‘बिग बॉस 16’च्या महाअंतिम सोहळ्यात सलमाननं लग्नाबाबत सोडलं मौन

Salman Khan On Being Single : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) वयाच्या 57 व्या वर्षीदेखील बॅचलर लाईफ जगतो आहे. दबंग खान अनेकींसोबत रिलेशनमध्ये आला असला तरी संसार थाटण्यात तो कमी पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,”मी माझ्या मर्जीने अविवाहित नाही”. 

लग्न न करण्याबाबत सलमान म्हणाला…

‘बिग बॉस 16’ गाजवणारा शालीन भनोटला (Shalin Bhanot) ‘बिग बॉस’च्या माध्यमातून सलमान खानकडून अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत. महाअंतिम सोहळ्यादरम्यान ती म्हणाली, “मीदेखील आता सलमानसारखं एकटं राहण्याचा विचार करत आहे”. यावर सल्लू म्हणाला, “मी माझ्या मर्जीने अविवाहित नाही”. सलमानच्या या वक्तव्यावर ‘भाईजानला लग्न करायचं आहे का?’, ‘संसार करायचा आहे का?’ असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

सलमान ‘या’ अभिनेत्रींसोबत होता रिलेशनमध्ये (Salman Khan Relationship)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या सिनेमांसह रिलेशनमुळे देखील अनेकदा चर्चेत असतो. संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), कतरिना कैफ (Katrina Kaif), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), यूलिया वंतूर सारख्या अभिनेत्रींसोबत सलमान खान रिलेशनमध्ये होता. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. यातील काही अभिनेत्री आता लग्नबंधनात अडकल्या असून काही आजही सिंगल आहेत. 

हेही वाचा :  'हा अर्थसंकल्प...'; विवेक अग्रिहोत्री यांच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

महाअंतिम सोहळ्यादरम्यान भाईजानने रिलीज केलं ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातील पहिलं गाणं

‘बिग बॉस 16’च्या महाअंतिम सोहळ्यादरम्यान ‘गदर 2’ या सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं. तसेच भाईजानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमातील पहिलं-वहिलं गाणं रिलीज करण्यात आलं. सिनेमातील ‘नयो लगदा’ (Naiyo Lagda) हे रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यातील सलमान खान (Salman Khan) आणि पूजा हेगडेच्या (Pooja Hegde) केमिस्ट्रिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा सिनेमा 21 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : मेरा कोई नाम नही लेकीन…. ‘भाईजान’ सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर आऊटSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …