free travelling: फुकटात फिरायचं का ? भारतात आहेत हे ऑप्शन्स…एकदा जाणून घ्या…

FREE TRAVELIING DESTINATIONS INDIA: जर तुम्हाला फिरण्याची आवड आहे  (travelling hobby) तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. बऱ्याचदा नुसती आवड असून फायदा होत नाही फिरण्यामध्ये बरेच पैसे खर्च होतात आणि जर बजेट नसेल तर फिरण्याचा प्लॅन कॅन्सल करावा लागतो.

पण जर तुम्हाला कोणी सांगितलं कि आता फ्री मध्ये फिरा,फ्री मध्ये खा.प्या मजा करा तर? हो भारतात काही अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही फ्रीमध्ये फिरू शकता (FREE TRAVELLING )राहू शकता आणि सहलीचा आनंद घेऊ शकता.त्यामुळे आता बजेट नसेल तर नाराज होण्याची गरज नाहीये,तुम्ही बिनधास्त ट्रिप प्लॅन (trip planning) करू शकता.चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ही ठिकाणं.. (free travelling in india visit this places and enjoy your trip )

मणिकरण साहिब गुरद्वारा (manikarn sahib gurudwara)

हिमाचल प्रदेशमध्ये फिरण्याचं प्लांनिंग करत असाल तर माणिकरण साहिब गुरुद्वारा (Manikaran Sahib Gurudwara)  या ठिकाणी जाऊन राहू शकता.इथे तुम्हाला फक्त जेवणच नाही तर राहणं आणि पार्किंग सुद्धा अगदी मोफत दिल जात आहे. त्यामुळे जर तुम्ही गाडी घेऊन जाणार असाल तरी पार्किंग च टेन्शन घ्यायची गरज नसणार आहे त्यामुळे हे एक उत्तम ठिकाण आहे.

हेही वाचा :  जुन्नरच्या हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार; अजित पवार

आनंद आश्रम  (aanand aashram)

जर तुम्ही केरळला फिरायला जाण्याचा प्लॅन आखात असाल तर आनंद आश्रम (Anand ashram)  हे एक बेस्ट ठिकाण आहे जिथे तुम्ही राहू शकता.यातील खासियत म्हणजे इथे जे जेवण बनवलं जात ते अगदी कमी तेलात आणि कमी मसाल्यांचा वापर करून बनवलं जात त्याचा फायदा असा कि याने आपल्या पोटातच त्रास देखील होणार नाही आणि आरोग्य देखील उत्तम राहील 

गीता भवन (geeta bhavan)

ऋषिकेश ही जागा अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे जर  ऋषिकेश फिरायला जाणार असाल तर गीता भवन मध्ये जरूर थांबा . गीता भवन हा आश्रम खूप मोठा आहे जवळपास हजार खोल्यांचा हा आश्रम आहे इथे सत्संग आणि योगा सेशनसुद्धा घेतले जातात .आणि मुख्यतः गंगा नदीच्या काठावर हा सुंदर आश्रम आहे त्यामुळे एक वेगळा अद्भुत अनुभवदेखील तुम्हाला मिळतो 

ईशा फाउंडेशन (isha bhavan)

इशा फाउंडेशन कोयम्बतूर पासून 40  किमी  दूर आहे इथे भगवान शंकरांची सुंदर मूर्ती आहे हे नक्कीच तुमचं मन मोहून टाकते या ठिकाणी राहण्याची खूप छान सोय आहे त्याचसोबत जर तुम्हाला इथे काही दान करायची इच्छा असेल तर तेही तुम्ही स्वइच्छेने करू शकता..

हेही वाचा :  कोणत्या सापाच्या विषापासून बनते अ‍ॅण्टी वेनम? कुठे आढळतो? जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …