दुधात भिजवा काजू आणि मिळवा अफलातून फायदे, ऐकाल तर व्हाल हैराण

काजू आपल्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा नक्कीच कमी नाहीत. यामध्ये आवश्यक पोषक तत्व अर्थात फायबर, कॅल्शियम, विटामिन के, मॅग्नेशियम, विटामिन बी६, मँगनीज, जिंक, लोह आणि फॉस्फोरस आढळतात, जे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास फायदेशीर ठरतात. काजूच्या सेवनामुळे एनिमिया, ब्लड शुगर, बद्धकोष्ठता, हृदयरोग अनेक आजार दूर मिळतात. तर काजू दुधात भिजवून खाल्ल्याने याचा दुप्पट फायदा मिळतो. जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती (फोटो सौजन्य – Freepik.com)

​हाडांच्या मजबूतीसाठी​

​हाडांच्या मजबूतीसाठी​

Cashews For Bones: तुम्हाला हाडांना मजबूत बनवायचे असेल तर रोज दुधात काजू भिजवून खावेत. एक ग्लास दुधात ४-५ काजू भिजवून रोज नाश्त्यामध्ये खाल्ल्यास याचा फायदा मिळतो. दुधात जास्त प्रमाणात कॅल्शियम असते, तर काजूमधील विटामिन के, मॅग्नेशियम हे आवश्यक तत्व हाडांना मजबूत प्रदान करतात. वृद्धांनाही हाडांचा त्रास कमी करण्यासाठी काजूचे दूध दिले जाते.

​बद्धकोष्ठतेवर गुणकारी​

​बद्धकोष्ठतेवर गुणकारी​

तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही सुटका मिळविण्यासाठी दुधात भिजवलेल्या काजूचा आहारात समावेश करावा. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करावा. रात्री दुधात काजू भिजवून ठेवावे आणि सकाळी हे दुधात भिजलेले काजू खाल्ल्यास, लवकरच बद्धकोष्ठतेपासून तुम्हाला आराम मिळतो.

हेही वाचा :  चंदा रे चंदा रे....; NASA पासून ISRO पर्यंत सर्वांनाच चंद्रावर जायची घाई, म्हणे तिथं दडलंय मोठं रहस्य

(वाचा – रोज सकाळी भिजवलेले खजूर आरोग्यासाठी ठरतात वरदान, हृदयरोग ते बद्धकोष्ठता आजारांवर गुणकारी)

​प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत ​

​प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत ​

आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, दुधात काजू भिजवून खाल्ल्याने प्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते. यामध्ये विटामिन आणि मिनरल दोन्ही अधिक प्रमाणात दिसून येते. तुम्ही नियमित स्वरूपात काजूचे सेवन केल्यास, लवकर आजारी पडत नाही. मात्र याचे योग्य प्रमाणात सेवन करावे.

(वाचा – डायबिटीसपासून PCOD पर्यंत नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी ठरते बाजरीची भाकरी, जाणून घ्या फायदे)

​रक्ताची कमतरता भासत नाही​

​रक्ताची कमतरता भासत नाही​

दूध आणि काजूचे सेवन केल्याने एनिमिया अर्थात रक्ताची कमतरता होण्याचा आजार होत नाही. कारण काजू आणि दुधात लोह अधिक प्रमाणात आढळते. तसंच हिमोग्लोबिनचा स्तर वाढविण्यासाठीही याचा उपयोग होतो.

(वाचा – फ्रिजमध्ये किती वेळ अन्न साठवणे ठरते योग्य? नाहीतर तुमच्या पोटात ‘विष’ जातंय हे समजा)

​डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर​

​डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर​

डायबिटीस असणाऱ्या रूग्णांसाठी दुधात भिजवलेल्या काजूचे सेवन अत्यंत फायदेशीर मानले जाते. कारण दूध आणि काजूचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. त्यामुळे सकाळी तुम्ही नाश्त्यात दुधात भिजवलेले काजू खावेत.

​त्वचेसाठीही उत्तम​

​त्वचेसाठीही उत्तम​

दुधात भिजवलेल्या काजूचे सेवन हे त्वचेसाठीही उत्तम ठरते. काजूच्या दुधामध्ये कॉपर अधिक प्रमाणात मिळते, जे त्वचेमध्ये प्रोटीन निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत आणि चेहरा अधिक तजेलदार राहण्यास मदत मिळते.

हेही वाचा :  ना फाशी, ना विषारी इंजेक्शन; अमेरिकेत पहिल्यांदाच दिला जाणार भयानक मृत्यूदंड

​कसे कराल काजू दुधाचे सेवन​

​कसे कराल काजू दुधाचे सेवन​

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात साधारण ५-७ काजू भिजत घालावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काजूचे हे दूध व्यवस्थित उकळून घ्यावे. जेव्हा दूध उकळेल तेव्हा भांड्यात काढून हे प्यावे. लक्षात ठेवा काजू हे शरीरासाठी उष्ण ठरतात. त्यामुळे याचे अधिक सेवन करू नये.

टीप – हा लेख माहितीकरिता देण्यात आला असून याबाबत अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात

Maharashtra Drought :  हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात …

राजेश खन्नांची ‘ती’ हिरोईन जिची सावत्र वडिलांनीच केली हत्या; आत्ता 13 वर्षांनी…

Laila Khan Murder Case: अभिनेत्री लैला खान प्रकरणा तब्बल 13 वर्षानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. …