सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात चविष्ट पदार्थांची मेजवानी!

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Food Menu : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) शाही विवाहसोहळा सध्या चर्चेत आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यांच्या लग्नासंबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील मेन्यूबद्दल माहिती समोर आली आहे. 

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील मेन्यू जाणून घ्या…

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात अनेक चविष्ट पदार्थांची मेजवानी असणार आहे. गोडाधोडाचे पदार्थ, चायनीज, दाल-बाटी चुरमा, थाई ते पंजाबी पद्धतीचं जेवण अशा अनेक पदार्थांचा समावेश सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात असणार आहे. पंजाबी पदार्थांसह राजस्थानी पदार्थदेखील सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील मेन्यूमध्ये असणार आहेत. 

पाहुण्यांसाठी खास आयोजन

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात 20 पेक्षा अधिक गोड पदार्थांचा समावेश असणार आहे. या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पाहुण्यांसाठी खास आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी संगीत, फोक डान्स अशा वेगवेगळ्या गोष्टींचं आयोजन करण्यात आलं आहे. 

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण आता अवघ्या काही तासांत ते लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या सोशल मीडियावरदेखील त्यांच्या लग्नसोहळ्याची चांगलीच चर्चा आहे. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


जैसलमेरच्या सूर्यगढ महालातील 84 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. तसेच पाहुण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर महालातील सजावटीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

हेही वाचा :  चित्रांगदाच्या सौंदर्याचे लाखो दिवाने! वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्याबद्दलच्या खास गोष्टी...

सिद्धार्थ-कियारा यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. ‘शेरशाह’ या सिनेमात सिद्धार्थ-कियारा एकत्र झळकले होते. त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. आता खऱ्या आयुष्यातदेखील ते लग्नबंधनात अडकणार असल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आज त्यांच्या संगीताचा कार्यक्रम होणार असून उद्या म्हणजेच 7 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नानंतर मुंबईत ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : मोठमोठे झुंबर ते आलिशान बैठक व्यवस्था; थाटात पार पडणार कियारा-सिद्धार्थचा संगीत सोहळाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …