श्रेयसला मागावी लागली माफी; शेअर केली पोस्ट, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Shreyas Talpade: प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा त्याच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकतो. सध्या श्रेयसनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. श्रेयस हा त्याच्या एका चित्रपटामधील सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. श्रेयसचा कमाल धमाल मालामाल (Kamaal Dhamaal Malamaal) हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता. आता 11 वर्षांनंतर या चित्रपटामधील एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सीनच्या व्हिडीओला रिप्लाय करत श्रेयसनं माफी मागितली आहे. 

श्रेयसची पोस्ट

कमाल धमाल मालामाल या चित्रपटामधील एका सीनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या सीनवर अनेक नेटकरी सध्या आक्षेप घेत आहेत. या व्हायरल व्हिडीओला रिप्लाय करत श्रेयसनं एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये श्रेयसनं लिहिलं, ‘एखाद्या चित्रपटाचं शूटिंग करताना अनेक घटकांचा विचार केला जातो. चित्रपटामधील सीनच्या शूटिंग दरम्यान एखाद्याची मानसिकता, दिग्दर्शकाच्या गरजा, वेळेची मर्यादा आणि बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो. पण व्हिडीओमध्ये जे काही दिसत आहे त्यासाठी मी स्पष्टीकरण देत आहे, असं नाही. मी एवढेच म्हणू शकतो की, हे पूर्णपणे अनावधानाने झाले होते आणि मी त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो. मी ते दिग्दर्शकाच्या निदर्शनास आणायला हवे होते. मी कोणाच्याही भावना मुद्दामून दुखावणार नाही किंवा असे काहीही पुन्हा करणार नाही.’  श्रेयासच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 

हेही वाचा :  जन्माच्या वेळी दुसऱ्या बाळासोबत झाली होती राणीची अदला बदल! तुम्हाला माहितीये का ‘हा’ किस्सा?

कमाल धमाल मालामाल या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये श्रेयससोबतच नाना पाटेकर, ओम पूरी आणि परेश रावल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहेत. श्रेयस तळपदेनं कमाल धमाल मालामाल या चित्रपटात जॉनी ही भूमिका साकारली आहे.

श्रेयस तळपदेचे चित्रपट:

श्रेयसच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्याच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. श्रेयस हा मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. इक्बाल, पोस्टर बॉईज, गोलमाल 3, ओम शांती ओम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच त्यानं  ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेमधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गेल्या वर्षी श्रेयसचा ‘आपडी थापडी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Aapdi Thaapdi : श्रेयस तळपदेच्या “बेबीफेस”ची सोशल मीडियावर चर्चा; व्हिडीओ होतोय व्हायरल

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …