सिड-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Reception : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर त्यांनी मुंबईत रिसेप्शनचे आयोजन केलं होतं. या रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींसह परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra) यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती. 

‘शेरशाह’मध्ये विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत झळकलेला सिद्धार्थ 

सिद्धार्थ-कियाराच्या मुंबईत पार पडलेल्या रिसेप्शनला कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती. त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विक्रम बत्रा यांचा जुळा भाऊदेखील वेडिंग रिसेप्शनला उपस्थित होता. सिद्धार्थचा ‘शेरशाह’ (Shershaah) हा सिनेमा कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात सिडने कॅप्टन बत्रा यांची भूमिका साकारली होती. तर कियाराने या सिनेमात कॅप्टन बत्रा यांच्या गर्लफ्रेंडची म्हणजेच डिंपल चिमाची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ-कियारा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ‘शेरशाह’ सिनेमातील सिद्धार्थ-कियाराच्या अभिनयासह त्यांची जोडीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 


कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. कॅप्टन विक्रम आणि डिंपल कॉलेजमध्ये असताना एकमेकांना डेट करत होते. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कारगिल युद्धात कॅप्टन बत्रा शहीद झाले. 

हेही वाचा :  इरफानच्या निधनानंतर 'अशी' झालेली मुलाची अवस्था

सिड-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी

सिड-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यात सुपरस्टार अजय देवगण, काजोल, आलिया भट्ट, अनुपम खेर, भूमी पेडणेकर, रकुल प्रीत सिंह, विक्की कौशल, दिशा पटानी, करीना कपूर, शिल्पा शेट्टी आणि नीतू सिंह या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

वेडिंग रिसेप्शननंतर कियारा आडवाणी ट्रोल

वेडिंग रिसेप्शननंतर कियारा आडवाणी नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे. वेडिंग रिसेप्शनला कियाराने एक स्टायलिश ड्रेस परिधान केला होता. पण तिने मंगळसूत्र न घातल्याने तसेच कुंकू न लावल्याने नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. ‘हे वेडिंग रिसेप्शन नसून अॅवॉर्ड शो आहे असं दिसतंय’, ‘कियाराने मर्यादा ओलांडल्या’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

संबंधित बातम्या

Genelia D’Souza: ‘हा ड्रेस आणि हेअर स्टाईल…’; सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनसाठी जिनिलियानं केलेल्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …