलं आहे. झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.  झीनत अमान …

Read More »

‘नय्यो लगदा’ गाण्यामुळे सलमान खान ट्रोल

Salman Khan Trolled For Naiyo Lagda Song: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील पहिलं गाणं काल (12 फेब्रुवारी) प्रेक्षकांच्या भेटीस आलं. ‘नय्यो लगदा’ (Naiyo Lagda) असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यामधील सलमान आणि अभिनेत्री पूजा हेगडे …

Read More »

‘बिग बॉस 16’च्या महाअंतिम सोहळ्यात सलमाननं लग्नाबाबत सोडलं मौन

Salman Khan On Being Single : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) वयाच्या 57 व्या वर्षीदेखील बॅचलर लाईफ जगतो आहे. दबंग खान अनेकींसोबत रिलेशनमध्ये आला असला तरी संसार थाटण्यात तो कमी पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,”मी माझ्या मर्जीने अविवाहित नाही”.  लग्न न करण्याबाबत सलमान म्हणाला… ‘बिग बॉस 16’ गाजवणारा …

Read More »

‘बिग बॉस 16’ चा विजेता एमसी स्टॅनला काय काय मिळालं?

MC Stan: बिग बॉस-16 (Bigg Boss 16) चा ग्रँड फिनाले काल (12 फेब्रुवारी) रॅपर एमसी स्टॅन  (MC Stan)  हा बिग बॉस-16 चा विजेता ठरला आहे.  तर शिव ठाकरे हा बिग बॉस-16 चा पहिला रनरअप ठरला आहे.  एमसी स्टॅन, शिव ठाकरे  (Shiv Thakarey)  आणि  प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस 16 चे टॉप-3 स्पर्धक होते. त्यानंतर प्रियांका ही …

Read More »

पठाणनं 19 व्या दिवशी केली एवढी कमाई

Pathaan Box Office Collection : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट पठाण (Pathaan) हा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट शाहरुखसाठी खास आहे कारण या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुखने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखच्या या कमबॅकची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत होते. शाहरुखच्या पठाणमधील डायलॉग्सला आणि अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची …

Read More »

‘बिग बॉस 16’च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅनची खास पोस्ट

Bigg Boss 16 Winner MC Stan Post : ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) या बहुचर्चित कार्यक्रमाचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला असून यात एमसी स्टॅनने (MC Stan) बाजी मारली आहे. विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅन म्हणाला,”आईचं स्वप्न अखेर पूर्ण केलं”.  एमसी स्टॅनने ‘बिग बॉस 16’च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. एमसी स्टॅनने भाईजान …

Read More »

MC Stan :’Bigg Boss 16’चा विजेता एमसी स्टॅन कोण आहे?

Bigg Boss 16 Winner MC Stan : ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) विजेतेपदावर एमसी स्टॅनचं (MC Stan) नाव कोरलं आहे. पुणेकर असलेल्या एमसी स्टॅनचं (Bigg Boss 16 Winner MC Stan) खरं नाव अल्ताफ शेख (Altaf Shaikh) असं आहे. त्याला बालपणीच संगीताची गोडी लागली. त्याने लोकप्रिय रॅपर रफ्तारसोबतही गाणं गायलं आहे. पण ‘वाता’ या गाण्यामुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला. या …

Read More »

एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता

Bigg Boss-16: बिग बॉस-16  (Bigg Boss-16)  च्या विजेत्याची घोषणा झालेली आहे. एमसी स्टॅन (MC Stan) हा बिग बॉसच्या 16 व्या सिझनचा विजेता ठरला आहे. एमसी स्टॅन हा बिग बॉस-16 ची विजेती ठरल्यानं आता त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. सोशल मीडियाद्वारे एमसी स्टॅनचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.  शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thakarey), एमसी …

Read More »

‘नय्यो लगदा’ मध्ये सलमान आणि पूजाचा रोमँटिक अंदाज

Salman Khan: हिंदी चित्रपटसृष्टीतील भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘नय्यो लगदा’ (Naiyo Lagda) या गाण्याचा टीझर सलमाननं सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर सलमानचे चाहते उत्सुकतेने या गाण्याची …

Read More »

‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

Masuta: वेगवेगळ्या विषयांवर आधारित मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. असाच एक वेगळ्या विषयावर आधारित ‘मसुटा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामाजिक मनोरंजक सिनेमाच्या व्याख्येत अचूक बसणारा ‘मसुटा'(Masuta) हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठी रसिकांसमोर एक आगळी वेगळी कथा येणार आहे.  काशिबाई फिल्म्स प्रोडक्शन आणि साईसागर प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या …

Read More »

वाचा जग्गु आणि ज्युलिएट चित्रपटाचा रिव्ह्यू

Jaggu Ani Juliet Romance/Drama Director: Mahesh Limaye Starring: Vaidehi Parashurami, Amey Wagh Jaggu Ani Juliet Review: एक खूप छान वाक्य मी वाचलं होतं. ते वाक्य असं होतं की एकांतात प्रश्न पडतात आणि प्रवासात उत्तरं सापडतात. मला वाटतं ती उत्तरं सापडण्याची गोष्ट म्हणजे जग्गु आणि ज्युलिएट हा सिनेमा.  केवळ प्रेमकथेपुरता हा सिनेमा अजिबात मर्यादित नाही. त्या पलिकडे जाऊन खूप काही सांगण्याचा, …

Read More »

जगभरातील बॉक्स ऑफिसवर पठाणचा डंका; 18 व्या दिवशी केली एवढी कमाई

Pathaan box office Day 18: अभिनेता शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट खास आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखचा कमबॅक हा ब्लॉकबस्टर ठरला आहे. पठाण चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत. आता 18 व्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात पठाण चित्रपटाचं 18 व्या दिवसाचं …

Read More »