राजेश खन्नांची ‘ती’ हिरोईन जिची सावत्र वडिलांनीच केली हत्या; आत्ता 13 वर्षांनी…

Laila Khan Murder Case: अभिनेत्री लैला खान प्रकरणा तब्बल 13 वर्षानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी परवेज टाक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. 13 वर्षानंतर कोर्टाने या प्रकरणी शिक्षेचा फैसला सुनावला आहे. परवेज टाक लैला खान हिचे सावत्र वडील आहेत. फेब्रुवारी 2011मध्ये महाराष्ट्राच्या इगतपुरीमधील एका फार्म हाऊसवर लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली आणि मृतदेह तिथेच पुरण्यात आले होते. 

लैला खान मर्डर केसमध्ये 9 मे रोजी सत्र न्यायालयाने परवेज टाकला दोषी ठरवले होते आणि शिक्षेच्या सुनावणीवर फैसला राखीव ठेवला होता. दरम्यान, प्रॉपर्टीवरुन त्यांच्यात झालेल्या वादावरुन परवेज टाक यानेच त्याच्या सावत्र मुलीची हत्या केली होती. इतकंच नव्हे तर, आरोपी परवेजने लैलाच्या आईसह 6 लोकांची निर्घृणपणे हत्या केली होती. फेब्रुवारी 2011मधील ही घटना आहे. 

सत्र न्यायालयात या हत्ये प्रकरणी आरोपी परवेज टाक याला दोषी ठरवण्यात आले होते. मागील आठवड्यात सरकारी वकील पंकज चव्हाण यांनी हे प्रकरण दुर्मिळ असल्याचे म्हटलं होते. तसंच, आरोपी परवेज यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. चव्हाण यांचे म्हणणे होते की, ही एक सुनियोजित हत्या असून अमानुष कृत्य करण्यात आले व एकाच कुटुंबातील सहा लोकांची हत्या करण्यात आली व त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. 

हेही वाचा :  जिवंत बाळाला बॅगेत भरले आणि... नवी मुंबईत घडली धक्कादायक घटना

काय आहे संपूर्ण प्रकरण?

2011मध्ये मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात 6 लोक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. कित्येक महिने झाले तरी या प्रकरणी काहीच तपास लागला नव्हता. इतकंच नव्हे तर, पोलिसांनीही इगतपुरीच्या फार्म हाऊसमधुन जुलै 2012मध्ये 6 हाडांचे सांगाडे सापडले होते. त्यांतर ऑक्टोबर 2012मध्ये लैला खान मर्डर केसमध्ये मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर, या प्रकरणातील दुसरा आरोपी शकीर हुसैन अद्यापही फरार आहे. पोलीस अद्यापही त्याला ताब्यात घेऊ शकली नाहीये. 

पोलिसांचे म्हणणे होते की, सेलिना आणि तिचे कुटुंबीय परवेजला नोकरासारखी वागणूक देत आहेत असा त्याचा समज होता. तसंच, सेलिना आणि तिचे संपूर्ण कुटुंब दुबईत शिफ्ट झाले तर ते त्याला भारतातच सोडून निघून जातील, असं त्याला वाटतं होतं. तसंच, सेलिना तिच्या दुसऱ्या पतीला इतगपुरीचे फार्महाऊस सांभाळण्यासाठी देणार होती. त्यासाठी तिने पॉवर ऑफ अटर्नीदेखील केली होती. त्याचबरोबर सेलिनाचे शेखसोबत वाढती जवळीकदेखील परवेजला आवडत नव्हती त्यामुळं त्याने हत्येचा प्लान बनवला होता. त्याने आधी सेलिनाची हत्या केली. मात्र सेलिनाची हत्या करताना घरातील बाकी सदस्यांनी त्यांना पाहिले त्यामुळं त्याने लैला खान व तिच्या भावा-बहिणींचीही हत्या केली. 

हेही वाचा :  Maratha Reservation : कुठल्या आधारावर आरक्षण दिलं? रोहित पवारांना का वाटते भीती? म्हणाले...

कोण आहे लैला खान?

लैला खानचे खरे नाव रेशमा पटेल होते. तिचा जन्म 1978 साली पाकिस्तानात झाला होता. तिच्या आईचे नाव सेलिना पटेल असून तिने तीन लग्न केले होते. सेलिना पटेलचे पहिले लग्न नादिर शाह पटेलसोबत झाले होते. त्यांचीच मुलगी लैला खान होती. लैलाला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. तिचे हे स्वप्न 2002 साली पूर्ण झाले. तिने कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर चार वर्षानंतंर लैला खानने 2008 मध्ये चित्रपट वफा ए डेडली लव्ह स्टोरीतून पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता. या चित्रपटात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत आहेत.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

C section delivery Viral Video : आई… या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि …