टायर बनवणाऱ्या कंपनीने स्विकारली टूथ ब्रश टेक्नॉलॉजी, खराब झाल्यावर बदलणार पहिला रंग

मुंबई : चांगल्या प्रवासासाठी तुमच्या कारची फिटिंग खूप महत्त्वाची आहे. वाहनाच्या फिटनेसमध्ये बर्‍याच गोष्टी येतात परंतु टायरच्या समस्येचा सामना केला जाणारा सर्वात सामान्य गोष्ट. बर्‍याच वेळा आपण खराब टायरने गाडी चालवत असतो आणि तो केव्हा बदलण्याची गरज असते हे आपल्याला कळत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एक असा सोपा मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे टायर बदलणे टूथब्रश बदलण्याइतके सोपे होईल.

खराब टायर सारखा ड्रायव्हिंगला मोठा धोका नाही 

खराब टायरसह वाहन चालवणे खूप धोकादायक आहे. बाजारात असे अनेक टूथ ब्रशेस आहेत. ज्यामध्ये मधोमध वेगवेगळ्या रंगांचे ब्रश दिलेले असतात.

जेव्हा या वेगवेगळ्या रंगांच्या ब्रशेसचा रंग फिकट होऊ लागतो.  तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की टूथब्रश बदलला पाहिजे. या पद्धतीचा अवलंब करून टायर उत्पादक CEAT ने टायर बदलण्यासाठी इंडिकेटर सारखी पद्धत आणली आहे.

खराब होताच बदलणार टायरचा रंग 

CEAT कंपनीने नुकतेच असे टायर लाँच केले आहेत ज्यात टायरच्या मधल्या भागात वेगळ्या रंगाची पट्टी देण्यात आली आहे. पण जेव्हा तुम्ही नवीन टायर घ्यायला जाल तेव्हा तुम्हाला वेगळ्या रंगाची पट्टी अजिबात दिसणार नाही.

हेही वाचा :  आधी पुस्तकं लिहिलं मग बनवली हीट वेबसीरिज; Khakeeमधील भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधत गुन्हा दाखल

परंतु जसे जसे तुमचे वाहन वापरले जाते आणि टायर झीज होऊ लागतो, तेव्हा तुम्हाला टायरचा नवीन रंग पाहायला मिळेल. या नवीन रंगामुळे तुम्हाला कळेल की आता तुम्हाला तुमचा टायर बदलावा लागेल.

या गाड्यांकरता असणार खास पर्याय 

सध्या कंपनीने हे टायर 2 आकारात लॉन्च केले आहेत. हे टायर्स सध्या टोयोटा इनोव्हा 15 इंच आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा साठी 16 इंच मध्ये लॉन्च करण्यात आले आहेत.

आगामी काळात कंपनी इतर वाहनांसाठीही असे टायर आणू शकते, अशी अपेक्षा आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …